Chhaava : बॉक्स ऑफिसवर Animal चित्रपटालाही ‘छावा’ने टाकलं मागे

Maha Kumbh 2025: महाकुंभ मेळ्यात Amitabh Bachchan सहभागी होणार;’ही’ प्रसिद्ध अभिनेत्री म्हणणार शिवतांडव स्तोत्रम्
Maha Kumbh 2025: महाकुंभ सुरू झाला असून संपूर्ण जग सध्या या ठिकाणा आले असून सगळ्यांना या काळात सर्वार्थाने हरवून जायचे आहे. प्रशासनाने संगमाच्या काठावरील संपूर्ण प्रयागराज परिसराचे टेंट सिटीमध्ये रूपांतर केले आहे. यावेळी कोट्यवधी लोक सनातनी संगमात डुबकी मारणार आहेत, मग अशावेळी बॉलिवूड स्टार्स तरी कसे मागे राहणार आहेत? येत्या दिवसात या महाकुंभात अनेक स्टार्स दिसणार असून त्याचवेळी एका अभिनेत्रीला शिवतांडव स्तोत्राचे लाइव्ह पठण करण्याचे आमंत्रण ही मिळाले आहे.(Maha Kumbh 2025)

पहिल्यांदाच अभिनेत्री अदा शर्मा या ठिकाणी हजारो-लाखो लोकांच्या उपस्थितीत शिवतांडव स्तोत्राचे थेट पठण करणार आहे.तसेच या कुंभमेळ्यात अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती ही समोर आली आहे. २६ जानेवारीला साधना सरगम, २७ जानेवारीला शान, ३१ जानेवारीला रंजनी आणि गायत्री कार्यक्रम सादर करणार आहेत. तर कैलाश खेर 23 फेब्रुवारीला आपला शो सादर करताना दिसणार आहेत.

रवी त्रिपाठी, साधना सरगम , शान आणि रंजनी आणि गायत्रीहे सर्व जण वेगवेगळ्या दिवशी कार्यक्रम सादर करतील. याशिवाय कैलास खेर आणि मोहित चौहान यांचा ग्रँड फिनाले ही होणार आहे. कुंभमेळा मैदानावरील गंगा मंडपात हा कार्यक्रम होणार आहे. या महाकुंभात सुमारे १५ हजार कलाकार एकत्र दिसणार आहेत. जे वेगवेगळ्या दिवशी परफॉर्म करतील.
===============================
हे देखील वाचा: Sunny Deol च्या ‘जाट’ सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लुक
===============================
कुंभमेळ्यात देश-विदेशातील भाविक दाखल होऊ लागले असून, यंदा ४० कोटी लोक येथे दिव्य स्नानासाठी येणार असल्याचा अंदाज आहे. अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनुप जलोटा, रेणुका शहाणे, आशुतोष राणा, रवी किशन, मनोज तिवारी आणि अक्षरा सिंह यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटातून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री अदा शर्मा महाकुंभमेळ्यात खास लाईव्ह परफॉर्मन्स सादर करणार आहे. यासाठी अदा शिवतांडव स्तोत्राचे थेट पठण करणार आहे.