Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?

    yash chopra and javed akhtar

    ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mahavatar Narsimha : भगवान विष्णूंची बॉक्स ऑफिसवर किमया; बिग बजेट

‘सौतन’ मधील Kishore Kumar यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा मजेदार किस्सा!

Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

इराण, इटली, पाकिस्तान; परदेशातही वाजला होता Sholay चा डंका!

Jeetendra : ‘आखरी दाव’, खेळ जो रंगलाच नाही…

उपहार : Jaya Bachchan यांच्या मुग्ध अभिनयाने नटलेला अप्रतिम चित्रपट!

Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Bin Lagnachi Gosht Teaser: नात्यांच्या चौकटी मोडणाऱ्या सिनेमात पहायला मिळणार  प्रिया- उमेशची

‘Ghadhvach Lagn 2: सावळा कुंभार आणि गंगी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार?

Amjad Khan यांच्या मध्यवर्ती भूमिकेतील ‘हा’ सिनेमा सुपर डुपर हिट

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

K. L. Saigal : ‘काली पांच’ न घेता सैगलने गायलं हे गाणं.

 K. L. Saigal : ‘काली पांच’ न घेता सैगलने गायलं हे गाणं.
बात पुरानी बडी सुहानी

K. L. Saigal : ‘काली पांच’ न घेता सैगलने गायलं हे गाणं.

by धनंजय कुलकर्णी 16/01/2025

संगीतकार नौशाद (Naushad) यांचं भारतीय चित्रपटातील योगदान अतुलनीय असा आहे. चाळीसच्या दशकापासून थेट २००५ सालापर्यंत ते संगीताच्या दुनियेत ताठ मानेने उभे होते. एवढा प्रचंड कालखंड जरी त्यांनी सिनेमात काढला असला तरी त्यांच्या एकूण संगीतबध्द केलेल्या सिनेमांची संख्या अवघी ६४ भरते. त्यामुळे प्रत्येक सिनेमावरती किती मेहनत घेत होते याची कल्पना आपल्याला येईल.

कुंदनलाल सैगल (K. L. Saigal) ते गोविंदा असा त्यांच्या संगीतातील अभिनेत्यांचा प्रवास होता. कुंदनलाल सैगल यांच्यासोबतचा एक चित्रपट केला होता हा चित्रपट अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण होता. कारण हा दुर्दैवाने सहगल यांचा शेवटचा चित्रपट ठरला. स्वर्गीय कुंदनलाल सैगल हे खरोखरच शापित गंधर्व होते. अतिशय सुंदर आवाजाची देणगी त्यांना लाभली होती पण त्याचबरोबर त्यांना एकच प्यालाचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्यांचे लिव्हर खराब झाले आणि वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी त्यांना हे जग सोडावे लागले.

त्यापूर्वीचा हा किस्सा आहे. ‘शहाजहान’ या चित्रपटाला संगीत नौशाद देत होते. यातील प्रमुख भूमिका कुंदनलाल सैगल (K. L. Saigal) यांची होती. यातील एक गाण्याचं रेकॉर्डिंग करायचे होते. त्यापूर्वीची रिहर्सल चालू होती. संगीतकार नौशाद यांनी रिहर्सल सुरू केली. सैगल त्यांच्याकडे पहिल्यांदाच गात होते. पण रिहर्सलच्या आधी सैगल यांनी त्यांना थांबवले आणि आपल्या ड्रायव्हरला ‘काली पांच’ आणायला सांगितली.

संगीतकार नौशाद यांना काहीच कळाले नाही. त्यांना वाटले ‘काली पांच’ म्हणजे हार्मोनियमची पाचवा सुर म्हणायचे आहे की काय? ते गोंधळले. पण तितक्यात ड्रायव्हर व्हिस्कीचा एक पेग घेऊन आला. सैगल (K. L. Saigal) म्हणाले, ”माफ करा नौशाद साहेब. यालाच मी काली पांच म्हणतो. ही माझ्या घशाच्या खाली उतरल्याशिवाय मी गावूच शकत नाही. अशा पद्धतीने त्या दिवशी प्रत्येक रिहर्सलच्या आधी त्यांनी ‘काली पांच’ घेत राहिले!

संगीतकार नौशाद यांना हा प्रकार अजिबात आवडला नाही. पण सैगल सारखा सुपरस्टार गायक! त्याला सांगायचे कसे? म्हणून त्यांनी काहीच बोलले नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र ते मनाची तयारी करून रेकॉर्डिंगला गेले. स्टुडीओत गेल्यावर ते म्हणाले, ”सैगल साब, तुम्ही गाणी गाण्यापूर्वी काली पांच घेता याला माझी काही हरकत असण्याचे कारण नाही. पण आपण एक टेक काली पांच न घेता करूयात!” सैगल (K. L. Saigal) आता घाबरले. ते म्हणाले, ”नाही. मी गाऊच  शकणार नाही. नको. मी काली पांच घेतली नाही तर बेसुरा गाईन.” नौशाद साहेबांनी त्यांना धीर दिला. म्हणाले, ”तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. जर तुमचे  रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं नाही तर ‘काली पांच’ घेऊन आपण पुन्हा रेकॉर्डिंग करू!”  या बोलीवर सहगल तयार झाले आणि नौशाद यांनी ‘काली पांच’ न घेता सैगलकडून ते गाणे गाऊन घेतले.

ते गाणे अतिशय सुंदर झाले होते. नौशाद खूश झाले. त्यानंतर नौशाद म्हणाले आता हेच गाणं आपण तुम्ही ‘काली पांच’ घेऊन जा पुन्हा गा.” त्यांचा ड्रायव्हर व्हिस्कीचा पेग घेऊन आला आणि त्यानंतर या गाण्याचे पुन्हा रेकॉर्ड झाले. दुसऱ्या दिवशी नौशाद यांनी दोन्ही रेकॉर्डिंग त्यांना ऐकवले आणि सैगल (K. L. Saigal) साहेबांना विचारलं, ”आता तुम्हीच निर्णय घ्या. कुठलं गाणं आपण चित्रपटात ठेवायचं?” त्यावर सैगल म्हणाले, ”नौशाद साहेब, ‘काली पांच’ न घेतलेल्या गाणं खरोखरच उत्तम झाला आहे. तेच चित्रपटात ठेवा!” आणि त्यांच्या डोळे डबडबले.

============

हे देखील वाचा : Mother India : बिदाई गीताच्या रेकोर्डिंगला शमशाद बेगम का रडत होत्या?

============

ते म्हणाले, ”नौशादसाहेब इतक्या उशिरा मला तुम्ही का हो भेटलात ? आधी का नाही आपण भेटलो? आता माझी जाण्याची वेळ झाली आहे. तुम्ही जर मला आधी भेटला असता तर नक्कीच माझा आयुष्य वाढलं असतं.” आणि खरोखरच त्यानंतर काही महिन्यांनी हा शापित गंधर्व कुंदनलाल सैगल १८ जानेवारी १९४७ या दिवशी वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी निधन पावला.

संगीतकार नौशाद यांनी किमान एका गाण्यापुरतं तरी त्यांना  काली पांचपासून दूर ठेवलं याचं आयुष्यभर समाधान वाटत होतं. पण त्याचबरोबर वाईट देखील वाटलं की सैगल (K. L. Saigal) ला कुणीच कसं या व्यसनापासून दूर ठेवू शकलं नाही? खैर प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं हे समजून त्यांनी आपल्या मनाचं समाधान करून घेतलं! सैगल यांनी गायलेलं हे अजर गीत होते ‘जब दिल हि टूट हम जी के क्या करेंगे….”

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity News Entertainment k l saigal Naushad Ali
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.