Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Nilu Phule : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट ‘खलनायक’!

Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Kaun Banega Crorepati 17 PROMO: ‘या’ दिवसापासून अमिताभ बच्चन पुन्हा भेटायला येणार

‘श्श… घाबरायचं नाही’ नाटकात Dr. Girish Oak आणि Dr. Shweta

Mumbai Local Movie Teaser: प्रथमेश आणि ज्ञानदाच्या सिनेमाचा कलरफुल टीझर लॉन्च

Amol Palekar : जब दीप जले आना जब शाम ढले

Amitabh Bachchan : १८ वर्षांपूर्वी बॉलिवूडचा Multi Star Cast चित्रपट

Salman Khan लग्न करणार होता पण नेमकी माशी शिंकली कुठे?

Balasaheb Thackeray ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीला म्हणायचे भूत

Sholay : स्पर्धेत टिकले कोण? गळपटले कोण?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Juthika Roy : स्वातंत्र्यदिनाची पहाट सुरीली करणारी गायिका !

 Juthika Roy : स्वातंत्र्यदिनाची पहाट सुरीली करणारी गायिका !
बात पुरानी बडी सुहानी

Juthika Roy : स्वातंत्र्यदिनाची पहाट सुरीली करणारी गायिका !

by धनंजय कुलकर्णी 17/01/2025

पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपिता म. गांधी आणि सरोजिनी नायडू यांची चाळीसच्या दशकातील आवडती गायिका कोण होती? या गायिकेला १५ ऑगस्ट १९४७ या आपल्या स्वातंत्रदिनी आकाशवाणीवर गाण्याचा पहिला मान मिळाला होता. पं. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्रदिनी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणाच्या आधी गाण्यासाठी स्वत: तिला खास निमंत्रित केले होते! कोण होती ही गायिका? ही होती ज्युथिका रॉय (Juthika Roy) !

आपल्याकडील गायन क्षेत्रातील कलाकारांनी गैर फिल्मी गाण्यांचं एक मोठं विश्व उभं केले आहे. काही कलाकार तर सिनेमाहून अधिक भावगीत, गजल, भजन यातच जास्त रमले आणि रसिकांसाठी कलेच्या प्रांगणात आगळं वेगळं स्वरांचं नंदनवन फुलविलं. यात एक नाव प्रामुख्याने आणि अभिमानाने घ्यावे लागेल ते बंगाली गायिका ज्युथिका रॉय (Juthika Roy) यांचे! त्यांनी गायलेल्या मीरेच्या भजनांनी त्यांचा उल्लेख ’आधुनिक मीरा’ म्हणून होत असे. ३५० हिंदी आणि २५० बंगाली गाणी त्यांनी गायली. ’घूंघट के तट खोल रे तोहे पिया मिलेंगे’, ’पग घुंगरू बांध मीरा नाची थी’, ’जोगी मत जा’ ही ज्युथिका रॉय यांनी गायलेली भजने आज साठ सत्तर वर्षे उलटून गेली तरी रसिक विसरलेली नाहीत.

तिच्या स्वरात एक नैसर्गिक आर्तता होती. भारताचे पहिले Jawaharlal Nehru तिच्या आवाजाचे चाहते होते. याबाबतचा एक किस्सा ऐकण्यासारखा आहे. लाल किल्ल्यावरून नेहरूंनी स्वातंत्रदिनाच्या पहाटे म्हणजे रात्री बारा वाजता तिरंगा फडकवून जे भाषण केले होते त्या वेळी त्या भाषणापूर्वी आकाशवाणीवर ज्युथिका रॉय (Juthika Roy) लाईव्ह गात होत्या. नेहरूंनी तशी विनंती केली होती. तमाम भारतीयांच्या जीवनात मोठ्या प्रतीक्षेनंतर शतकानंतर येणारी रम्य पहाट मंगल स्वरांनी यावी हा त्यांचा आग्रह होता त्यामुळे ’माझे भाषण सुरू होई पर्यंत तुम्ही गात रहा’ अशी विनंती नेहरूंनी केली होती!

त्यामुळे ज्युथिका (Juthika Roy) पुन्हा रात्री दहा वाजता आकाशवाणीवर दाखल झाल्या. नेहरूंप्रमाणेच म.गांधी देखील या स्वराने भारावले होते. त्यांच्या सायंकालीन प्रार्थना सभेची सुरूवात ज्युथिकाच्या ध्वनीमुद्रिकांनी व्हायची. पुण्याला बंदीवासात असताना गांधी त्यांची भजने आवडीने ऐकत व गात असत. Sarojini Naidu ह्या देखील ज्युथिकाच्या स्वरांच्या चाहत्या होत्या. (Untold stories)

============

हे देखील वाचा : K. L. Saigal : ‘काली पांच’ न घेता सैगलने गायलं हे गाणं.

============

एकदा गांधीजी बंगालच्या दौर्‍यावर असताना ज्युथिका (Juthika Roy) ला त्यांनी भजने ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. तो स्वर ऐकून ते एवढे प्रभावित झाले की पुढच्या सभेला ते तिला घेवून गेले व मोठ्या जनसागरापुढे गायची विनंती केली. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी हा स्वर उपयोगी पडेल अशी त्यांची धरणा होती. ज्युथिकाने देश परदेशात असंख्य कार्यक्राम केले. ’धुली’ आणि ’रत्नघर’ या दोन वंग चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते.

२० एप्रिल १९२० रोजी जन्मलेल्या ज्युथिका (Juthika Roy) ने वयाच्या बाराव्या वर्षी पहिले गीत रवींद्र संगीतात गायले होते. कमलदास गुप्ता आणि Kazi Nazrul Islam यांनी तिच्या स्वरातील कलागुण ओळखले आणि तिच्या स्वराला घडवले. १९७२ साली त्यांना ’पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. घुंघट के पट खोल, कन्हैया पे तन मन, पग घुंगरू बांध मीरा नाची थी, तोरे अंगसे अंग मिलाके कन्हाई, मैं राम नाम की चुड़ियाँ पहेनु. मै तो वारी जाऊँ राम हि ज्युथिका रॉय यांनी गायलेली भजने आजही लोकप्रिय आहेत.

५ फेब्रुवारी २०१४ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आजच्या पीढीला हा स्वर अनोळखी असला तरी या स्वराची महानता किती अफाट होती याची कल्पना यावी या करीता हा लेख प्रपंच!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Celebrity News Entertainment Jawaharlal Nehru juthika roy Mahatma Gandhi Sarojini Naidu
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.