Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss 18 बिग बॉस 18 च्या ट्रॉफीवर करणवीर मेहराने कोरले नाव

 Bigg Boss 18 बिग बॉस 18 च्या ट्रॉफीवर करणवीर मेहराने कोरले नाव
टीव्ही वाले

Bigg Boss 18 बिग बॉस 18 च्या ट्रॉफीवर करणवीर मेहराने कोरले नाव

by Jyotsna Kulkarni 20/01/2025

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि विवादित शो म्हणून बिग बॉस (Bigg Boss) या शो ला ओळखले जाते. या शो ला अनेक लोकं दुषण लावतात. मात्र तरीही प्रेक्षकांमधील या शोची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. या शो ने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे. बिग बॉसचे दरवर्षी नवनवीन पर्व येतात आणि प्रत्येक पर्व विशिष्ट कारणांमुळे गाजते. यंदा बिग बॉस चे १८ (Bigg Boss 18) वे पर्व सुरु होते. नुकताच या पर्वाचा अंतिम सोहळा रंगला. (Bigg Boss 18)

मागील तीन महिन्यांपासून बिग बॉस हा शो लोकांचे मनोरंजन करत होता. अखेर तो दिवस आलं आणि १८ व्या पर्वाला त्याचा अंतिम विजेता मिळाला. टीव्ही आणि चित्रपट अभिनेता असलेल्या करणवीर मेहराने (Karanveer Mehra) यंदाच्या बिग बॉस 18 च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्याने अभिनेता विवियन डिसेनाचा (Vivian Dsena) पराभव करत हे जेतेपद पटकावले. करणवीर मेहराला बिग बॉस 18 च्या विजेत्या ट्रॉफीसह तब्बल ५० लाखांचे मोठे बक्षीस मिळाले आहे. (Bigg Boss 18 Winner)

Bigg Boss

बिग बॉसचे १८ वे पर्व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु झाले होते. त्यानंतर १०५ दिवसांनी काल १९ जानेवारी २०२५ रोजी अंतिम सोहळा संपन्न झाला. यंदाच्या सिझनमध्ये बिग बॉसमध्ये २३ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी विवियन डिसेना, करणवीर मेहरा, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे सहा स्पर्धक टॉप ६ पर्यंत पोहोचले. (Entertainment News)

दरम्यान अंतिम फेरीपर्यंत विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा हे दोन स्पर्धक उरले आणि त्यात करणवीरने बाजी मारली. दरम्यान करण आणि विवियन या दोघांमध्ये चुरशीची लढत होती. अनेकांनी तर या दोघांमधून एक विजेता होईल असे देखील सांगितले होते. फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल या शोमध्ये तिसऱ्या स्थानी राहिला. शोच्या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये करणवीर आणि विवियनसाठी लाइव्ह वोटिंग सुरू करण्यात आली होती. त्यात करणवीरने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे करणने आधी ‘खतरों के खिलाडी’ या शोचेही जेतेपद पटकावले आहे. (Entertainment mix masala)

अंतिम फेरीत ईशा सिंग ही घराबाहेर पडणारी पहिली व्यक्ती होती. यानंतर, कमी मते मिळाल्यामुळे चुम दरंग देखील बाहेर पडली. त्यानंतर अविनाश मिश्रा रजत दलाल देखील बाहेर आला. करणवीरचा प्रामाणिक आणि बेधडक स्वभाव प्रेक्षकांना खूपच भावला. त्याने पूर्ण शो मध्ये कोणालाही फसवले नाही. त्याने त्याची मैत्री देखील टिकवली. त्यामुळेच तो प्रेक्षकांना जास्त आवडला.

Bigg Boss

दरम्यान करणबद्दल बोलायचे झाले तर तो मागील २० वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. करणने २००५ साली ‘रिमिक्स’ या शोद्वारे त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने ‘बिवी और मैं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. पुढे चित्रपटांकडे तो वळला आणि त्याने ‘रागिनी एमएमएस 2’, ‘मेरे डॅड की मारूती’, ‘ब्लड मनी’, ‘बदमाशियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या.

=================================

हे देखील वाचा: Fussclass Dabhade Trailer: आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला!

=================================

यासोबतच करण ‘खतरों के खिलाडी 14’ या रियालिटी शोमध्ये देखील झळकला आणि १४ व्या पर्वाचा विजेता ठरला होता. करणवीरने ‘पवित्र रिश्ता’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘परी हूँ मैं’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘ससुराल सिमर का’, ‘डोली अरमानों की’ या गाजलेल्या मालिकांमध्ये देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khan bigg boss Bigg Boss 18 Bigg Boss 18 winner karanveer mehra Bigg Boss 18 बिग बॉस 18 च्या ट्रॉफीवर करणवीर मेहराने कोरले नाव Bigg Boss 18 winner karanveer mehra Reality Show salman khan show TV Vivian Dsena करणवीर मेहरा टीव्ही बिग बॉस बिग बॉस १८ बिग बॉस १८ करणवीर मेहरा रियॅलिटी शो विवियन डिसेना सलमान खान
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.