Ankush Chaudhari प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अंकुश चौधरी बनला मराठी
Namrata Shirodkar मॉडलिंगमध्ये अव्वल असूनही अभिनयात फ्लॉप ठरली मराठमोळी नम्रता शिरोडकर
आज माजी मिस इंडिया (Miss India) आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. नम्रताने अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र तिला अभिनयात अपेक्षित असे यश मिळाले नाही. त्यानंतर तिने साऊथसुपरस्टार आलेल्या महेश बाबूशी (Mahesh Babu) लग्न केले आणि ती सेटल झाली. मॉडलिंगपासून करियरची सुरुवात करणारी नम्रता अनेक हिट चित्रपटांचा भाग होती. आज आपण तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल रंजक गोष्टी. (Namrata Shirodkar )
२२ जानेवारी १९७२ रोजी एका मराठी कुटुंबात नम्रताचा जन्म झाला. तिला सुरुवातीपासूनच अभिनयाचे वातावरण घरातूनच मिळाले. कारण तिची आजी मीनाक्षी या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. मुख्य म्हणजे मीनाक्षी या भारतीय चित्रपटसृष्टीत स्विमसूट घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री देखील होत्या. तर तिची मोठी बहीण शिल्पा शिरोडकर ही देखील लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री होती. नम्रताला देखील सुरुवातीपासूनच चित्रपट, मॉडेलिंग आणि अभिनयाचे वेड होते. तिला याच क्षेत्रात करियर करायचे होते. १९९३ साली मिस इंडियाचा ताज जिंकून नम्रता पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आली होती. (Namrata Shirodkar Birthday)
नम्रताने १९७७ साली शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘शिर्डी के साई बाबा’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर पुढे काही वर्षांनी तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली आणि १९९३ साली मिस इंडियाचा ताज पटकावला. याशिवाय तिने मिस युनिव्हर्स आणि मिस एशिया पॅसिफिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते, मात्र ते किताब जिंकण्यात तिला अपयश आले. नम्रताला मॉडेलिंग जास्त आवडायची म्हणून तिला चित्रपटांमध्ये येण्याची अजिबातच घाई नव्हती. (Ankahi Baatein)
१९९८ साली नम्रताने सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी से होता है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची भूमिका छोटी मात्र लक्षवेधक होती. नम्रताने आधी पूरब की लैला पश्चिम की लैला हा सिनेमा साइन केला होता, मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता. तिच्या यशस्वी चित्रपटांमध्ये पुकार, वास्तव, हेरा फेरी, अस्तित्व, कच्चे धागे, तेरा मेरा साथ रहे, एलओसी कारगिलचा समावेश आहे. मात्र तिला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळत नव्हते. (Entertainment mix masala)
अशातच तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हात अजमवायचे ठरवले. तिने २००० साली तेलगू सिनेमा ‘वामसी’ साइन केला. याच सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिची भेट महेश बाबूशी झाली. महेश साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार होता. महेशबाबू पहिल्या नजरेतच नम्रता शिरोडकरच्या प्रेमात पडला आणि तिच्याबरोबर आपले संपूर्ण आयुष्य घालवायचा निर्णयही त्याने घेतला. पुढे नम्रता आणि महेश चांगले मित्र झाले. बराच काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. (Bollywood Masala)
मात्र त्यांनी कधीच मीडियासमोर त्यांचे नाते स्वीकारले नाही. महेशने त्यांच्या नात्याबद्दल त्याच्या घरीसुद्धा सांगितले नव्हते. महेशने सर्वप्रथम याबद्दल त्याच्या बहिणीला सांगितले आणि त्याच्या बहिणीने नम्रताच्या घरातल्यांना या लग्नासाठी तयार केले. अखेर १० फेब्रुवारी २००५ मध्ये त्यांनी लग्न केलं. लग्नाआधी जवळपास ५ वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत होते. हे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने करण्यात आले होते. नम्रता महेशपेक्षा ४ वर्ष मोठी आहे. या दोघांना गौतम आणि सितारा ही दोन मुले आहेत. (Namrata Shirodkar Family)
या लग्नाआधी महेशने नम्रतासमोर एक अट देखील ठेवली होती. खुद्द नम्रतानेच एक मुलाखतीमध्ये याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, ‘महेशचे विचार पहिल्यापासून स्पष्ट होते. त्याला काम न करणारी मुलगी बायको म्हणून हवी होती. मी जर एखाद्या ऑफिसमध्ये जरी काम करत असते तरी त्याने मला नोकरी सोडायला सांगितली असती.” महेशच्या या अटीवरून त्यांच्यात अनेकदा वाद, मतभेद देखील झाले होते. मात्र नंतर तिने देखील समजून घेतले.
==============
हे देखील वाचा : Mohammed Rafi : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायले म.रफीसोबत गाणे!
==============
पुढे नम्रताने देखील महेश समोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर तिला अपार्टमेंटमध्ये रहायचे होते. कारण तिला बंगल्यात राहण्याची भीती वाटायची. त्यामुळे लग्नाआधीच तिने देखील महेशला एक अट घातली की लग्नानंतर ती हैदराबादला रहायला येईल पण तेव्हा ती बंगल्यात न राहता अपार्टमेंटमध्येच राहिल. महेशने देखील नम्रताची ही अट मान्य केली. आज हे दोघं आदर्श कपल म्हणून मनोरंजनविश्वामधे प्रसिद्ध आहे. नम्रता मनोरंजनविश्वपासून लांब असून ती तिच्या मुलांचा सांभाळ करत आहे.