Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“Tesla आणलीत, पण चांगले रस्ते केव्हा आणणार?” Actor Shashank Ketkar

Gharoghari Matichya Chuli मालिकेत जबरदस्त ट्विस्ट; रणदिवे कुटुंब ऐश्वर्यावर करणार

Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kiran Mane ‘खरा हिरो आमचा तुकाराम!’ किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

 Kiran Mane ‘खरा हिरो आमचा तुकाराम!’ किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
टीव्ही वाले

Kiran Mane ‘खरा हिरो आमचा तुकाराम!’ किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

by Jyotsna Kulkarni 26/01/2025

अभिनेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच आपल्या अभिनयाने आणि आपल्या वक्तव्यांनी नेहमीच प्रकाशझोतात येत असतात. किरण माने हे मराठी टेलिव्हिजन विश्वातील अतिशय प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. किरण माने यांच्या सोशल मीडिया पोस्ट पहिल्या तर आपल्या लक्षात येईल की ते उत्तम अभिनेते असण्यासोबतच उत्तम लेखक देखील आहेत. (Kiran Mane)

किरण माने त्यांचे विचार, त्यांच्या भावना त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून अतिशय समर्पक शब्दात उत्तम पद्धतीने मांडताना दिसतात. केवळ मनोरंजनविश्वच नाही तर सामाजिक, राजकीय आदी सर्वच क्षेत्रातील घडामोडींवर ते त्यांचे विचार स्पष्ट शब्दात मांडताना दिसतात. आता देखील किरण माने यांची एक पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. किरण माने यांनी त्यांच्या नवीन पोस्टमधून संत तुकाराम महाराजांचे (Tukaram Maharaj) विचार मांडले आहेत. (Kiran Mane Post)

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “…चारशे वर्षांपूर्वी कुणबी जातीच्या एका सावकारपुत्रानं, अभिमानानं-छातीठोकपणे “मी महार” असं सांगणं म्हणजे खायचं काम नव्हतं भावांनो… स्वत:ला आयती जन्मजात मिळालेली, समाजात प्रतिष्ठीत मानली जाणारी जात पाठीशी असताना… शुद्र समजून हेटाळणी केली जाणारी जात चारचौघांत ‘आपलीशी’ केलीवती बहाद्दूरानं. लै लै लै मोठ्ठा जिगरा होता माझ्या तुकोबारायाचा! (Marathi Top News)

..आज, दोनहजार पंचवीस साल उजाडलं तरी “मी तमूक जातीचा.” अशा पोकळ बड्या बाता करणारी बेनी आपण अवतीभवती बघतो. चारशे वर्षांपूर्वी तर समाजात मान्य असलेली उतरंड होती दोस्तांनो.. हा मोठ्ठा-तो खालचा.. याला सगळा मान – त्यानं फाल्तू कामं करायची, गांवकुसाबाहेर र्‍हायचं असे नियम लादले होते. त्याकाळात वरच्या जातीत जन्माला येणं हे ‘भाग्याचं’ वगैरे मानलं जायचं…

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

त्या काळात आपला तुकोबाराया भर किर्तनात ‘जोहार’ घालायचा गड्याहो ! ‘जातव्यवस्था’ मोडून काढण्यासाठी तुकोबानं दिलेला हा सगळ्यात जोरदार दणका होता… जळजळीत विद्रोहाचा जाळ न् धूर संगटच काढलावता वाघानं ! …महार जातीत जन्माला आलेल्या लोकांकडनं जो नमस्कार घातला जातो, त्याला ‘जोहार’ म्हणायचे त्या काळात. तुकोबा अभंगात स्वत:ला ‘वेसकर’ म्हंजेच महार मानायचे. थोडक्यात महाराचा ‘रोल’ करायचे ! “मी वेसकर.. तुमाला जोहार करतो” असं म्हणत अभंग सुरू करायचे !! “मायबाप जोहार… सारा साधावया आलों वेसकर…!!!”

…ही घटना आणि हा अभंग साधासुधा नाय भावांनो. तुकोबारायांनी प्रतिकात्मकरित्या स्वत:ला महार मानणं आणि ‘जोहार’ घालणं ही लै लै लै मोठ्ठी बंडखोरी आहे… सामाजिक क्रांतीची बीजं होती ही…तुकाराम महाराजांची जात ही त्याकाळात महार समाजापेक्षा उच्च मानली जात होती.. त्या उच्चपणामुळं जो मान त्यांना मिळाला होता, तो मान आधी त्यांनी लाथाडला ! आपल्या सो कॉल्ड प्रतिष्ठीतपणाला त्यांनी आग लावली.. राखरांगोळी केली.. सगळं ‘समान’ पातळीवर आणून ठेवलं. तुकोबारायानं शेकडो वर्षांपूर्वी अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत विरघळून जाणं ही लै खतरनाक, नादखुळा आणि भन्नाट गोष्ट हाय..

=========

हे देखील वाचा : Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द

Milind Gawali अशोक सराफ यांना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्यानंतर मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट

=========

बॉम्बच फेकलावता हो आपल्या हिरोनं… रान पेटवलंवतं… पिच्चर-सिरीयलमध्ये दूसर्‍यानं लिहीलेले डायलॉग हाणणारे आम्ही फक्त एक नट असतो, हिरो नसतो.. खरा हिरो आमचा तुकाराम ! “महाराशी शिवे.. कोपे, ब्राह्मण तो नव्हे !” हे ठणकावणारा तुकोबा आज परत एकदा समजून घेण्याची योग्य वेळ आलेली आहे. गाथा बुडवूनबी तो तरलाय ते तुमच्या-माझ्यासाठी. आज आपल्या भवताली जे द्वेषाचं विष पेरलं जातंय त्याची नीट चिकित्सा करून, तुकोबांचे विचार आज नव्यानं समजून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.”

दरम्यान किरण माने यांची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी देखील त्यावर कमेंट्स करत किरण माने यांच्या लिखाणाशी सहमती दर्शवली आहे. सोबतच त्यांच्या लिखाणाचे कौतुक देखील केले आहे. किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी अनेक नाटकांमध्ये आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहेत. यासोबतच ते अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील झळकले आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actor kiran mane cast Entertainment Kiran Mane Kiran Mane and tukaram maharaj Kiran Mane new post Kiran Mane post Kiran Mane post on cast marathi Marathi Movie marathi tv tukaram maharaj किरण माने किरण माने आणि तुकाराम महाराज किरण माने पोस्ट किरण माने माहिती
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.