Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jitendra Joshi जितेंद्र जोशीने ‘माझी माणसं’ म्हणत शेअर केली खास पोस्ट

 Jitendra Joshi जितेंद्र जोशीने ‘माझी माणसं’ म्हणत शेअर केली खास पोस्ट
कलाकृती तडका

Jitendra Joshi जितेंद्र जोशीने ‘माझी माणसं’ म्हणत शेअर केली खास पोस्ट

by Jyotsna Kulkarni 31/01/2025

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रतिभावान अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) अर्थात आपला सर्वांचा लाडका जितू दादा. जितेंद्र जोशी नेहमीच त्याच्या कामामुळे चर्चेत असतो. अभिनेता असण्यासोबतच तो अतिशय उत्तम कवी आणि निर्माता देखील आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून येत जितूने स्वतःला या सिनेविश्वात सिद्ध केले आहे. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील कमालीचा सक्रिय असलेला जितेंद्र जोशी सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. तो अनेकदा विविध पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांच्या संपर्कात राहतो.(Jitendra Joshi)

नुकतीच जितू जोशीने त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही खास पोस्ट त्याच्या हेयर ड्रेसर आणि मेकअप आर्टिस्ट असणाऱ्या कपलसाठी आहे. ही पोस्ट सध्या खूपच व्हायरल झाली असून, त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत जितूची कौतुक केले आहे. जितूने शेअर केलेल्या त्याच्या खास पोस्टमध्ये म्हटले आहे. (Jitendra Joshi Post)

“माझी माणसं!!

सुषमा हेयर ड्रेसर म्हणजे केसांचं नियोजन (केशभूषा) आणि स्टाइलिंग करणारी तर सुनील मेक अप म्हणजे रंगभूषा करणारा. दोघे पहिल्यांदा मला भेटले ते हेमंत ढोमे च्या टीम मधे बघतोस काय मुजरा कर चित्रपटाच्या शूटिंग ला. अत्यंत गुणी आणि आपापल्या कामात तरबेज अशा दोन व्यक्ती . सुनील लाजरा बुजरा तर सुषमा खमकी पण प्रेमळ! शूटिंग च्या मधे मधे मोकळा वेळ मिळाला की दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत ; उगाचच हसत उभे. मी काही दिवस त्त्यांचं निरीक्षण करत त्यांची केमिस्ट्री बघत होतो . त्यांना एक दिवस म्हणालो “तुम्ही लग्न करा ; छान जोडी आहे “ तर सुनील म्हणाला “सर तसं काही नाही आमच्यात!” (Entertainment mix masala)

View this post on Instagram

A post shared by jitendra joshi (@jitendrajoshi27)

मी म्हणालो “अरे तुम्हाला दिसत नाहीये जे मला दिसतंय!! पुढे तेच घडलं आणि दोघे विवाहबंधनात अडकले मग त्यांना श्रीयान नावाचं एक गोंडस लेकरू झालं ! सुनील एकदा बोलता बोलता म्हणाला “सर तुम्हाला हिंदी चित्रपटात पाहायची इच्छा आहे. तुमचं टैलेंट.,!!..!! वगैरे .. वगैरे..आणि ज्या दिवशी हिंदी चित्रपट मिळाला मी अर्थातच सुनील ला म्हणालो ये आता, दोघे जाऊ. सुनील इतर सर्व कामांना सोडून आला. इतर काम सांभाळत तो माझ्या सोबत असतो. (Social News)

इतकंच नव्हे आमच्या पानी फाउंडेशन च्या शूटिंग ला जिथे मी एकही रुपया घेत नाही तिथेही तो अगदी नवख्या मुलाला मिळेल इतक्या पैशात मला सजवायला येतो . परवा माझ्या वाढदिवसाला फोन आला “ सर शिर्डीला आलोय आम्ही , बाबांकडे तुमच्या साठी प्रार्थना केली “ माझ्या चेहऱ्यावर हसू आणि डोळे ओलावलेले ! मी म्हंटलं “ एक अंगठी आण “ आज घरी आले तिघे प्रसाद , अंगठी, बाबांचा फोटो, आणि केक घेऊन ! आईने सुषमाची ओटी भरली साडी चोळी आणि त्याच्या बाळाला खाऊ दिला. तिघे घरी गेले न जेवता कारण गुरूवारचा उपवास होता. (Latest Marathi News)

माझ्या कृत:कृत्य झालेल्या हृदयाने मी विचार करतोय की वेळोवेळी मिळणारे मानसन्मान , पुरस्कार घरातल्या एका कोपऱ्यात पडून राहतात परंतु असे सवंगडी आपल्या नकळत आपला विचार करतात आपल्या साठी प्रार्थना करतात जी प्रार्थना आपल्या पाठी आपल्यासाठी उभी असते. चित्रपट यशस्वी / अयशस्वी होतात , नाव, पैसा, यश. येतात आणि जातातंही ! टिकत काहीच नाही परंतु काही माणसं असतात जी टिकतात आणि असतात तुमच्यासाठी !

======

हे देखील वाचा : Ramesh Deo मराठी मनोरंजनविश्वातील राजबिंडा ‘खलनायक’ रमेश देव

Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’ प्रीती झिंटा

======

मी खरोखर खूप भाग्यवान आहे कारण माझ्या आयुष्यात अशी माणसे आहेत. आज साई यांच्या रूपाने घरी आले आणि आशिर्वाद देऊन गेले. श्रद्धा तर आहेच परंतु आणखी सबुरी मिळाली की मग प्रवास मस्त होईल परंतु हेच सवंगडी हवेत सोबत; शेवटपर्यंत!!”

दरम्यान जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याचे कौतुक केले सोबतच काही लोकांनी जितू दादा किती चांगला माणूस आहे हे सांगत आपले काही अनुभव शेअर करत त्याच्याबद्दल भावना देखील व्यक्त केल्या आहेत. जितू दादाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच तो मराठी मालिका आणि नाटकांमध्ये देखील दिसला. त्याची सिक्रेड गेम्समधील भूमिका कमालीची गाजली.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Celebrity News Entertainment hindi jitendra joshi Jitendra Joshi Post Jitendra Joshi special post marathi Marathi Actor Marathi Movie OTT actor जितेंद्र जोशी जितेंद्र जोशी आणि स्टाफ जितेंद्र जोशी पोस्ट
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.