
Farhan Akhtar च्या ‘डॉन’ मध्ये शाहरुखची एन्ट्री कशी झाली?
खरं तर कुठल्याही गाजलेल्या क्लासिक सिनेमाचा (Classic Cinema) रिमेक बनवायचा तर मोठं कठीण काम असतं कारण तुलना कायम पहिल्या कलाकृती सोबत होत असते. असं असतानाही अनेक सुपरहिट सिनेमाचे रिमेक येतच असतात. काही चालतात तर काही फ्लॉप होतात. पण एकूणच असला प्रकार म्हणजे शिव धनुष्य पेलाण्यासाराखाच असतो.
१९७८ साली दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचा ‘डॉन’ (Don) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर बंपर हिट झाला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘डॉन’ याचे नाव खूप वरचे आहे. हा सिनेमा रिपीट रन ला भारत भर पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत असे आणि चांगला गल्ला कमावत असे. आपल्याकडे साधारणपणे २००० सालापर्यंत रिपीट रन हा प्रकार होता. त्या मुळे जुने सिनेमे नविन पिढीला थिएटर मध्ये पाहता यायचे. त्यामुळे ‘डॉन’ सारखा सिनेमा कधी जुना होत नाही. पण असं असतानाही २००६ साली दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) यांनी डॉनचा रिमेक बनवायचे ठरवणे. ओरिजनल ‘डॉन’ (१९७८) चे डायलॉग सलीम जावेद यांनी लिहिले होते आणि जावेद अख्तर यांचे चिरंजीव फरहान अख्तर आता डॉन चा रिमेक बनवणार होते. (Bollywood Life)

फरहानने यापूर्वी रितिक रोशन ला घेऊन लक्ष्य (२००२) हा चित्रपट बनवला होता. या सिनेमापासून दोघांची चांगली जोडी जमली होती. दोघांच्यात ट्युनिंग चांगले होते. विचार जुळत होते. त्यामुळे फरहानच्या ‘डॉन’ या चित्रपटाचा नायक रितिक रोशनच असणार असे निश्चित झाले होते. फरहानने ‘डॉन’ ची नवीन एडिशनला लिहायला सुरुवात केली. आता काळ बदलला होता. जुना डॉन प्रदर्शित होऊन ३० एक वर्षाचा काळ उलटला होता. नवीन पिढीला नवीन ‘डॉन’ हवा होता त्या पद्धतीने फरहानने कथानक लिहायला सुरुवात केली. पण कथानक लिहिता लिहिता त्यांच्या असे लक्षात आले की या चित्रपटातील डॉन ची भूमिका रितिक रोशन च्या ऐवजी शाहरुख खान खूप चांगल्या पद्धतीने साकारू शकेल. कारण शाहरुख खान याची बॉडीलँग्वेज, त्याची बोलण्याची स्टाईल, त्याचा ह्युमर, बोलता बोलता महत्त्वाची गोष्ट चपखल पणे बोलून जाण्याची स्टाईल हे सर्व ‘डॉन’च्या व्यक्तिरेखाला हुबेहूब मॅच करणार होते. (Celebrity New)
त्यामुळे जेव्हा चित्रपटाचे कथानक अर्ध्याहून अधिक लिहून झाले; तेव्हा त्याच्यापुढे प्रश्न पडला की, आपण रितिक रोशनला तर शब्द देऊन बसलो आहोत पण इथे तर आपल्याला शाहरुख खान जास्त योग्य वाटतो आहे ! काय करायचे ? त्याने लगेच रितिक रोशनला कॉन्टॅक्ट केला आणि दोघांची एक मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये फरहान अख्तरने मोकळ्या मनाने आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. रितिकने देखील त्या भावनांचा आदर करत तो म्हणाला ,” फरहान हा चित्रपट तू बनवतो आहेस. तुझ्या नजरेतून आणि तुझ्या दिग्दर्शनातून हे कलाकृती साकारणार आहे.
त्यामुळे तुला जे योग्य वाटत आहे तेच कर. राहता राहिला प्रश्न माझा तुझ्या चॉईसचा मला पूर्ण आदर आहे. गो अहेड. ऑल द बेस्ट.” नंतर एका मुलाखतीत फरहानने सांगितले,” माझ्या मनावरील मोठे ओझे हृतिक रोशनने त्यादिवशी कमी करून टाकले. आता मी पूर्णपणे टेन्शन फ्री झालो होतो आणि त्या उत्साहात मी डॉनचे कथानक लिहून टाकले. नंतर शाहरुख खान यांना कॉन्टॅक्ट केले.
=========
हे देखील वाचा : Kishore Kumar : ‘आ चल के तुझे मैं लेके चलू…’ गाण्याचा किस्सा
=========
शाहरुख सुरुवातीला ही भूमिका करायला थोडासा कम्फर्टेबल नव्हता एकतर अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचे गारुड अजून प्रेक्षकांवरून उतरले नव्हते त्यामुळे तुलना तर नक्कीच होणार होती. पण फरहान अख्तरन शाहरुखला नीट समजावून सांगितले आणि शाहरुख देखील तयार झाला. २० ऑक्टोबर २००६ रोजी शाहरुख चा ‘डॉन’ प्रदर्शित झाला . चांगला यशस्वी झाला. नंतर २०११ मध्ये डॉन टू हा चित्रपट देखील आला आणि तो देखील हिट झाला.
आता २०२५ मध्ये डॉन थ्री येतो आहे. पण यामध्ये आता शाहरुख खान नाही ती भूमिका आता रणवीर कपूर करणार आहे!