लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

‘आता जाण्याची वेळ आली आहे’ मध्यरात्री Amitabh Bachchan यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे चाहते चिंतेत…
Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नुकतेच ८२ वर्षांचे झाले असून या वयातही ते सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. ते अनेकदा आपले विचार किंवा भावना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतेच ते ‘कल्की 2898‘ या सिनेमातही दिसले होते, जिथे त्यांचा अभिनय प्रेक्षकांना ही खुप आवडला होता. अमिताभ बच्चन यांनी 5 फेब्रुवारी ला मुलगा अभिषेक बच्चनच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. ती तुमच्याही चांगलीच लक्षात असेल. पण आता त्यांची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.(Amitabh Bachchan Shocking Tweet)

अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असले तरी ते रोज ब्लॉग आणि ट्विटरवर आपल्या मनाची स्थिती नक्कीच सांगतात आणि मनातील गोष्टीही शेअर करतात. पण अमिताभ यांनी एक अस ट्वीट केल ज्यामुळे फॅन्स घाबरले आणि त्यांना विचारू लागले की काय झाले आहे? सर्व काही ठीक आहे का? 82 वर्षांचे अमिताभ बच्चन यांनी 7 फेब्रुवारीच्या रात्री 8.34 वाजता ट्वीट केले, ‘जाण्याचा वेळ आली आहे.’ एका फॅनने त्यावर लिहिले आहे की, ‘असे म्हणू नका सर.’ तर दुसऱ्या फॅनने ‘काय झाले सर?’ असं ही विचारल आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये जाण्यासंदर्भात काय लिहिलं आहे किंवा कशाबद्दल बोलत आहेत याबद्दल काहीही स्पष्ट केलं नाही. पण या ट्विटनंतर चाहत्यांची चिंता वाढली असून नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी ते उत्सुक आहेत हे नक्की.या अभिनेत्याने यापूर्वी अनेक गूढ पोस्ट केल्या आहेत. याआधीही त्याने आपल्या पोस्टद्वारे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अभिषेक बच्चनच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त त्याने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या ब्लॉगवर एक जुना ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे, ज्यात तो रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात जन्मलेल्या अभिषेक कडे पाहत आहे.(Amitabh Bachchan Shocking Tweet)
===============================
हे देखील वाचा: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता Vicky kaushal!
===============================
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ‘कौन बनेगा करोडपती 16′ होस्ट करत आहेत. 2024 मध्ये ते रजनीकांत स्टारर ‘वेट्टायन‘ या चित्रपटात दिसले होते. सध्या त्यांनी कोणत्याही नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नसली तरी ते नितेश तिवारीयांच्या ‘रामायण’ या चित्रपटात झळकणार असल्याचे बोलले जात आहे.