Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Sahila Chaddha ‘हम आपके है कौन’ मधील ‘रिटा’ आठवते का? जाणून घ्या तिच्याबद्दल
बॉलिवूडमध्ये करियर करावे या इच्छेने अनेक लोकं मुंबईमध्ये येतात आणि आपले नशीब अजमावतात. मात्र सगळ्यांना यात यश मिळते असे नाही. काहींना काम मिळते मात्र त्यांना यश मिळत नाही. काही कलाकार असे देखील आहेत, त्यांनी काम केलेले सिनेमे सुपरहिट, ब्लॉकबस्टर झाले. पण सिनेमांना मिळालेल्या या यशाचा त्या कलाकरांना काहीच फायदा झाला नाही. कालांतराने हे कलाकार इंडस्ट्रीमधून गायब होतात किंवा ते स्वतःहून ही इंडस्ट्री सोडतात. (Sahila Chaddha)
अशीच अभिनेत्री आहे, जिने तिच्या करियरमध्ये अशा सिनेमात काम केले ज्या सिनेमामुळे त्या अभिनेत्रीला कायमची ओळख मिळाली आणि तिची भूमिका देखील गाजली. ही अभिनेत्री आहे अभिनेत्री साहिला चड्ढा (Sahila Chaddha). साहिला यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केले मात्र त्यांची सलमान खानच्या (Salman Khan) ‘हम आपके है कौन‘ (Hum Aapke Hain Kaun) या सिनेमातली भूमिका कमालीची गाजली. या चित्रपटात त्यांनी रिटा ही मजेशीर भूमिका साकारली होती. (Bollywood Masala)

१९९४ साली प्रदर्शित झालेला सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) दिग्दर्शित ‘हम आपके हैं कौन’ चित्रपट तुफान गाजला. आजही या सिनेमाचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरलेल्या या सिनेमातील प्रत्येक कलाकार आणि त्यांची भूमिका अजरामर झाली. या चित्रपटाने ९० च्या काळात छप्परफ़ाड कमाई केली. सिनेमातील कलाकारांसोबतच सलमान खान, माधुरी दीक्षित यांच्या भूमिका, सिनेमातील गाणी प्रचंड गाजली.याच सिनेमातील एका भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते आणि ती भूमिका म्हणजे रिटा. (Entertainment mix masala)
हो तीच रिटा जी सिनेमात सतत सलमान खानवर इंप्रेशन मारताना दिसते. आज सिनेमाला प्रदर्शित होऊन ३० वर्ष झाले मात्र अभिनेत्री साहिला चड्ढा यांना असे मोठे यश मिळाले नाही. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये कधीच मुख्य भूमिका साकारली नाही. त्या कायम सहायक भूमिकांमध्येच दिसल्या. नंतर मात्र हळूहळू साहिला चड्ढा इंडस्ट्रीमधून गायब झाला. मात्र सध्या साहिला करतात काय त्या कशा दिसतात? चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. (Bollywood Tadka)

साहिला चड्ढा यांनी वयाच्या १० व्या वर्षीच काम करण्यास सुरुवात केली होती. मिस इंडियाचा (Miss India) किताब जिंकलेल्या साहिला यांनी जवळपास २५ ब्युटी पेजेंट्समध्ये सहभाग घेतला होता. मिस इंडिया झाल्यानंतर साहिला चड्ढा यांनी १९८५ साली बॉलिवूडमध्ये ‘आय लव्ह यु’ या सिनेमातून पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक लहान मोठ्या भूमिका साकारल्या. हिंदीसोबतच साऊथच्या अनेक सिनेमामध्ये, भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. (Ankahi Baatein)
पुढे त्यांच्या आयुष्यात आला ‘हम आपके हैं कौन’ हा सिनेमा ज्या यशाची त्यांनी वाट पाहिली तेवढे नाही, मात्र तरीही मोठे यश त्यांना या सिनेमाच्या रूपाने मिळाले. त्यांची सिनेमातील ‘रिटा’ ही भूमिका कमालीची गाजली. पुढे त्या याच नावाने देखील प्रसिद्ध झाल्या. मात्र ही भूमिका, हा सिनेमा देखील त्यांचे करियर वर नेऊ शकले नाही. कसे बसे त्यांनी पुढील काही वर्ष बॉलिवूडमध्ये काम केले आणि नंतर त्यांनी इंडस्ट्रीला राम राम केला.

साहिला चड्ढा यांनी २००८ पर्यंत काम केले. त्यांचा मनीषा कोइराला आणि इरफान खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘तुलसी’ हा शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर २०१४ साली त्या एका शॉट फिल्ममधे देखील दिसल्या होत्या. आपल्या करियरमध्ये जवळपास साहिला यांनी ५० सिनेमे केले. सध्या त्या सिनेमांपासून दूर असल्या तरी सोशल मीडिया खूपच सक्रिय आहे. लिंक्डइन त्यांच्या प्रोफाइलमध्ये त्यांनी स्वतःला सिनेमा, टीव्ही आणि वेब सिरीज प्रोड्युसर सांगितले आहे.
यासोबतच साहिला यांचा रेस्टोरेंटचा देखील बिजनेस असून, स्टूडियो देखील आहे. यासोबतच त्या वेडिंग प्लानर आणि इंटीरियर डिजाइनर म्हणून देखील काम करतात. सोबतच प्रॉपर्टी डीलिंगचा देखील त्यांचा व्यवसाय आहे.
============
हे देखील वाचा : Ranveer Allahbadia रणवीर अलाहाबादियाने ‘त्या’ विवादित अश्लील प्रश्नावर मागितली माफी
============
१९८५ साली साहिला चड्ढाने ‘आय लव्ह यू’ चित्रपटातून आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी ती ‘मिस इंडिया’ विजेती झाली होती. १९८५ ते २०१४ पर्यंत साहिलाने ‘दौलत की जंग’, ‘बोल राधा बोल’, ‘अब इंसाफ होगा’, ‘नमक’, ‘आंटी नंबर १’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटात काम केलं. साहिलाने अनेक मोठ्या चित्रपटात काम केलं, पण तिला कधी मुख्य भूमिका मिळाली नाही. तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमधील सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘हम आपके हैं कौन’. या चित्रपटातदेखील तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.
साहिला चड्ढा यांनी अभिनेता निमाई बालीबरोबर लग्न केले आहे. मधल्या काही काळात त्यांच्या लग्नामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पतीवर अनेक आरोप केले होते. यामुळे त्या चर्चेत देखील आल्या होत्या. मात्र पुढे त्यांचे त्यांच्या पतीसोबत असलेले भांडण मिटले. आता ते सोबत आहेत.