Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

Sania Mirza चा 6 वर्षांचा मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? Farah Khan दिली साइनिंग अमाउंट…
Sania Mirza Son Izhaan: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा केवळ आपल्या खेळामुळेच नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. शोएब मलिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिचे नाव क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत ही जोडले गेले होते, परंतु तिच्या वडिलांनी सर्व अफवांना पूर्णविराम दिला. सानिया मिर्झा एकटीच आपल्या मुलाचे संगोपन करत आहे. सानिया मिर्झाचे बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत खूप चांगले संबंध आहेत हे अनेकांना माहित आहे. तिची बेस्ट फ्रेंड दुसरी कोणी नसून करोडपती दिग्दर्शिका फराह खान आहे. शाहरुख खानची मैत्रीण फराह खानने सानिया मिर्झाचा मुलगा इझहानला लाँच करण्याचे वचन दिले आहे.(Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry)

सानिया मिर्झाने फराह खानच्या चॅनेलसाठी स्वयंपाक केला. दरम्यान, फराहने तिचे आवडते चिकन 65 बनवले होते. यावेळी फराह खानने सानियाच्या मुलाला सांगितले की- विसरू नका, मी तुला लाँच करेन, तू माझा हिरो आहेस. या संदर्भात सानिया मिर्झानेही एक किस्सा शेअर केला आहे. ती सांगते की जेव्हा फराह पहिल्यांदा तिचा मुलगा इजहानला भेटायला आली तेव्हा तिने त्याला 10 रुपयांची नोट दिली होती. यावेळी फराह खानने सांगितले होते की, मी त्याला लाँच करेन.

व्लॉगमध्ये सानिया आपला मुलगा इझहानसोबत बसलेली दिसत आहे. तिने फराहबद्दल एक गमतीशीर किस्सा शेअर केला आहे. सानियाने सांगितले की, जेव्हा तिचा मुलगा इजहानचा जन्म झाला तेव्हा फराह त्याला भेटायला यायची. त्यावेळी फराहने इझहानला १० रुपये दिले आणि गंमतीने त्याला चित्रपटात लाँच करणार असल्याचे सांगितले. तेव्हा फराह म्हणते, ‘फक्त १०० म्हणा.’ तेव्हा सानिया म्हणाली, ‘पण तू १० रुपये दिलेस. मला खोटं बोलायचं नाहीये.'(Sania Mirza Son Izhaan Bollywood Entry)
====================================
हे देखील वाचा: Ranveer Allahbadia ने ढसाढसा रडत मागितली माफी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचे सत्य?
====================================
फराह खान स्वतः पुढे सांगते की, ती साइनिंग अमाउंट होती. मात्र, हा सगळा प्रकार त्या विनोदी पद्धतीने सांगत होते. भविष्यात फराह खान तिच्या बेस्ट फ्रेंडच्या मुलाला लाँच करण्याची शक्यता आहे, पण तो बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सानिया मिर्झाने आपल्या मुलाला चित्रपटात पाठवायचे आहे की नाही याचा खुलासा केला नसला तरी तिने एक जुना किस्सा शेअर केला आहे. यावेळी सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झाही उपस्थित होती.