Mandakini : नेपोटिझमच्या शर्यतीत मंदाकिनीच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या…

Namrata Sambherao : नम्रता संभेरावला मिळाला मानाचा झी पुरस्कार
लहान असो किंवा मोठे प्रत्येक व्यक्तीसाठी त्याने त्याच्या जीवनात केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळणारी शाबासकी आणि बक्षिसे खूपच महत्वाचे असतात. चांगल्या कामासाठी केले जाणारे कौतुक हे प्रत्येक व्यक्तीला अधिक चांगले काम करण्यासाठी कायम प्रेरणा देते. कलाकारांसाठी त्यांच्या कामाचे कौतुक म्हणजे प्रेक्षकांकडून मिळणारी शाबासकी आणि दिले जाणारे पुरस्कार. प्रत्येक कलाकारासाठी त्याला मिळणार लहान, मोठा सर्वच पुरस्कार विविध कारणांमुळे खास असतात. (Namrata Sambherao)
पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकार अधिक प्रभावी आणि जोमाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांउळे कलाकारांना मिळणारे पुरस्कार हे खूपच महत्वाचे असतात. प्रत्येक नवीन वर्ष हे मनोरंजनविश्वासाठी खूपच विशेष असते. कारण नवीन वर्ष सुरु झाले की, लगेच विविध पुरस्कार सोहळे संपन्न होतात आणि मागील वर्षभरात कलाकारांनी केलेल्या कामाचा कौतुक सोहळा संपन्न होतो. त्यामुळे कलाकारांसाठी नवीन वर्षाची सुरुवात खूपच महत्वाची आणि खास असते. (Marathi Entertainment News)

अशातच मराठी मनोरंजनविश्वातील महत्वाचा आणि मानाचा समजला जाणारा झी मराठीचा ‘झी चित्र गौरव‘ (Zee Chitra Gaurav) पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी कलाकारांसोबत प्रेक्षक देखील उत्सुक असतात. अतिशय मोठा असणारा हा पुरस्कार आपल्याला एकदा तरी मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. हीच इच्छा यावर्षी एका गुणी अभिनेत्रीची पूर्ण झाली आहे. (Namrata Sambherao Post)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या गाजलेल्या कार्यक्रमातून आपल्या विनोदाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी आणि त्यांना खळखळून हसवणारी अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव (Namrata Sambherao). नम्रताने या शोच्या माध्यमातून तिच्यात असणाऱ्या एका प्रगल्भ आणि प्रभावी अभिनेत्रीचे वेळोवेळो सर्वांना दर्शन घडवले आहे. नम्रताने अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करताना तिच्यातल्या उत्तम अभिनेत्रीला समोर ठेवले आहे.
मागच्यावर्षी नम्रतासाठी ‘नाच गं घुमा‘ (Nach Ga Ghuma) सिनेमाच्या निमित्ताने एक उत्तम, वेगळी, महत्वाची भूमिका आली आणि तिने या भूमिकेचे सोने केले. याच भूमिकेसाठी नम्रताला झी चा विनोदी अभिनेत्रीचा मानाचा पुरस्कार मिळाला. तिने हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिचा आनंद आणि तिच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. सध्या नम्रताची ही पोस्ट खूपच गाजत आहे.
नम्रताने या सोहळ्यातील तिचे दोन फोटो शेअर करत लिहिले, “आणि ते झी चित्र गौरव चं गाणं वाजलं माझ्यासाठी, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री नम्रता संभेराव चित्रपट नाच गं घुमा त्या क्षणी पोटात गोळा आला. आनंद सुख समाधान सगळं एकवटून आलं , हे लहानपणी tv वर बघितलं होत, कोणाला पारितोषिक मिळाल कि डोळ्यात पाणी यायचं मग ते अनोळखी असलं तरी . आणि तो दिवस माझ्या आयुष्यात आला.
A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)
भरत जाधव सरांनी नाव पुकारलं नमु , अंगावर सरसरून काटा आला. विनोदाचे महारथी भरत जाधव सरांकडून मला अवॉर्ड मिळालं खूपच भारी वाटलं .समोर विनोदाचे बाप बसले होते, अशोक सराफ, सचिन पिळगावकर महेश कोठारे काय बोलावं साठवून ठेवावा असा क्षण २० वर्ष झाली सिने नाट्य सृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका करत इथवर पोहोचले. (Entertainment Mix Masala)
गर्दीतून हळू हळू अनेक अनुभवांसह शिकत शिकत स्वतःला पुढे ढकलत आज प्रमुख भूमिकेसाठी बक्षीस मिळवलं. प्रामाणिकपणे कलेवर प्रेम केलं करत राहीन . झी चित्र गौरव च्या सर्व परीक्षकांचे मनापासून आभार. आशा च्या भूमिकेसाठी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला ते म्हणजे परेश मोकाशी मधुगंधा कुलकर्णी ह्या दोन अत्यंत हुशार हरहुन्नरी व्यक्तींनी ,तुमचे सुद्धा खूप खूप आभार. मुक्ता ताई माझं प्रेरणास्थान तुझेही आभार नाच गं घुमा च्या सगळ्या समूहाचे निर्मात्यांचे मनापासून आभार ह्या सगळ्यात तुमचाही मोठा वाटा आणि प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार.” (Latest Marathi NEws)
=============
हे देखील वाचा : Gopaldas Neeraj : “या” निर्मात्याने गीतकाराला गिफ्ट केली स्वतःची कार !
=============
दरम्यान नम्रताच्या या पोस्टवर कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. नम्रताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या सिनेमात झळकणार आहे. तिच्यासोबत या सिनेमात प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, प्रभाकर मोरे, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, ऐश्वर्या बडदे, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे या कलाकारांची फौज दिसणारआहेत.