Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक वर्ष धरला होता अबोला
मनोरंजनविश्वात वावरताना नेहमीच कलाकारांना काही रंजक, भन्नाट, गंमतीशीर, संस्मरणीय अनुभव येतच असतात. या अनुभवांमुळे कलाकर नेहमीच समृद्ध होतात. कलाकारांचा अभिनय पाहून आपण आपण अनेकदा विसरून जातो की, समोर घडणारे सर्वच खोटे आहे. तो केवळ अभिनय आहे, याचे देखील आपल्याला भान राहत नाही. यात त्या कलाकारांचे कसब आणि त्याचीच मेहनत असते की तो एवढा जिवंत अभिनय करतो. याच्याशी संबंधित बऱ्याचदा कलाकारांना विविध अनुभव येतात. (Ashok Saraf)
आज आधुनिक काळ आणि सोशल मीडिया असल्यामुळे आपल्याला हे माहीतच असते की, कलाकार हे फक्त अभिनय करत असतात. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसते. पण आधीच्या काळात लोकांना कलाकारांचा अभिनय पाहून ते खरी आहे की, खोटे हेच लक्षात येत नसायचे. त्यामुळेच प्रेक्षक काही कलाकारांवर प्रेम करायचे तर काही कलाकारांचा दुस्वास करायचे. असे अनुभव प्रत्येक कलाकाराला त्याच्या कारकिर्दीत येतातच. मग याला आपले सर्वांचे लाडके मामा अर्थात पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) कसे अपवाद ठरतील बरं? (Entertainment News)

हो मग काय…! अशोक मामांनी देखील अशाच एका अनुभवाचा सामना केला आहे. त्यांच्या अभिनयाचे कौशल्य पाहून मराठी, हिंदी इंडस्ट्री गाजवणारी एक अभिनेत्री तर चक्क त्यांच्याशी २० वर्ष बोलली नव्हती. मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, एकदा तरी अशोक मामांसोबत काम करावे. त्यांना जवळून पाहावे. मात्र एक अभिनेत्री अशी होती, जिच्याशी मामांनी स्वतःहून बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला, मात्र तरीही ती त्यांच्याशी अनेक वर्ष एका कारणासाठी बोलली नव्हती. खुद्द त्यांनीच त्यांचा हा गंमतीशीर किस्सा सगळ्यांना सांगितला. मामांनी त्यांच्या मोठ्या करियरमध्ये फक्त विनोदीच नाहीतर अनेक विविध भूमिका लीलया साकारल्या. त्यांचा ‘वाट पाहते पुनवेची’(Vaat Pahate Punvechi) हा १९९१ साली आलेला एक कौटुंबिक सिनेमा होता. (Marathi Entertainment News)

‘वाट पाहते पुनवेची’ या चित्रपटात अशोक सराफ यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. तर अभिनेते डॉ. गिरीश ओक (Girish Oak) यांनी एका अपंग व्यक्तीची भूमिका साकारली होती. सिनेमात अशोक सराफ हे गिरीश ओक यांना खूपच त्रास देतात त्यांना मारहाण करतात असे दाखवण्यात आले होते. जेव्हा हा सिनेमा आणि त्याचे काही सीन अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी असलेल्या अभिनेत्री गिरीजा ओकने पाहिले तेव्हा तिला मामांचा खूपच राग आला. तिला वाटले ‘हा माणूस माझ्या बाबांना किती त्रास देतोय.’ अर्थात तेव्हा गिरीजा लहान होती. (Marathi Latest News)
============
हे देखील वाचा : Madan Mohan : संगीतकार मदन मोहन यांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार!
============
अशोक मामांची आणि गिरीजाची जेव्हा जेव्हा भेट झाली तेव्हा तेव्हा ती त्यांना ओळखच दाखवत नव्हती. त्यांच्याशी बोलायची नाही. आता मामांना कळेच ना की काय झाले नक्की ही अशी का वागते. मात्र नंतर त्यांना हे जेव्हा समजले तेव्हा त्यांना खरे तर हसूच आले. तेव्हा त्यांनी स्वतःलाच सॅल्यूट देखील केला होता.