Laxman Utekar: छावा निमित्त लक्ष्मण उतेकर यांची विशेष मुलाखत

Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाचीच हवा पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांसोबतच कलाकारांना देखील भुरळ घातली आहे. कलाकारांचा अभिनय, कथा, संगीत, दिग्दर्शन आदी सर्वच गोष्टी जुळून आल्याने सिनेमा सर्वच बाबतीत अव्वल ठरत आहे. सोशल मीडिया देखील पूर्णपणे छावामय झाले आहे. सिनेमा पाहून कलाकार, सामान्य प्रेक्षक सर्वच त्यांच्या भावुक प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. (Chhaava)
आतापर्यंत छावा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत ३०० कोटींपेक्षा जास्तही कमाई केली असून, अजून हा आकडा वाढणारच आहे. सिनेमाने फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेला दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर भाष्य करणाऱ्या या सिनेमावर जरी सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असला तरी काहींना कमी अधिक प्रमाणात सिनेमावर टीका देखील केल्याचं चित्र आहे. सिनेमातील काही त्रुटी देखील अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मांडल्या आहेत. अशातच मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या अक्षता आपटेने (Akshata Apte) देखील सिनेमाबद्दल तिची नाराजी व्यक्त केली आहे. (Chhaava Movie)

अक्षताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला या सिनेमातील खटकणाऱ्या गोष्टींवर भाष्य करताना लिहिलं, “‘छावा’बद्दल सांगायचं झालं तर…
हा सिनेमा एकदा पाहू शकतो असा आहे.
जे आपल्याला आधीच माहिती आहे तेच दाखवलंय.
पहिला भाग ( मध्यांतराच्या आधी ) – ….
दुसरा भाग ( मध्यांतरानंतर ) – फायर इमोजी
सिनेमॅटोग्राफी – ✓
स्क्रिप्ट – X
चित्रपटाचं संगीत – Big Nooo ( मध्यांतराच्या आधीचं बॅकग्राऊंड म्युझिक अजिबात चांगलं नाहीये )
दिग्दर्शन – ✓ & X
वेशभूषा आणि केसांचा मेकअप – ✓✓✓
विकी कौशल – ✓✓✓ ( लव्ह इमोजी वापरले आहेत )
अक्षय खन्ना – ✓✓✓✓✓✓
रश्मिका मंदाना – XXXXXXX
सहाय्यक कलाकार – ✓✓✓
एकंदर मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी हा एक चांगला चित्रपट आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याबद्दल अजून जाणून घ्यायची अपेक्षा होती. अन्य प्रेक्षकांप्रमाणे मलाही शेवटचा क्षण पाहून प्रचंड रडू आलं पण, चित्रपटाच्या प्रभावामुळे असं झालेलं नाही. तर, आपण महाराजांचा आदर करतो म्हणून आपल्या भावना दाटून आल्या. दुर्दैवाने, सिनेमात रश्मिकाचा तोच अॅक्सेंट ऐकायला मिळतो, तिची अभिनय शैली तशीच दिसते जी आपण तिच्या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये पाहिलीये. यामुळेच तिला महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत स्वीकारणं अजिबातच जमत नाही. विकीने या चित्रपटात उत्तम काम केलं आहे, त्याला या रुपात आपण यापूर्वी पाहिलेलं नाहीये. पण, स्क्रिप्टमध्ये आणखी वैविध्यपूर्णता असती तर त्याला आणखी छटा दाखविण्याची संधी मिळाली असती.(Entertainment Masala)
======
हे देखील वाचा : Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक वर्ष धरला होता अबोला
======
खूप कमी संवाद मराठीमध्ये ठेवलेत राव… त्यांनी हा सिनेमा मराठीमध्ये सुद्धा का बनवला नाही? मराठी लोकांना आणखी कनेक्ट होता आलं असतं…”(Chhaava Movie Review)
दरम्यान अक्षताबद्दल बोलायचे झाले तर ती मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत ‘३६ गुणी जोडी’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. सोशल मीडियावर अक्षता कमालीची सक्रिय असून, ती सतत विविध सामाजिक प्रश्नावर तिचे मत मांडत असते.