
ankita walawalkar marriage : अंकिता वालावलकरचं सासरी दणक्यात स्वागत
फेब्रुवारी म्हटलं की लग्नसराई आलीच… सामान्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत अनेक कपल्स सात जन्मांसाठी एक होत लग्न बंधनात अडकतात. नुकतीच सर्वांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर (ankita walawalkar) हिने संगीतकार कुणाल भगत सोबत संसार थाटला. कोकणात तिच्या गावी पारंपरिक पद्धतीने अंकिताचा विवाह सोहळा संपन्न झाला. तिच्या लग्नातील प्रत्येक क्षण सोशल मिडियावर फोटोच्या रुपात लोकांपर्यंत पोहोचत होतेच आणि त्यावर तिचे चाहते कमेंट्सच्या स्वरुपात तिचा शुभेच्छा देत होतेच. लग्नानंतर आता अंकिता देवळाहून थेट तिच्या सासरी माणगावच्या घरी ग्रॅन्ड एन्ट्री घेतली आहे.

अंकिताने (ankita walawalkar) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या सासरी माणगावला तिचं स्वागत कसं झालं याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की तिच्या सासरच्या मंडळींनी लाडक्या सूनेच्या स्वागतासाठी खास तयारी करत गृहप्रवेशासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढली होती. अंकिताचा कोकणातील परंपरेनुसार गृहप्रवेश करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी दोघांनीही संदर उखाणे घेतले.
===========
हे देखील वाचा : ‘Big Boss Marathi’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन कार्य;अंकिता आणि निक्की यांच्यात होणार कडाक्याचं भांडण
===========
गृहप्रवेशावेळी अंकिताने, “समुद्रकिनारी जुळल्या गाठी, कुणालचं नाव घेते साताजन्मासाठी…” असा उखाणा घेतला. तर कुणाल उखाणा घेत म्हणाला, “सरीवर सरी पावसाच्या सरी, अंकिताच माझी कोकणपरी”. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून लग्नानंतरच्या नव्या वाटचालीसाठी अंकिता आणि कुणाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (ankita walawalkar)