
Salman Khan : हॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्री पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसलीच नाही
गेल्या काही काळापासून अभिनेता सलमान खान (Salman Khan) विशेष चर्चेत होता. १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणात अडलेल्या सलमानच्या मागे बिश्नोई गॅंग अगदी हात धुवून पाठी लागली होती. त्याच्या राहत्या बांद्राच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता. त्या संपूर्ण प्रकरणानंतर सलमान आणि त्याच्या घरच्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. पण या सगळ्या बिश्नोई प्रकरणात सलमान खानच्या चित्रपटांबद्दल चर्चा काहीशी पुसट होत गेली. पण तुम्हाला माहित आहे ना आजपर्यंत सलमान खानने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिलाय. सलमानने एकच हॉलिवूड चित्रपट केला होता जो हिंदीतही प्रदर्शित झाला होता आणि त्यात एक हॉलिवूडची अभिनेत्री होती. पण सलमानसोबत फक्त एकच चित्रपट तिने केला आणि त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये परत दिसलीच नाही. नेमका कोणता तो चित्रपट होता आणि ती एक्ट्रेस होती तर कोण?

सलमान खान (Salman Khan) ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ बॉलिवूड इंडस्ट्री गाजवतोय. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘करण-अर्जुन’, ’साजन’, ’कुरबान’, ‘अंदाज अपना अपना’ असे अनेक सुपरहिट चित्रपट त्याने चाहत्यांना दिले. मात्र, सलमानने सगळेच चित्रपट हिट झाले असे नाही. तर त्याचे काही चित्रपट सुपर फ्लॉप देखील झाले होते. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘मॅरीगोल्ड’ (Marigold). खरं तर हा सलमान खानचा एकमेव हॉलिवूड चित्रपट होता जो हिंदी भाषेतही रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाची कथा एका अमेरिकन अभिनेत्री जीवनावर आधारित होता आणि तिच्या प्रियकराच्या भूमिकेत सलमान खान होता.

‘मॅरीगोल्ड’ चित्रपटाच्या निमित्ताने हॉलिवूड अभिनेत्री Ali Larter हिने पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात काम केले होते. पण त्यानंतर पुन्हा ती कोणत्याच बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन Willard Carroll यांनी केलेलं. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रप सपशेल आपटला होता. २००७ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट १९ कोटींमध्ये तयार केला होता आणि या चित्रपटाने केवळ २ कोटींची कमाई केली होती. (bollywood masala)
===========
हे देखील वाचा : Salman Khan Birthday बॉलिवूडचा वन अँड ओन्ली भाईजान सलमान खान
===========
एकीकडे अमेरिकेन फिल्म इंडस्ट्रीत एकाहून एक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या Ali Carter च्या करिअरमधला Marrigold हा अगदीच टुकार चित्रपट निघाला आणि त्यामुळे तिच्या अभिनय कौशल्यावर आणि चित्रपटांच्या निवडीवर तिच्या चाहत्यांनी प्रश्न देखील विचारले. त्यामुळे आपल्या मुळ अमेरिकन चित्रपटसृष्टीत काम सातत्याने मिळत राहावे याचा विचार करत कुठेतरी Ali हिने पुन्हा बॉलिवूडकडे वळून पाहिलेच नाही. (Hollywood-Bollywood)
Ali Carter हिने ‘फायनल डेस्टिनेशन’, ‘रेसिडेंट एव्हिल’, ‘ड्राईव्ह मी क्रेझी’, ‘हाऊस ऑन हॉंटेड हिल’, ‘द लास्ट विक्टिम’ अशा अनेक अमेरिकन चित्रपटात कामं केली आहेत. शिवाय Ali हि केवळ अभिनेत्रीच नसून एक सुप्रसिद्ध मॉडेल देखील होती. (Ali Carter)