Ariana Grande : वजन घटलं, हाडांचा झाला सापळा, अभिनेत्रीला झालं

Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?
तब्बसूम फातिमा हाश्मी अर्थात सगळ्यांची लाडकी अभिनेत्री तब्बू… ९०च्या दशकापासून जरी ती चित्रपटांमध्ये काम करत असली तरी आजही तिचा चाहता वर्ग तिच्या सौदर्याचा आणि अभिनयाचा तितकाच फॅन आहे. दाक्षिणात्य चित्रपट असोत किंवा मग हिंदी प्रत्येक भाषेतील चित्रपटात तिचा निरागसपणा आणि तिचं अॅक्टिंग स्किल तीने वेगवेगळ्या पद्धतीने कायमच सादर केलं. राष्ट्रीय पुरस्काराने नाव नोंदवणाऱ्या तब्बूने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले. पण तुम्हाला माहित आहे का की तिने चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारला होता. हो. त्याचबद्दल आपण आजच्या लेखाच जाणून घेणार आहोत. शिवाय तब्बूबद्दल आणि त्या चित्रपटाबद्दलही माहिती जाणणार आहोत… (Tabu And Baghban Movie)
“मुझे माफ कर दो”
९०च्या दशकात किंवा अगदी २००० सालाच्या सुरुवातीला फॅमेली वॅल्यूज किंवा एकत्र कुटुंब पद्धती, आपली संस्कृती यावर भाष्य करणारे चित्रपट प्रदर्शित होत होते. त्यात अनेक चित्रपटांची नावं आहेत आणि त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘बागबान’ (Baghban). २००३ साली रवी चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट आला होता ज्यात प्रमुख भूमिका अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांनी साकारली होती. पण ज्यावेळी स्टोरी पुर्ण झाली होती तेव्हा हेमा मालिनी नव्हे तर त्यांच्या जागी तब्बू ही दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. होय. रवी चोप्रा यांच्या पत्नी रेणू चोप्रा यांनी नुकतीच पिंकव्हिलाला एक मुलाखत दिली आणि त्यात त्यांनी याबाबत खुलासा केला. रेणू म्हणाल्या की, तब्बूला बागबान चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण तिने ती नाकारली. तर झालं असं की, तब्बूला ज्यावेळी चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली होती तेव्हा ती रडत होती. आणि आम्हाला कुणीतरी असं सांगितलं होतं की ज्यावेळी तब्बू स्क्रिप्ट ऐकताना रडते तेव्हा ती तो चित्रपट नाकाराते आणि बागबानच्या बाबतीत तेच झालं. तब्बू आम्हाला म्हणाली की, माझं वय कमी आहे आणि माझ्यासमोर माझं संपूर्ण करिअर घडवायचं बाकी आहे त्यामुळे मी आत्ताचं ४ मुलांच्या आईचा रोल करणार नाही, मला यावेळी माफ करा”. (Bollywood gossip)

तब्बू नंतर मग चित्रपटात एन्ट्री झाली ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांची आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी अभिनयाची तुफान फटकेबाजी करत चित्रपटाला वरच्या स्तरावर नेऊन ठेवलं. ‘बागबान’ या चित्रपटाची कथा थोडक्यात सांगायची झाल्यास, आई-वडिल आणि ४ मुलं अशा कुटुंबाची ही कथा. ज्यात आई-वडिल त्यांच्या मुलांचं योग्य संगोपन करतात आणि त्यांच्या म्हातारपणात आपली मुलं आपला सांभाळ नीट करतील अशी अपेक्षा बाळगतात. पण त्याच मुलांना आई-वडिलांचे ओझे वाटू लागतं आणि घरात आलेल्या सुना त्यांचा सांभाळ करण्यास नकार देतात आणि त्यानंतर एक हसं खेळतं कुटुंब कसं विखरतं याचं खरं तर वास्तववादी चित्रण ‘बागबान’ चित्रपटाच्या कथेतून मांडण्यात आलं आहे. २००३ साली ‘बागबान’ हा चित्रपट १० कोटींमध्ये तयार केला गेला होता आणि त्या चित्रपटाने ४३ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. (Tabu And Baghban Movie)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
हिंदी नाही तर दाक्षिणात्य भाषेतून केला डेब्यू
आता जरा वळूयात तब्बूकडे. काही कलाकार असतात ज्याचं फक्त त्यांचा कामावर फोकस असतो. पण चंदेरी दुनिया म्हटलं की पार्टीस् या आल्याच. मात्र, तब्बू कामचं त्यापासून लांब राहिली. तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारसं काही हेडलाईन्समध्येही छापून आलं नाही. तीने कायम आपल्या बेटर अॅक्टिंगवर फोकस केला आणि एकामागून एक संहितेच्या दृष्टीनेही सुपरहिट चित्रपट दिले. वयाच्या दहाव्या वर्षापासून तब्बूने अभिनयाची सुरुवात केली. ‘बाजार’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून तिनं कामं केलं. त्यानंतर देव आनंद (Dev Anand) यांच्या ‘हम नौजवान’ या चित्रपटात तिने थेट त्यांच्या मुलीचीच भूमिका साकारली होती. बालकलाकार म्हणून जरी तिने हिंदी चित्रपटांपासून सुरुवात केली असली तरी पहिला मुख्य अभिनेत्री म्हणून ब्रेक तिला तेलुगू चित्रपट ‘कुली नं १’ यात मिळाला ज्यामध्ये अभिनेता वेंकटेशसोबत तिने स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर हिंदीत तिने १९८७ साली बोनी कपूर यांच्या ‘प्रेम’ या चित्रपटातून पदार्पण केलं; पण तो चित्रपट फारसा चालला नाही. मात्र, १९९४ ला अजय देवगण (Ajay Devgan) सोबत तब्बूने ‘विजयपथ’ हा चित्रपट केला आणि त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीला तब्बू हा एक नवा चेहरा लीड अॅक्ट्रेस म्हणून मिळाला. त्यानंतर ‘जीत’, ‘साजन चले ससूराल’, ‘हवा’, ‘जाल’, ‘अस्तित्व’, ‘चाची ४२०’ असे अनेक चित्रपट तिने केले. (Entertainment Trending News)
शबाना आझमी आणि तब्बूचं कनेकश्न
बरं तब्बू बद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की ती ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी भाची आहे. त्यामुळे अभिनय किंवा कला ही तिच्या नसानसांमध्ये असणारच. आणि एक म्हणजे, ‘ब्युटी विथ ब्रेन्स’ या संकल्पनेत काही मोजक्या अभिनेत्रींची नावं नक्कीच येतात ज्यात तब्बूचं नाव घेण्यास काही हरकत नाही. अलीकडच्या काळात ‘दृश्यम’, ‘क्रु’, ‘भोला’ हे तिचे नवे चित्रपट आले होते. लवकरच ‘दे दे प्यार दे २’, प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ (Bhooth Bangala) या चित्रपटातही ती दिसणार आहे. त्यामुळे आता तब्बूचं नवं कोणतं रुप पाहायला मिळणार याची उत्सुकता नक्कीच तिच्या चाहत्यांना लागली असेल यात शंका नाही. ((Tabu And Baghban Movie)