Ariana Grande : वजन घटलं, हाडांचा झाला सापळा, अभिनेत्रीला झालं

Amir Khan : गेल्या २० वर्षांपासून चित्रपटासाठी आमिरनं मानधन का घेतलं नाही?
बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान कायमच हटके चित्रपट आणि भूमिका करताना दिसला आहे. अंदाज अपना अपना सारखा चित्रपट असो किंवा मग राजा हिंदुस्थानी दोन्ही चित्रपटांच्या genere नुसार त्याच्या अभिनयातील वेगवेगळे पैलू त्याने चाहत्यांसमोर उलगडून दाखवले आहेत. असं म्हणतात की बॉलिवूड इंडस्ट्री तीन खान्समुळे इतकी पुढे आली आहे. अर्थात अमिताभ बच्चन या सगळ्यांचे बाप आहेतच त्यामुळे त्यांचा इथे वेगळाच ऑरा आहे. तर, तीन खान म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान. तिघांचंही करिअर साधारण ९०च्या दशकातलं. तिघांचा असं स्वत:चं वेगळं अस्तित्व आहे आणि त्यांनी ते टिकवून ठेवलं आहे. आता संपूर्ण बॉलिवूडची ओळख या खान्स मुळे आहे तर त्याच पद्धतीने ते चित्रपटासाठी मानधन घेत असतील यात शंका नाही. पण तुम्हाला माहित आहे का की आमिर खानने गेल्या २० वर्षांमध्ये जे चित्रपट केले त्याचं मानधन घेतलं नाहीये. आता नेमकं असं त्याने काय केलं आणि चित्रपटाच्या आर्थिक गणिताविषयी तो काय बोलला जाणून घेऊयात…(Amir Khan)
आमिर खान मुळात फारश्या मुलाखती देत नाही. पण अलीकडेच त्याने एबीपी न्यूजला दिलेली मुलाखत विशेष चर्चेत आहे. कारण, यामध्ये त्याने चित्रपटांमधून तो पैसे कसे कमावतो किंवा मानधन घेतो की नाही याबद्दल तो व्यक्त झाला आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा त्याने अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली तेव्हा तो मानधन घेत होता; पण गेल्या २० वर्षांपासून तो आपली फी घेत नाहीये. त्याऐवजी केवळ चित्रपट चालला, बॉक्स ऑफिसवर गाजला तरच तो निर्मात्यांकडून आपली फी घेतो. (Bollywood News)
आमिर (Amir Khan) याने त्याच्या मानधनाबद्दल बोलताना म्हटलं की, “गेल्या २०-२१ वर्षांपासून मी चित्रपट केला तरी फी घेत नाही. त्यामुळे जर का प्रेक्षकांना चित्रप आवडला तर मी कमावतो आणि जर का त्यांना नाही आवडला तर मी कमावत नाही. त्यामुळे प्रमुख अभिनेता म्हणून गेल्या २०२१ वर्षांत मी जे जे चित्रपट केले त्यात जे लोकांना आवडले त्यातूनच मी पैसे कमावले आहेत”. मुळात जेव्हापासून आमिरने अभिनेता ते निर्माता हा प्रवास केला आहे तेव्हापासून चित्रपटाचं आर्थिक गणित त्याला समजायला लागलं आहे. त्यामुळे जर का एखादा चित्रपट बनवण्यासाठी २०० कोटी रुपये खर्च होतात आणि त्यातच प्रमुख कलाकार भली मोठी फी आकारतो तर चित्रपटाचा जो निर्मिती खर्च झाला असेल तो प्रदर्शनानंतर रिकव्हर कसा होणार याचा तो विचार करतो. (Bollywood update)
===========
हे देखील वाचा : Tabu And Baghban Movie : बिग बींसोबतचा चित्रपट तब्बूने का नाकारला?
===========
…यामुळे मला माझ्या आवडचीचं काम
बरं, पुढे त्याच मुलाखतीत आमिर असं म्हणाला की, “मी आजही इंडस्ट्रीतून पैसा कमावण्यासाठी जुन्या पद्धतीचा उपयोग करतो. आणि त्यामुळे मला माझ्या आवडचीचं काम, चित्रपट, कॅरेक्टर निवडण्याची मुभा आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये त्याने केलेले चित्रपट. ‘पीके’, ‘३ इडियट्स’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘दंगल’, ‘तलाश’ आणि बरेच. आमिर खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच आमिर ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात अभिनेता म्हणून दिसणार आहेच पण हा चित्रपट तो कॉ प्रोड्यूस देखील करणार आहे. याशिवाय, ‘लाहौर १९४७’ या चित्रपटाची निर्मिती देखील तो करणार असून यात प्रितीच झिंटा (Preity Zinta) आणि सनी देओल (Sunny Deol) बऱ्याच वर्षांनंतर एकत्र मोठा पडदा शेअर करणार आहेत. (Amir Khan)

quantity over quality हे मंत्र जपलं
आमिर खाननं (Amir Khan) अलीकडच्या काळात विविष विषय हाताळणारे चित्रपट केले. पण आजही ‘इश्क’, ‘कयामत से कयामत तक’, ‘अव्वल नंबर’’, ‘दिल’, ‘जवानी जिंदाबाद’, ‘दिल है के मानता नही’, ‘दामिनी’, ‘’हम है राही प्यार के’, ‘जो जिता वही सिकंदर’, अशा जुन्या गाजलेल्या चित्रपटांसाठी विशेष आठवतो. आमिर खानने कायमच quantity over quality हे मंत्र जपलं आहे असं त्याच्या प्रत्येक चित्रपातून जाणवतं. त्यामुळे नक्कीच आगामी काळात अनेक नवे प्रोजेक्ट मिस्टर परफेक्शनिस्ट घेऊन येईलच पण त्यातही त्याच्या काही जुन्या चित्रपटांचा रिमेक झाला तर नक्कीच तो त्याच्या चाहत्यांना आवडेल यातही शंका नाही.