Ariana Grande : वजन घटलं, हाडांचा झाला सापळा, अभिनेत्रीला झालं

Chhaava : बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या ‘छावा’चा बोलबाला
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झाला. लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत सुरुवात करत हिंदी चित्रपटांना दिलासाच दिला आहे. २०२५ या नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात करत छावा चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे. (Chhaava)
’छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सात दिवसांमध्ये चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २२५.२८ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी ३१ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५.२५ कोटी, सहाव्या दिवशी ३२ कोटी, सातव्या दिवशी २१.५ कोटी, आठव्या दिवशी २३.५ कोटी, नवव्या दिवशी ४४ कोटी, दहाव्या दिवशी ४० कोटी, अकराव्या दिवशी १८.५ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण ३४५.२५ कोटी कमावले आहेत.

दरम्यान, ‘छावा’ चित्रपटामध्ये विकीसह (Vicky Kaushal) रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, vineet singh, दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, संतोष जुवेकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. (Box office collection)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
छत्रपती संभाजी महाराजांचे गौरवशाली चरित्र मांडणाऱ्या या ऐतिहासिक चित्रपटात कवी कलश यांची भूमिका अभिनेता विनीत कुमार सिंगने (Vineet Kumar Singh) अगदी चोख बजावली आहे. एका मुलाखतीत त्याने सांगतिलं की, “गेले २३ वर्ष तो मुंबईत राहात आहे पण अजूनही त्याचं स्वत:चं मुंबईत घर नाहीये. विनीत सिंग असं म्हणाला की, “२३ वर्ष झाली मी मुंबईत आहे पण माझं हक्काचं घर नाही आहे. इतकं काम करुनही मी माझं स्वत:चं असं घर खरेदी करु शकलो नाही. एकेकाळी मी महेश भट्ट यांचा धोका हा चित्रपट करत होतो त्यावेळी महेश सर आलियाला सेटवर घेऊन यायचे. मी त्यावेळीही स्ट्रगल करत होतो आणि आजही स्ट्रगलर करतोय. परंतु, असा किती काय स्ट्रगल करायचा हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे”, असे म्हणत विनीत भावूक झाला. विनितने ‘लालबाग परळ’ या मराठी चित्रपटात काम केलं होतं. याशिवाय त्याने, ‘मुक्काबाज’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘मॅच फिक्सिंग’ या चित्रपटांतही तो झळकला आहे. (Trending news)