Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Shreyas Talpade : छोट्या पडद्यावर होस्ट म्हणून करणार कमबॅक!
मराठी असो किंवा हिंदी दोन्ही मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणार अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. झी मराठी वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश ही भूमिका साकारताना दिसला होता. बरं त्या मालिकेतही श्रेयसने ‘आभाळमाया’ (Abhalmaya) या मालिकेनंतर १८ वर्षांनी तो मालिकेत पुन्हा दिसला होता. आभाळमाया या मालिकेमुळे बऱ्याच कलाकारांनी एक नवी ओळख मिळाली होती आणि त्यापैकीच एक श्रेयस होता. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेलाही प्रेक्षकांनी इतकं आपलंसं केलं होतं की पुन्हा एकदा नेहा-यश ही जोडी भेटीला यावी असा त्यांचा आग्रह होता. पण जरी यश पुन्हा आला नसला तरी श्रेयस मात्र छोट्या पडद्यावर लवकरच येतोय. झी मराठी वाहिनीवर ‘चल भावा सिटीत’ हा रिअॅलिटी शो लवकरच सुरु होणार असून त्याचा प्रोमो समोर आला आहे. आणि त्या प्रोमोमध्ये दिसणारी पाठमोरी व्यक्ती श्रेयस तळपदेच आहे अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत.

झी मराठी वाहिनीने (zee Marathi) अलिकडेच ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात एक व्यक्ती पाठमोरी चालताना दिसते. ‘तो येतोय शो गाजवायला! कोण बरं असेल तो? कंमेंट्समध्ये सांगा!’असं कॅप्शन असलेल्या या प्रोमो व्हिडिओवर प्रेक्षकांनी ‘श्रेयस तळपदे’ अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे लवकरच श्रेयस (Shreyas Talpade) नव्या अवतारात येणार असून नेमका हा रिअॅलिटी शो काय असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. (Marathi serial update)
======
हे देखील वाचा : बॉलिवूडचं ग्लॅमर अनुभवूनसुद्धा मराठी इंडस्ट्रीशी नातं कधीच न तोडणाऱ्या श्रेयसची यशोगाथा!
======
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) याने याआधी देखील अनेक कार्यक्रमांचं सुत्रसंचन केलंय. ‘’झुंज मराठमोळी’, ‘सावधान इंडिया:क्राईम अलर्ट’ (Savdhan India) या कार्यक्रमांसोबतच झी मराठी पुरस्कार सोहळे देखील त्याने होस्ट केले आहेत. अभिनेता, सुत्रसंचालक या भूमिकांपलिकडे श्रेयस दिग्दर्शकही असून त्याने पोस्टर बॉईज हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

मघाशी उल्लेख केलेल्या ‘आभाळमाया’ या मालिकेने खरं तर मराठी मालिकांचा पाया रचला होता. १९९९ साली अल्फा मराठी जी आता झी मराठी वाहिनी झाली आहे त्यावर ही मालिका प्रसारित झाली होती. विनय आपटे यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या मालिकेत सुकन्या मोने, मनोज जोशी, संजय मोने, अतिशा नाईक, हर्षदा खानलिवकर, अरुण नलावडे, Subodh bhave, सचिन खेडेकर, सोनाली खरे, श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), अंकुश चौधरी अशा मातब्बर कलाकारांची फौज होती. त्यामुळे ‘आभाळमाया’, ‘माझी तुझी रेशीम गाठ’ या मालिकांनंतर झी मराठीवर पहिल्यांदाच एक रिअॅलिटी शो श्रेयस तळपदे होस्ट करणार असल्यामुळे नेमका हा शो काय असणार हे आता लवकरच समोर येणार आहे. याशिवाय श्रेयस झी मराठी वाहिनीवर ‘झी चित्र गौरव २०२५’ या कार्यक्रमातही झी मराठीवरील नायिका आणि. त्यात प्रार्थना बेहरे सोबतही तो डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. (Zee Marathi award show)