Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला खुलासा
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर फार अॅक्टिव्ह असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं आणि ते सतत त्यांची मतं व्यक्त करत असतात. बऱ्याचदा अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर केवळ काही शब्दांच्या सूचक पोस्ट करतात आणि चाहत्यांना बूचकळ्यात पाडतात. अशीच काहीशी पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती ज्यात त्यांनी टआता जाण्याची वेळ आलीट असं लिहिलं होतं. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत बिग बींबद्दल काळजी व्यक्त केली होती. आता स्वत: अमिताभ यांनी त्या वाक्यांचा खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी ७ फेब्रुवारीला एक पोस्ट केली होती. त्यात “जाण्याची वेळ झाली…” असं लिहिलं होतं. त्यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांची चिंता वाढली होती. नेटकऱ्यांनी बिग बींची तब्येत बरी नाही आहे का? किंवा कोन बनेगा करोडपती? या शोमधील ते एक्जिट घेत आहेत का? असे अनेक प्रश्न विचारले होते. यावर बिग बी म्हणाले की, “माझी कामावर जाण्याची वेळ झाली आहे. कमाल आहात तुम्ही. मला इथून (केबीसी सेटवरून) रात्री २ वाजता सुट्टी मिळते, घरी पोहोचायला उशीर होतो. रात्री ते लिहिता लिहिता मी झोपलो, त्यामुळे ते अर्धवट राहिलं आणि ‘जाण्याची वेळ झाली’ इतकंच लिहिलं आणि मी झोपलो.”
============
हे देखील वाचा : Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
============
त्यानंतर २८ फेब्रुवारीला अमिताभ बच्चन यांनी दुसरी एक पोस्ट केली होती. त्यात “जावं की थांबावं”, असं लिहिलं होतं. आधी जाण्याची वेळ झाली लिहिणाऱ्या बिग बींनी त्याच आशयाची पुन्हा पोस्ट केल्याने ते नेमकं कशाबद्दल बोलतायत हे चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. अखेर त्यांनी यावरही उत्तर दिलं असून ते कामाबद्दल होतं असं म्हटलं आहे.

वयाची ८० गाठली असली तरी आजही अमिताभ बच्चन कल्की सारख्या चित्रपटात अॅक्शन सीन्स करताना दिसतात. लवकरच अमिताभ बच्चन ऑंख मिचौली २, ब्रम्हास्त्र २, कल्की २, सेक्शन ८४, या चि६पटांमध्ये दिसणार आहेत. तसेच, रजनीकांत यांच्यासोबत ३३ वर्षांनी Vettaiyan मध्ये स्क्रिप्ट शेअर करणार आहेत.