Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष
चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लवकरच पाहायला मिळणार आहे. मधल्या काळात लॉस एंजलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे ९७वा आॉस्कर पुरस्कार सोहळा यावर्षी रद्द होणार अशी चिन्हे दिसत होती. मात्र, या मोठ्या हानीतून वर येत अखेर ऑस्कर २०२५ चा पुरस्कार सोहळा होणार आहे. यावर्षी भारतीय चित्रपटांकडून सगळ्यांनाच आशा असून हा पुरस्कार सोहला कुठे पाहता येईल हे जाणून घ्या…
प्रतिष्ठित ऑस्कर २०२५ पुरस्कार सोहळ्याचा काऊंटर डाऊन सुरु झाला असून ३ मार्च २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता ऑस्कर सोहळा भारतात लाईव्ह पाहता येणार आहे. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. भारतात स्टार मूव्हीज सिलेक्ट या टीव्ही चॅनलवर, जिओस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘ऑस्कर २०२५’ चं लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. तसेच, हा पुरस्कार सोहळा अमेरिकन वेळेनुसारABC टीव्हीवर रात्री ७ वाजता टेलिकास्ट केला जाईल.

‘ऑस्कर २०२५’ मध्ये या भारतीय चित्रपटांकडे विशेष लक्ष
यंदा ऑस्कर २०२५ मध्ये जागतिक चित्रपटांच्या शर्यतीत भारतीय चित्रपट असून सगळ्यांचंच लक्ष हा सोहळ्याकडे लागलंय. या वर्षी भारताकडून ‘कंगुवा’,‘द गोट लाईफ’, ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’, ‘ऑल वी इमॅजीन इज लाइट’, ‘गर्ल्स विल बी गर्ल्स’ व ‘अनुजा’ हे चित्रपट पाठवण्यात आले आहेत. यापुर्वी किरण रावचा लापता लेडीज हा चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीत होता पण तो या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे इतर ५ चित्रपटांकडून प्रत्येक भारतीय चित्रपटप्रेमींना आशा आहे.
