Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Shreya Ghoshal : गायिकेचं ‘एक्स’ अकाउंट हॅक; पोस्ट करत म्हणाली…
कलाकारांचे डीपफेक व्हिडिओ आणि त्यांचे सोशल मिडिया अकाउंट हॅक करण्याचं प्रमाण वाढत आहे. यात गायिका श्रेया घोषालची देखील भर पडली असून तिचं ‘एक्स’ अकाउंट हॅक झालं आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली असून माझ्या नावाने कोणतीही लिंक, पोस्ट किंवा मेसेज आल्यास त्याकडे लक्ष देऊ नका असे सांगितले आहे. श्रेयाच्या आधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे अकाउंट हॅक झाले आहेत जाऊन घेऊयात अधिक माहिती….(Shreya Ghoshal)
श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिते ‘सर्व चाहते आणि मित्रांना नमस्कार. माझे ‘एक्स’ अकाउंट १३ फेब्रुवारीपासून हॅक झाले आहे. मी X टीमशी संपर्क साधण्याचा प्रत्येक शक्य मार्गाने प्रयत्न केला पण मला फक्त काही ऑटो-रिस्पॉन्स मिळाले आणि कोणतीही मदत मिळाली नाही. आता मी माझ्या खात्यात लॉग इनही करू शकत नाही किंवा मी ते डिलीटही करू शकत नाही कृपया त्या अकाउंटवरून येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका.’ त्या सर्व बनावट आणि फसवे लिंक्स आहेत. जर माझे खाते पुनर्प्राप्त झाले आणि सुरक्षित झाले, तर मी वैयक्तिकरित्या व्हिडिओद्वारे त्याबद्दल माहिती देईन. (Social media hack)

दरम्यान, यापूर्वी बिग बी अर्थात अमिताभ बच्चन, शाहिद कपूर, जावेद अख्तर यांचं देखील सोशल मिडिया अकाउंट हॅक झालं होतं. लेखक आणि दिग्दर्शक जावेद अख्तर यांचं ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावर भारतीय ऑलिंपिक टीमबद्दल ट्वीट केलं गेलं होतं. तर अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट करून त्यावरून त्यांचा फोटो आणि बायो एका टर्कीश हॅकरने बदलला होय. तर दिग्दर्शक करण जोहरच्या अकाउंटवरून इतर कलाकारांना चुकीचे मेसेज केले गेले होते. (Bollywood update)
============
हे देखील वाचा : Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?
============
अकाउंट हॅकिंगच्या बाबतीत अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Hasan) हिने हॅट्रिक केलीये असं म्हणायला हरकत नाही. कारण तिचं अकाउंट ज्यात फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे सगळेच अकाउंट बऱ्याच वेळा हॅक केले गेले आहेत. तर शाहिद कपूरचं अकाउंट पद्मावत चित्रपटानंतर हॅक करून त्यावरून हॅकअरने अल्लाउद्दीनबद्दल एक पोस्ट केली होती. तर २०१६ मध्ये ह्रतिक रोशनचं (Hritik Roshan) फेसबुक अकाउंट हॅक करून हॅकर ने स्वतःचा फोटो प्रोफाइल फोटो म्हणून लावला होता आणि त्यावरून त्यांनी एक फेसबुक लाईव्ह सेशनहीकेलं होतं. वारंवार कलाकारांचे डीपफेक व्हिडिओ करणं किंवा असे अकाउंट हॅक होणं जरा गंभीर होत चाललं असून याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.