Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी

ज्याने खळखळून हसवलं, तोच मराठी अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावर पोस्ट

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही…. 

हाती समशेर अन् चेहऱ्यावर शिवरुप तेज; Raja Shivaji तील रितेश

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”

 Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”
कलाकृती विशेष

Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”

by रसिका शिंदे-पॉल 03/03/2025

‘उंच माझा झोका’ या मालिकेतील रमा अर्थात अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिच्यासोबत कलाकृती मिडियाने ती सध्या काय करते? हा विशेष व्हिडिओ सेगमनेंट केला. यावेळी सध्या ती काय करते? तिचा अभिनयाचा प्रवास कसा सुरु झाला? अशा अनेक विषयांवर तिच्याशी गप्पा मारल्या. जाणून घेऊयात तेजश्रीबद्दल…

मुझे कास्ट करना है तो करो वरना…

‘उंच माझा झोका’ (Unch Maza Zoka) या मालिकेपूर्वी तेजश्रीने दोन मालिकांमध्ये कामं केली होती. मात्र, प्रेक्षकांच्या रमा कायमस्वरूपी लक्षात राहिली. अभिनयाची सुरुवात कशी झाली यावर बोलताना तेजश्री म्हणाली, “मी ३ वर्षांची असताना माझ्या आईने माझं फोटोशुट केलं होतं. आणि ते फोटो पाहिल्यावर एकाने सांगितलं की FTII ला एका शॉर्ट फिल्मसाठी कास्टिंग सुरु आहे तर तेजश्रीला घेऊन या. मी (Tejashree Walawalkar) आणि आई गेलो तर तिथे खुप गर्दी होती. मी वाट पाहून कंटाळले आणि तिथे एकाला सरळ बोलले की “मुझे कास्ट करता है तो करो वरना मेरे पार टाईम नही है” आणि असं बोलून मी आईला घेऊन निघाले. दोन दिवसांनी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की शॉर्ट फिल्ममध्ये ३ वर्षाच्या मुलीचं कॅरेक्टर नव्हतं पण आम्ही खास तेजश्रीसाठी क्रिएट केलाय तर तिला घेऊन या. तिथे आम्ही गेलो आणि ती माझी पहिली शॉर्ट फिल्म होती ‘द फॅंन्टेस्टिक लाईफ ऑफ मिस्टर त्रिपाठी’. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कारही मिळाले होते. तिथून कळत नकळत माझ्या अभिनयाची सुरुवात झाली”. (Marathi films update)

============

हे देखील वाचा :Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?

============

सुलभा देशपांडेंसोबत स्क्रिन शेअर करणं म्हणजे…

तेजश्रीची पहिली शॉर्ट फिल्म तर हिट झालीच. पण तिचा पहिला चित्रपटही तिने ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे (Sulbha Deshpande) यांच्यासोबत केला होता. ‘आजी आणि नात’ (२०१०) असं चित्रपटाचं नाव होतं आणि अगदी आयत्यावेळी तेजश्रीला सांगण्यात आलं की तुला सुलभा देशपांडे यांच्या नातीचं काम करायचं आहे. “सुलभाताई देशपांडे यांच्यासोबत स्क्रिन शेअर करता येणं म्हणजे माझं भाग्यच होतं. त्यामुळे मी लगेचच होकार दिला. आणि ती एक माझ्या आयुष्यातील अजरामर कलाकृती घडली”, अशा भावना तेजश्रीने व्यक्त केला. (Tejashree Walawalkar)

तेजश्री वालावलकर हिने आत्तापर्यंत ‘मात’, ‘चिंतामणी’, ‘बायोस्कोप’’, ‘सबका मालिक एक’, ‘महिमा अन्नपुर्णा देवीचा’, ‘राम राम महाराष्ट्र’ अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, लवकरच ती नव्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही तिने सांगितलं. (Entertainment trending news)

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: entertainment masala entertainment tadaka entertianment Marathi Serial ramabai ranade serial trending nes tejashree walawalkar Unch maza zoka zee marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.