
Gargi Phule : अभिनेत्री गार्गी फुलेची ‘या’ कारणामुळे मालिकाविश्वातून स्वेच्छा निवृत्ती
अनेकदा आपण बऱ्याच कलाकारांकडून मालिकाविश्वात काम करताना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकत असतो. यातले मुख्य त्रास म्हणजे कामाचे फिक्स नसलेले तास आणि सुट्ट्या न मिळणे. कलाकार महिन्यातले जवळपास २८ दिवस १५ / १६ तास काम करतात. यामुळे होते काय तर त्यांना स्वतःकडे लक्ष देता देत नाही. तब्येतीची हेळसांड होते आणि शरीराच्या छोट्या छोट्या कुरघोडी सुरु होतात. (Marathi Tv Industry)
अनियमित वेळांमुळे कलाकारांना त्यांच्या कुटुंबाला देखील वेळ देता येत नाही. मात्र चरितार्थ चालवण्यासाठी कलाकार हे काम करतात. मात्र असे देखील अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील ज्यांनी या त्रासाला वैतागून हे क्षेत्रच सोडून दिले. सगळ्यांनाच या गोष्टींचा त्रास होतो, मात्र बरेच कलाकार हे काम करण्यात धन्यता मानतात किंवा त्यांना आवडते असे काम करायला तर काही कलाकारांना असे काम जमत नाही. (Gargi Phule)

अशातच याबद्दल पुन्हा एकदा चर्चा होण्याचे कारण म्हणजे, मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या गार्गी फुलेने (Gargi Phule) मालिकाविश्वातून निवृत्ती घेतली आहे. याबद्दल तिने एका मुलाखतीमध्ये भाष्य करताना मालिका विश्वातील मालिकेचे शेड्यूल आणि बेभरवशाचे क्षेत्र या कारणांमुळे तिने हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. (Gargi Phule News)
गार्गी फुलेने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी मालिकाविश्वातून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे. कारण मी मागील १० वर्षांपासून मालिकाविश्वात काम करत आहे. माझं कुटुंब पुण्यात असून, मी शूटिंगसाठी मुंबईमध्ये राहते. त्यामुळे मी १० वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिले. खरं सांगायचं तर, कलाकारांसाठी मालिकेचं शेड्युल खूपच विचित्र झालं आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिकाविश्वात काम करावं. आरोग्यच्या दृष्टीने असो किंवा इतर दृष्टीने अशा या शूटिंगचा खूप त्रास होतो.” (Marathi Entertainment News)
======
हे देखील वाचा : Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग
======
दरम्यान गार्गीच्या अशा या तडकाफडकी निवृत्त्तीमुळे पुन्हा एकदा मालिकांचे तासंतास चालणारे शूटिंग हा मुद्दा चर्चेत आला आहे. या मुद्दावर आजवर अनेक दिग्गजांनी देखील भाष्य करत या प्रश्नावर योग्य तो तोडगा काढण्याचे आवाहन संबंधित लोकांना केले होते. मात्र या मुद्द्यात आजही अजिबातच फरक पडलेला नाही, हेच गार्गीच्या वक्तव्यावरून लक्षात येत आहे. (Social News)
दरम्यान गार्गी फुलेबद्दल सांगायचे झाले तर ती मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्व गाजवणारे आणि प्रतिभावान अभिनेते निळू फुले (Nilu Phule) यांची मुलगी आहे. रक्तातच अभिनय असलेल्या गार्गीने ‘तुला पाहते रे’ मालिकेतून अफाट लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. गार्गीमध्ये असलेला साधेपणा प्रेक्षकांना कमालीचा भावला. या मालिकेनंतर ती ‘राजा राणीची गं जोडी, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘इंद्रायणी’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, या लोकप्रिय मालिकांमध्ये देखील दिसली. याशिवाय तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ या चित्रपटातही काम केले आहे. (Celebrity Interviews)
======
हे देखील वाचा : Archana Joglekar : शूटिंगदरम्यान झाला बलात्काराचा प्रयत्न, हादरलेल्या अर्चना जोगळेकरांनी थेट इंडस्ट्रीच सोडली
======
गार्गी अभिनयासोबतच राजकारणातही सक्रिय आहे. अभिनयातून ब्रेक घेतलेल्या गार्गीने तिचा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. गार्गीने स्वतःचं Solitude Holiday नावाचं एक ट्रॅव्हलिंग अॅप लॉंच केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून आवडत्या कलाकारांसोबत चाहत्यांना देश-विदेशात फिरायला मिळणार आहे. गार्गीच्या Solitude Holiday अॅपच्या माध्यमातून अभिज्ञा भावे, ओम प्रकाश शिंदे, शुभांगी गोखले, सायली संजीव, आशुतोष गोखले आदी कलाकारांसोबत देश-विदेशात पर्यटकांना फिरता येणार आहे. यासंदर्भातील अधिक माहिती गार्गी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.