Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

Maharani 4 Teaser: आता बिहारमधील सत्तेचा खेळ आणखी रंजक होणार ; हुमा कुरेशीच खेळणार सर्व डावपेच
Biharच्या पार्श्वभूमीवर पॉवर प्ले चे उत्तम दर्शन घडवणाऱ्या ‘महाराणी‘ या वेबसीरिजच्या चौथ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. दमदार संवादांनी भरलेल्या या टीझरमधून ‘राणी भारती’चे दमदार पुनरागमन होत आहे. टीझर व्हिडिओमध्ये राणी भारतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हुमा कुरेशी खुर्चीवर बसून प्रभावी संवाद देताना दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच हुमा सांगते की, तिला खुनी, अशिक्षित आणि भावी पंतप्रधान म्हटले आहे. मात्र, त्यांच्यासाठी राजकारणापेक्षा त्यांचे कुटुंब महत्त्वाचे आहे आणि बिहार हे त्यांचे कुटुंब आहे. ती टीजरमध्ये म्हणते , “किसी ने हमको गंवार कहा, किसी ने हत्यारन, तो किसी ने भावी प्रधानमंत्री.हमको सत्ता से नहीं, परिवार से मोह है.काहे कि बिहार ही हमरा असली परिवार है और अगर कोई हमारे परिवार को नुकसान पहुंचाए तो हम सत्ता हिला देंगे।”.(Maharani 4 Teaser)

महाराणी राणी भारतीसोबत नव्या आव्हानांना आणि संघर्षांना सामोरे जात पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने परतण्यास आता सज्ज झाली आहे.टीजर समोर आला असला तरी निर्मात्यांनी अद्याप मालिकेच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. ‘महाराणी’चा पहिला सीझन 2021 मध्ये सोनी लिव्हवर रिलीज झाला होता. या मालिकेत अभिनेत्री हुमा कुरेशी राणी भारतीची भूमिका साकारत आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. हुमाची व्यक्तिरेखा पाहिली तर अचानक राजकारणात पाऊल ठेवावं लागणारी एक साधी आणि अशिक्षित गृहिणी म्हणून तिचं चित्रण केलं जातं. पती भीमा जखमी झाल्यानंतर त्या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या मालिकेत हुमाच्या पतीची भूमिका अभिनेता सोहम शाह साकारत आहे. मालिकेचा दुसरा सीझन जुलै 2022 मध्ये आला होता, तर तिसरा सीझन 2024 मध्ये रिलीज झाला होता.

महाराणी या वेब सीरिजमध्ये हुमा कुरेशी राणी भारतीची भूमिका साकारत आहे. ही मालिका बिहारच्या राजकारणावर आधारित असून त्याची कथा खऱ्या आयुष्यातील घटनांपासून प्रेरित आहे. या मालिकेचा पहिला सीझन 2021 मध्ये सोनीलिव्ह वर रिलीज झाला होता, त्यानंतर 2022 मध्ये दुसरा सीझन रिलीज झाला होता. महाराणीचा तिसरा सीझन 7 मार्च 2024 रोजी रिलीज झाला होता आणि आता चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे. या मालिकेची निर्मिती सुभाष कपूर यांनी केली होती, तर दिग्दर्शन सौरभ भावे यांनी केले होते. सुभाष कपूर, नंदन सिंग आणि उमाशंकर सिंग यांनी ते लिहिले होते.(Maharani 4 Teaser)
=============================
हे देखील वाचा: “A Perfect Murder”– रंगभूमीवरील अनोखा प्रवास, आता महिला विशेष प्रयोगासह!
=============================
आता महाराणी ४ मध्ये राणी भारती बिहारच्या राजकारणात कोणत्या नवीन गोष्टी आणणार आणि हा सीझन प्रेक्षकांना कितपत उत्तेजित करेल हे पाहावं लागेल.