Mumbai theatres : पूर्वी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र रांग असे….

Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स हे किताब सौंदर्याच्या जगात फारच मानाचे समजले जातात. १९९४ मध्ये ऐश्वर्या राय हिने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकल्यानंतर २००० साली एक नव्हे तर चक्क तीन Beauty Pagent पुरस्कार भारताने जिंकले होते. आणि आजवरच्या सौंदर्य जगतातील इतिहासात एकाच वर्षात तीन पुरस्कार कधीच मिळाले नव्हते. Priyanka Chopra, लारा दत्ता आणि दिया मिर्झा यांनी आपल्या सौंदर्य, तल्लख बुद्धी या दोहोंच्या जोरावर भारताचे नाव जागतिक पातळीवर अधिक उंचावले होते. जाणून घेऊयात Miss World, Miss Universe च्या इतिहासात भारताच्या अचिव्हमेंट्स काय होत्या?
२००० मध्ये प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने मिस वर्ल्ड, लारा दत्ता हिने मिस युनिवर्स आणि दिला मिर्झाने मिस एशिया पॅसेफिक हे किताब भारताचे प्रतिनिधित्व करत जिंकले होते. एका मुलाखतीत दिया मिर्झा हिने त्या स्पर्धेच्या काही आठवणी सांगितल्या. त्यात दिया म्हणाली की, “२००० हे वर्ष माझ्यासह प्रियांका आणि लारासाठी देखील खुप खास होतं. आम्ही तिघींनी एकाच वर्षात विविध स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत किताब जिंकले होते. त्या स्पर्धेच्या तयारीसाठी आम्ही तिघी एकत्र असायचो. खरं तर लारा आणि माझ्यापेक्षा प्रियांका फारच आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षी होती. बरेली सारख्या एका लहानशा भागातून आलेली प्रियांका केवळ मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच आली होती”. (Miss World, Miss Universe)

भारतासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या आम्ही तिघी जरी एकत्र असलो तरी माझी आणि लाराची त्या काळात घट्ट मैत्री झाली. मिस युनिवर्स, मिस एशिया पॅसेफिक या स्पर्धेनंतर बराच काळ मी आणि लारा एकाच माचिसच्या आकाराच्या लहानशा खोलीत एकत्र राहात होतो. मॉडलिंग, अभिनय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून जरी आम्ही आलो असलो तरी त्या परदेशात एक भारतीय म्हणून आमचाच एकमेकींना सपोर्ट होता आणि तो आजही कायम असल्याचं दिया म्हणाली. (Entertainment gossip)
२००० सालच्या मिस वर्ल्डची आणखी एक खासियत म्हणजे त्या वर्षी सर्वाधिक म्हणजे ९५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. आणि प्रियांका चोप्रा भारताची पाचवी आणि जगातील दुसरी भारतीय स्पर्धक ठरली होती जिने लागोपाठ भारतासाठी मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. तर, मिस युनिवसर्स या स्पर्धेच्या इतिहासात लारा दत्ता अशी पहिली स्पर्धक होती जिने फायनल इंटव्ह्यू राऊंडमध्ये ९.९९ असा स्कोअर केला होता. (Untold stories)

दिया मिर्झा हिने २००० मध्ये मिस एशिया पॅसिफीक जिंकल्यानंतर २००१ मध्ये आर.माधवन सोबत ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच फटक्यात सुपरहिट चित्रपट दिला. तर Priyanka Chopra हिने मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर २००३ मध्ये ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑप स्पाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शिवाय, मिस वर्ल्ड आणि मिस युनिवर्स असणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि लारा दत्ता यांनी २००३ मध्येच अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’ हा चित्रपट केला होता.
============
हे देखील वाचा : Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
============
सध्या दिया मिर्झा आणि लारा दत्ता दोघीही चित्रपटसृष्टीपासून लांब असून प्रियांका चोप्रा हॉलिवूड गाजवत आहे. लवकरच Priyanka Chopra) राजामौली यांच्या एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असं सांगितलं जात असून हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बिग बजेट चित्रपट असणार असून त्याचं बजेट १००० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. (Bollywood Upcoming Movies)