
Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?
Nostalgia… हा शब्द अनेक आठवणींना उजाळा देतो. मग तो मित्रांसोबत बसून टाईमपास करणारा असो किंवा मग शाळा-कॉलेजमध्ये खात असणारा एखादा पदार्थ असो किंवा मग चित्रपट असो. ९०च्या दशकातील मुलांना त्यांच्या काळातील चित्रपट मग ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’ किंवा ‘भूत’ असे क्लासिक चित्रपट परत यावे किंवा तेच पुन्हा पाहता यावे यासाठी सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या रि-रिलीजचा ट्रेण्ड आलाय. आत्तापर्यंत ‘रॉकस्टार’’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘तुंबाड’, ‘सनम तेरा कसम’ या चित्रपटांनी रि-रिलीजच्या लाटेत जुन्या सोबत नव्या प्रेक्षकांचा त्यातही यंग जनरेशनचा तुफान प्रतिसाद मिळवला. शिवाय, पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर आधीपेक्षा आता बक्कळ बॉक्स ऑफिस कलेकश्नही चित्रपटांनी केलंय. जाणून घेऊयात रि-रिलीजच्या या ट्रेण्डबद्दल…(Classic films re-release trend)
रि-रिलीजचा अट्टरहास का?
९० किंवा २००० च्या दशकात गाजलेले हिंदी चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणं ही एक महत्वाची स्ट्रेटेजी आहे. यातील सर्वात महत्वाचं कारण म्हणजे Nostalgia. कारण, ‘चुप चुपके किंवा ‘रहना है तेरे दिल मैं’ यासारखे तंगड्या स्टारकास्ट आणि कथानकाचे चित्रपट प्रेक्षकांना परत का पाहावेसे वाटणार नाहीत? शिवाय आत्ताच्या युवा पिढीने केवळ त्यांच्या पालकांकडून ऐकलेले किंवा रिल्समध्ये गाणी ऐकलेले चित्रपट पाहण्याची त्यांना संधी मिळाली तर हिंदी चित्रपटसृष्टीत असेही दर्जेदार चित्रपट तयार होत होते यावर त्यांचा विश्वासही नक्कीच बसेल. आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे Box Office Collection. चित्रपट निर्माते, मेकर्स यांना रि-रिलीजमध्ये जितका कलेक्शनचा फायदा होत आहे तो ओरिजनली रिलीज केल्याच्या दुप्पट तिप्पट नक्कीच आहे. आणि त्यामुळेच रि-रिलीजमध्ये एक नवा प्रेक्षक, प्रेक्षकांच्या चित्रपटाच्या नव्या आवडी निर्माण करत बॉक्स ऑफिस कलेकश्नही केलं जात आहे. (Sanam teri Kadam movie review-release)

रि-रिलीजचा फायदा कोणाला?
चित्रपटांचा Re-Release Trend हा मेकर्स आणि प्रेक्षक या दोघांच्याही फायद्याचा आहे. मेकर्ससाठी आर्थिकदृष्ट्या ही महत्वाची संधी असून नव्या पिढीचा प्रेक्षकही चित्रपटाला जोडला जात आहे. आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या जवळच्या लोकांसोबत आपल्या आवडीचे जुने चित्रपट पाहून जुन्या आठवणी किंवा जुने क्षण रिक्रिएट करण्याची ही आयती संधी मिळाली आहे. बरं, जुने चित्रपट साऊंड, व्हिज्युअल इफेक्ट यांचेच आधुनिकीकरण करुन पुन्हा रिलीज केले जात आहेत. त्यामुळे जरी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन ९ वर्षांपूर्वी आलेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पाहात असतील तर त्यांना better video quality असणारा चित्रपट पाहता येतोय. मेकर्सना पुन्हा एकदा क्लासिक चित्रपटांतून कमावण्याची संधी देणारा हा ट्रेण्ड असल्यामुळे जुने चित्रपट नव्या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ही संधी प्रत्येकजण घेत आहेत. (Bollywood update)
===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
===============================
Upcoming रि-रिलीज चित्रपट कोणते?
ऑल्ड इज ऑलवेज गॉल्ड… आता जुने चित्रपट रि-रिलीज का होत आहेत हे जाणून घेतलं आता आगामी कोणते चित्रपट रि-रिलीज होणार आहेत ते पाहूयात… Rajkumar Rao चा २०१७ साली आलेला ‘शादी मैं जरुर आना’ हा चित्रपट ७ मार्च २०२५ रोजी रि-रिलीज होणार आहे. १३ कोटीमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने २०१६ मध्ये १७ कोटींची कमाई केली होती. यानंतर, १५ वर्षांपूर्वी अभय देओल याच Road हा चित्रपट आला होता जो ७ मार्चला पुन्हा रिलीज होणार आहे. हा चित्रपट ड्रामा, अॅडव्हॅन्चर आणि रोमॅन्स यांचं मिश्रण आहे.

यानंतर अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असणारा Namastey London हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी रि-रिलीज होणार आहे. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी ३७.३९ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. याशिवाय लवकरच ‘लैला-मजनू’, ‘अंदाज अपना अपना’, ‘घातक असे कल्ट फॅन असलेले क्लासिक चित्रपट पुन्हा थिएटर गाजवण्यास येणार आहेत.
रसिका शिंदे-पॉल