
Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांना केवळ १ रुपया देऊन ‘या’ दिग्दर्शकाने केले होते साईन
ज्या नावाशिवाय संपूर्ण मनोरंजनसृष्टीचा इतिहास कायम अपूर्ण असेल असे नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde). आले ना चेहऱ्यावर हलके हसू….? हीच तर जादू होती या नावात लोकांच्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोणतेही चावट, विचित्र, दर्जाहीन विनोद करण्याची गरजच नाही, बस नाम ही काफी हैं! लोकं ‘विनोदी कलाकार’ म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी अगदी खालच्या थराला जाऊन विनोद करतात आणि आता आपण विनोदी कलाकार झालो या अविर्भावात जगतात.(Marathi top Stories)
मात्र लक्ष्मीकांत बेर्डे रसायनच वेगळे होते. त्यांनी ना केवळ आपल्या विनोदाने तर प्रगल्भ अभिनयाने प्रेक्षकांनी मने जिंकली. म्हणूनच आज लक्ष्मीकांत जाऊन अनेक वर्ष उलटूनही त्यांचे नाव कायम त्यांच्या फॅन्सच्या तोंडावर कायम आहे. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे सिनेमे, त्यांचे किस्से, त्यांच्या आठवणी कायम आपल्यासोबत आहे. इंडस्ट्रीमध्ये ‘लक्ष्या’चे अनेक किस्से प्रसिद्ध आहे. त्यांचा असाच एक किस्सा महेश कोठारे यांनी एकदा सांगितला होता. (Laxmikant Berde Kissa)

महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. मुख्य म्हणजे या जोडीचे सर्वच सिनेमे कमालीचे गाजले. ‘धडाकेबाज’, ‘माझा छकुला’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’, ‘धुमधडाका’ हे त्यातलेच काही निवडक सिनेमे. या जोडीचा सिनेमा म्हटल्यावर तो हिट होणारच हे सर्वांनाच माहित होते. या दोघांचा असाच एक सिनेमा होता तो म्हणजे, ‘धुमधडाका’. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अफाट लोकप्रियता मिळवली. (Marathi Entertainment News)
==============
हे देखील वाचा : Mumbai theatres : पूर्वी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र रांग असे….
==============
जेव्हा महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत यांना या सिनेमाची ऑफर दिली तेव्हा त्यांनी त्यांना केवळ १ रुपया देत सिनेमासाठी साइन केले होते. एका मुलाखतीमध्ये महेश यांनी स्वतः याबद्दल सांगितले. ते म्हणाले होते की, “‘धुमधडाका’ हा सिनेमा ‘प्यार किए जा’ या हिंदी सिनेमाचा मराठी रीमेक होता. हा सिनेमा मराठीत खूपच छान होईल असे मला वाटले. मी या सिनेमातील मेहमूद यांच्या भूमिकेमुळे खूपच प्रभावित झालो होतो. त्यामुळे या भूमिकेसाठी मी कोणाची निवड करू हेच मला समजत नव्हते. (Marathi Comedy Actor)
मी किशोर कुमार यांच्या भूमिकेसाठी अशोक सराफच योग्य असल्याने त्याला घेण्याचे ठरवले होते, तर शशी कपूरची भूमिका मी स्वतः करणार होतो. मात्र मेहमूद यांच्या भूमिकेसाठी मला योग्य कलाकार सापडतच नव्हता. त्यावेळी आत्माराम भेंडे, बबन प्रभू आणि माझे आई-वडील त्यांच्या ग्रुपचे “झोपी गेलेला जागा झाला” हे खूप गाजलेलं नाटक होतं. या नाटकाचे हजारो प्रयोग झाले. बबन प्रभू यांच्या मृत्यूनंतर या नाटकाच्या संपूर्ण टीमने ठरवलं की, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूने हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणायचे. तेव्हा नाटकातील बबन प्रभू यांच्या भूमिकेसाठी त्या ग्रुपने एक नवीन अभिनेता निवडला होता. तो नवीन अभिनेता म्हणजेच ‘लक्ष्मीकांत बेर्डे‘.” (Marathi Latest News)

महेश यांनी पुढे सांगितले की, “मी त्या नाटकामध्ये लक्ष्याला पाहिलं आणि मी खूपच खुश आणि प्रभावित झालो. मी स्वतःलाच म्हटलं, मला मेहमूदच्या भूमिकेसाठी अभिनेता सापडला. मी माझी ही इच्छा लक्ष्याकडे केली. तेव्हा मी लक्ष्मीकांतला या सिनेमासाठी सायनिंग अमाउंट म्हणून केवळ १ रुपया दिला होता. मुख्य म्हणजे त्याने तो तितक्याच गांभीर्याने माझ्याकडून घेतला. तेव्हा माझ्या फायनान्सचा पत्ता नव्हता, पटकथादेखील व्यवस्थित तयार नव्हती. मात्र मला मेहमूदच्या पात्रासाठी लक्ष्मीकांत सापडल्यानंतर मी ‘धुमधडाका’वर काम करण्यास सुरुवात केली.” (Laxmikant Berde and Mahesh Kothare)
==============
हे देखील वाचा : Prem Kahani : प्रेम कहानी मे एक लडका होता है एक लडकी होती है
==============
या किस्स्यानंतर दोन वर्षांनी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुफान गाजला देखील. याच सिनेमाने मराठी मनोरंजनविश्वाला महेश आणि लक्ष्या ही नवीन जोडी दिली. पुढे या जोडीने अनेक धमाकेदार सिनेमे दिले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांची मैत्री ऑफस्क्रीनही घट्टच होती आणि कायम अशीच राहील असेच महेश कोठारे नेहमी सांगतात. (old Marathi Movie News)