
Sourav Ganguly Biopic: दादाने स्वतःच्या बायोपिकबद्दल दिली मोठी अपडेट
महापुरूषांच्या जीवनावर आधारित बायोपिक गेल्या अनेक वर्षात सातत्याने येत आहेत. नुकताच छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक पट प्रदर्शित झाला. यात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता यानंतर लवकरच एका क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित बायोपिक भेटीला येणार असून या क्रिकेटपटूनेच स्वतःच्या बायोपिकबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे. जाणून घेऊयात…(Sourav Ganguly Biopic)
भारतीय क्रिकेट टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी महेंद्रसिंह धोनी, मिताली राज यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान खेळाडू सौरव गांगुलीवर बायोपिक येणार असून स्वत: सौरभ गांगुलीने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. अभिनेता राजकुमार राव सौरव गांगुलीची भूमिका साकारणार असल्याचं तो म्हणाला. पुढे सौरव म्हणाला की, माझ्या माहितीनुसार, राजकुमार राव ही भूमिका साकारणार आहे, परंतु चित्रीकरण वेळापत्रक आणि तारखांबाबत काही आव्हाने आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यास एक वर्षापेक्षा जास्त वेळ जाऊ शकतो, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, Sourav Ganguly च्या बायोपिकची घोषणा 2021 मध्ये करण्यात आली होती ज्याचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने करणार आहेत. राजकुमार राव गांगुलीची भूमिका करणार हे जरी पक्क असलं तरी तारखांच्या गोंधळामुळे चित्रीकरण सुरू होण्यास विलंब होत आहे.
===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
===============================
डावखुरा बॅट्समन आणि माजी कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी आणि ३११ एकदिवसीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत गांगुलीने सर्व फॉरमॅटमध्ये १८,५७५ धावा केल्या आहेत. तसेच, बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. (Rajkumar Rao)