Prasad Oak : “क्षेत्र कोणतंही असो…”; लेकासाठी मंजिरी ओकची खास

Manoj Bajpayee : पुन्हा एकदा वास्तववादी भूमिकेत बाजपेयी!
काल्पनिक भूमिकांपेक्षा वास्तविक भूमिका साकारण्याची विशेष आवड काही ठराविक कलाकारांची असते. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते Manoj Bajpayee. आजवर मनोज यांनी ‘सिर्फ एक बंदा काफी है’, ‘जोरम’, ‘भैय्याजी’, ‘गुलमोहर’, ‘फॅमिली मॅन’, ‘डिस्पॅच’ अशा वेगवेगळ्या कलाकृतीतून आपलं अभिनय कौशल्य सादर केलं आहे. आता लवकरच मनोज बाजपेयी आणखी एका वास्तववादी भूमिकेतून समोर येणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे चिन्मय मांडलेकर करणार आहेत. (Netflix)

पिपिंगमून या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मनोज बाजपेयी नेटफ्लिक्सवरील आगामी फिचर चित्रपटात कुख्यात सीरियल किलर ‘चार्ल्स शोभराज’ (Charles Sobhraj) याला एकदा नव्हे तर दोनदा पकडणाऱ्या इन्सपेक्टर मधुकर झेंडे यांची भूमिका साकारणार आहेत. जानेवारी महिन्यात या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु झालं असून आता ते संपल्याची माहिती देखील पिपिंगमूनने दिली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात मनोज बाजपेयींसोबत पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून चिन्मय मांडलेकर काम करणार असून आणखी एका रिअल हिरोची कथा प्रेक्षकांसमोर यानिमित्ताने येणार आहे.(entertainment masala)

थोडं मनोज यांच्याबद्दल…
मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी १९९४ साली ‘द्रोहकाल’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. पण त्यापूर्वी ‘Bandit Queen’ या चित्रपटातही त्यांनी छोटेखानी भूमिका साकारली होती. मनोज बाजपेयी यांना खरी ओळख १९९८ साली आलेल्या ‘सत्या’ या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर ‘शुल’, ‘राजनीती’, ‘गॅंग्स ऑफ वासेपूर’ अशा वेगळ्या धाटणीच्या प्रोजेक्ट्सची त्यांनी रांगच लावली. राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटाचा आजही कल्ट फॅन फॉलोईंग आहे. या चित्रपटाने अंडरवर्ल्डचं एक वेगळंच चित्र दाखवलं होतं. ‘सत्या’ (Satya) चित्रपटाने भरघोस यश मिळवत १९९८ साली बॉक्स ऑफिसवर १५ कोटी कमावले होते. (Upcoming Films 2025)