Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Manthan Movie : काय कनेक्शन होते ‘या’ गाण्याचे प्रिन्स चार्ल्स

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram

Chiranjeevi Hanuman – The Eternal या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार राजेश

…जेव्हा नीतू कपूर यांनी Rishi Kapoor यांच्या अफेअर्सना One Night

Prasad Jawade आणि अमृताने अचानक सोडले राहते घर,व्हिडिओ पोस्ट करत

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sairat : १०० कोटींचा इतिहास रचणारा मराठी चित्रपट होणार रि-रिलीज!

 Sairat : १०० कोटींचा इतिहास रचणारा मराठी चित्रपट होणार रि-रिलीज!
मिक्स मसाला

Sairat : १०० कोटींचा इतिहास रचणारा मराठी चित्रपट होणार रि-रिलीज!

by रसिका शिंदे-पॉल 10/03/2025

सध्या बॉलिवूडमध्ये रि-रिलीज चित्रपटांचा नवा ट्रेण्ड सुरु आहे. ९०चं दशक गाजवलेले अनेक सुपरहिट चित्रपट सध्या रि-रिलीज करुन पुन्हा एकदा प्रेक्षकांनाही हिंदी चित्रपट पाहण्यासाठी आकर्षित केले जात आहे. आता या ट्रेण्डमध्ये मराठी चित्रपटसृष्टीनेही सहभाग घेतला असून नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला जाणार आहे. ‘सैराट’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचत १०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट हा मान मिळवला होता. आर्ची आणि परश्या पुन्हा एकदा कधी मोठ्या पडद्यावर भेटायला येत आहेत जाणून घेऊयात…

नागराज मंजुळे (Nagraj Manjula) दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. केवळ रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Aakash Thosar) यांनाच नाही तर अजय-अतुल यांनाही ‘सैराट’ चित्रपटाने संगीतकार म्हणून विशेष ओळख दिली. या चित्रपटातील हृदयस्पर्शी प्रेमकथा आणि कलाकारांचा नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला होता. अभूतपूर्व यशानंतर ‘सैराट’  आता पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २१ मार्च रोजी पुन्हा प्रदर्शित होणार आहे. (Sairat movie re-release)

चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, ”आम्ही चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील. आम्ही प्रामाणिकपणे काम केले होते. सैराटने महाराष्ट्रातच नाही तर भारतभर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आणि आज पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळतेय. याहून आनंद काय असू शकतो? यासाठी मी झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल , याची मला खात्री आहे.” (Marathi films re-release)

रिंकू राजगुरू म्हणते, “सैराट (Sairat) हा चित्रपट माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आर्ची या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाने मला फक्त ओळख नाही तर प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा दिली. ‘ सैराट’ पुन्हा प्रदर्शित होतोय याचा मला खूप आनंद आणि अभिमान आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली यासाठी मी त्यांची कायम आभारी असेन.”(Marathi films update)

आकाश ठोसर म्हणतो,“ ‘सैराट’ हा माझ्या करिअरचा पहिला आणि आजवरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. परश्या या व्यक्तिरेखेने मला प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख दिली. सैराटच्या माध्यमातून आमच्या टीमने जे यश मिळवले, ते आजही आठवणीत आहे. सैराटचे पुनर्प्रदर्शन होणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खात्री आहे, की प्रेक्षक पुन्हा एकदा या चित्रपटाला तितक्याच प्रेमाने स्वीकारतील.” (Bollywood update)

=============================== 

हे देखील वाचा : Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?

===============================

बॉलिवूडमध्ये ‘नमस्ते लंडन’, ‘लुटेरा’, ‘रोड’, ‘’शादी में जरुर आना’, ‘अंदाज अपना अपना’ असे काही आयकॉनिक चित्रपट लवकरच रि-रिलीज होणार आहेत. आणि आता याच लाटेत ‘सैराट’ (Sairat) देखील पुन्हा प्रदर्शित होत असल्यामुळे नक्कीच जो मराठी प्रेक्षक सध्या चित्रपटगृहांपासून लांब गेला आहे तो पुन्हा सैराटच्या निमित्ताने मराठी चित्रपट पाहायला येईल अशी आशा नक्कीच आहे.(Bollywood masala)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaksah thosar Bollywood Celebrity Entertainment Marathi films Movie re release trend Nagraj Manjule Re release trend rinku rajguru sairat
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.