Gulkand Movie Chanchal Song: प्रेमाचा गोडवा आता आणखी वाढणार; गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत

Digpal Lanjekar: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ टीमसोबत आळंदी दुमदुमली
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा विडा हाती घेऊन ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना दिग्दर्शक Digpal Lanjekar यांनी मराठी चित्रपटसृष्टीत रुजवली आणि त्यानुसार एकामागून एक ऐतिहासिक चित्रपट भेटीला आणले. आता त्यानंतर संत मुक्ताई यांचे जीवन मोठ्या पडद्यावर लवकरच लांजेकर घेऊन येणार आहेत. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येणार आहे. (Upcoming Marathi Movie)

नभी फडकणारी भगवी पताका अन मुखी पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम महाराज की जय’ चा जयघोष क्षणाक्षणाला वाढणारा उत्साह अशा भक्तीमय वातावरणात आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि त्यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं, निमित्त होत.. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ (Sant Dyaneshwaranchi Muktaai)चित्रपटातील कलाकारांच्या आळंदी भेटीचं. रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर अशा आनंदानुभव उपस्थितांनी याप्रसंगी घेतला.(Marathi film update)

असामान्य बुद्धिमत्ता आणि भक्तीयोगमार्गात उच्च स्थान प्राप्त केलेल्या संत मुक्ताई या अपूर्णत्वाला पूर्णत्व देणारे जीवन जगल्या. मानवी मनाचे समुपदेशन करणाऱ्या आदीशक्ती मुक्ताईचे नाव स्त्री संतांच्या मांदियाळीत प्रामुख्याने घेतले जाते. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांची धाकटी बहिण म्हणजे संत मुक्ताई. ही चारही भावंडे विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तीमंत दिव्य स्वरूप होत. बोलण्यात स्पष्टता आणि कठोरता असणाऱ्या मुक्ताईने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी भावंडांचे आईपण स्वीकारत शिष्यांवर मायेची चादर पांघरली. आणि त्यांचेच जीवनचरित्र या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. (Marathi upcoming film)
===========================
हे देखील वाचा: दिग्पाल लांजेकर सांगतायत शेर शिवराज चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे भन्नाट किस्से
===========================
संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर यांच्यासुद्धा चित्रपटात भूमिका आहेत. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.