Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात

Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
‘आखों में तेरी अजब सी अजब सी अदाऐं है…’ खरंच बॉलिवूडमध्ये कुणीही गॉदफादर नसताना २००७ मध्ये ओम शांती ओम या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सध्या संपूर्ण इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस लेक दुआ हिला जन्म दिला. एकीकडे Motherhood सेलिब्रेट करत असताना दुसरीकडे दीपिकाने पुन्हा एकदा काम करण्यास सुरुवात केली आहे. पॅरिसमधील फॅशन विकमध्ये सहभागी झालेल्या दीपिकाचा लूक सध्या सोळ मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शिवाय, त्यावरील रणवीर सिंहच्या कमेंटनेही लक्ष वेधलं आहे. (Paris Fashion Week 2025)
लुईस व्हिटॉन पॅरिस फॅशन (Louis Vuitton’s Fashion Show) वीकसाठी दीपिका पादूकोण हिने पॅरिसमध्ये हजेरी लावली. लुईस व्हिटॉन या ब्रॅण्डसाठी दीपिका पहिली ब्रॅण्डअॅम्बॅसेडर ठरली आहे. या फॅशन विकमध्ये व्हाईट ओव्हरसाईज्ड ब्लेझर, ब्रिटीश स्टाईल हॅट, ब्लॅक लेगिंग्स आणि हील्समध्ये दीपिका स्टाईल आयकॉन दिसत होती.शिवाय आपला लूक अधिक ग्लॅमरस करण्यासाठी तिने लेदर ग्लोव्ह्जस, स्कार्फ घेतला आणि लाल रंगाची लिपस्टिकही लावली होती. वयाच्या ९व्या वर्षापासून दीपिकाने मॉडेलिंग सुरु केली होती. (Bollywood update)

दीपिकाने तिच्या या लूकचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यात दीपिकाचा नवरा अर्थात रणवीर सिंह याने ‘Lord have mercy on me’अशी कमेंट केल्यामुळे लोकांचे लक्ष अधिक वेधून घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे, लेक दुआच्या जन्मानंतर आई झालेल्या दीपिकाने तिचा जपलेला फिटनेस नक्कीच कौतुकास्पद आहे. (Deepika Padukone fashion icon)
===========
हे देखील वाचा : Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास करणारी बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण
===========
दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) कामाबद्दल बोलायचं झाल्यास गरोदर असताना ती सिंघम ३ चित्रपटाचं शुटींग करत होती. तर आई होण्यापूर्वी तिचा ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. लवकरच ती ‘कल्की २’ आणि ‘ब्रम्हास्त्र २’ मध्ये दिसणार असे सांगण्यात येत आहे. याशिवाय, ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ती पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार अशीही माहिती आहे.

तसेच, रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांची प्रमुख भूमिका असणारा पद्मावत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये बॉक्स ऑफिसवर १० लाख कमावले असून मुळ प्रदर्शनावेळी ३०० कोटींचा टप्पा पार केला होता. (Padmavaat Re-release)