Mi Pathishi Aahe Movie Trailer: श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा

Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”
Govinda विरारच्या मुलाने अभिनय आणि आपल्या नृत्याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपासून तर तो त्याच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत आहे. ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. जेम्स कॅमरॉन यांच्या Avatar चित्रपटाचं नाव गोविंदा यांनी सूचवल्याचं त्यांनी म्हटलं असून मुख्य भूमिका देखील ऑफर केल्याचं म्हटलं आहे. (Govinda)
मुकेश खन्ना यांच्याशी बोलताना गोविंदाने अवतार चित्रपटाचा उल्लेख करत म्हटलं की, लंडनमध्ये एका माणसाने मला जेम्स कॅमरॉनशी भेट घडवून दिली होती आणि मी त्याचा चित्रपट करावा असं मला सुचवलं होतं. मी जेम्सला जेवायला बोलावलं आणि बातचीत करत असताना त्यांनी मला चित्रपटाबद्दल सांगितलं. मुळात अवतार हे चित्रपटाचं नाव मीच सुचवलं आहे. जेम्सने (James Cameron) मला सांगितलं की त्यांच्या या चित्रपटात मी प्रमुख भूमिका साकारावी. शिवाय त्यांनी मला १८ कोटी रुपये आणि चित्रिकरणासाठी १० दिवस द्या असं सांगितलं. पण मी म्हणालो की ते शक्य नाही; कारण जर का मी शरीर पेंट केलं तर मला रुग्णालयात जावं लागेल”. (Bollywood update)

जेम्स कॅमरॉनचा ‘अवतार’ (Avatar) तर गोविंदाने नाकारलाच पण बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’मधील भूमिकाही रिजेक्ट केल्याने त्याला ऑफिसमधून बाहेर काढण्यात आलं होतं असा त्याने खुलासा केला. गोविंदा म्हणाला की,”रेणु चोप्रासोबत माझी चांगली मैत्री होती. मी त्यांच्या घरीही अनेकदा जायचो. एक दिवस मला बी आर चोप्रांनी ऑफिसमध्ये बोलवलं. त्यांनी मला महाभारत मधील अभिमन्युची भूमिका ऑफर केली. मात्र माझ्या आईने मला या भूमिकेला नकार द्यायला सांगितलं. माझी आई साध्वी होती आणि तिने मला ही भूमिका न करण्याचा सल्ला दिला होता.”(entertainment masala)
==================
हे देखील वाचा :Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा
==================
पुढे तो म्हणाला, “तेव्हा मी बीआर चोप्रांकडे इन्फ्लुएन्शियल फिगर म्हणून बघत नव्हतो. माझा नकार त्यांना अजिबात आवडला नाही. त्यांनी माझ्या आईला वेडी आहे ती असंही म्हटलेलं. ते जरा संतापले होते. मी त्यांना म्हणालो सर, ‘माझ्या आईने शारदा हा पहिला सिनेमा केला होता. तिने ९ सिनेमे केले आहेत. ती तुमची सीनिअर आहे. माझे वडीलही सीनिअर आहेत. मी स्ट्रगल करतोय. ती जे सांगते तेच होतं.’ मी नंतर जेव्हा आईला हे सांगितलं तेव्हा तिने मला त्यांच्यासमोर जाऊन अभिनय करण्याचा सल्ला दिला. तसंच तुमचा विचार मी खाल्ला असंही सांगितलं. नंतर बीआर चोप्रांनी मला हा वेडा आहे म्हणत बाहेर काढलं होतं.”(Govinda)

दरम्यान, गोविंदाने १९८६ मध्ये इल्जाम या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘सिंदूर’, ‘शिवा-शक्ती’, ‘हत्या’, ‘कर्ज’, ‘आवारगी’, ‘स्वर्ग’ अशा अनेक चित्रपटात कामं केली होती. तसेच, लवकरच तो ‘रंगीला राजा’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंज करण्यासाठी सज्ज झाला आहे.