Sairat : आर्ची-परशा पुन्हा येणार भेटीला; रि-रिलीज ट्रेण्डमध्ये सैराटची वर्णी

Rashmika Mandanna : लागोपाठ ५०० कोटींचे हिट चित्रपट देणारी ‘नॅशनल क्रश’
‘नॅशनल क्रश’ हा टॅग मिळवणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या टॉलिवूडच नाही तर बॉलिवूडपण गाजवतेय. एकामागून एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रश्मिकाच्या तीन चित्रपटांनी लागोपाठ ५०० कोटींचा बॉक्स ऑफिसवर टप्पा पार करत नवा इतिहास रचला. सध्या दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत रश्मिका ही केवळ एकच अभिनेत्री आहे जिच्या नावावर ५०० कोटी कमावणाऱ्या तीन चित्रपटांची नोंद आहे. लवकरच रश्मिका सलमानसोबत ‘सिकंदर’मध्ये (Sikandar) स्क्रिन शअर करणार आहे. जाणून घेऊयात जरा नॅशनल क्रशबद्दल…(Bollywood film update)
कर्नाटकातील कुर्ग मध्ये जन्मलेल्या रश्मिका (Rashmika Mandanna) हिचं शालेय शिक्षण कुर्गमध्येच झालं. आपल्या गावाशी आणि संस्कृतीशी तिची नाळ घट्ट जोडली आहे, याची प्रचिती बऱ्याचदा तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट होणाऱ्या धार्मिक स्थळांच्या भेटी किंवा कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांतून सिद्ध होतंच. रश्मिकाने सायकॉलॉजी, जर्नेलिजम आणि इंग्रजी लिट्रेचरमध्ये पदवी प्राप्त केली आहे. चित्रपटात काम करण्याची तिची आधीपासूनच इच्छा होती खरं आणि त्याचा प्रवास झाला मॉडेलिंगपासून. (Entertainment News)

कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करणाऱ्या रश्मिकाला ‘कांतारा’ (Kantara) फेम दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांनी पाहिलं होतं आणि त्यांनी Kirin Party या कन्नड चित्रपटातून तिला ब्रेक दिला आणि २०१६ मध्ये रश्मिका मंदानाची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली. त्यानंतर रश्मिकाने ‘चलो’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘भीश्म’, ‘सुलतान’, ‘सिता रामम’, ‘यजमाना’ अशा तेलुगू, कन्नडा, तमिळ चित्रपटांमध्ये कामं केली. (Tollywood Movies)
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये रश्मिकाचे चाहते होतेच पण ‘पुष्पा १’ (Pushpa 1) या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतही तिचा जम बसू लागला. आणि संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अॅनिमल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने केलेली एन्ट्री धमाकेदार ठरली. ‘अॅनिमल’च्या यशानंतर ‘पुष्पा २’ (Pushpa 2) आला त्यातही तिने अल्लू अर्जूनसोबत साऊथसह हिंदीचंही मार्केट खाऊन टाकलं. त्यानंतर लक्ष्मण उतेकर यांच्या ‘Chhaava’ या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशल सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या रश्मिकाने याही संधीचे सोनं करत पुन्हा बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींची मजल मारली. (Bollywood masala)
===========
हे देखील वाचा :Chhaava Box Office : हर हर महादेव! ‘छावा’ची ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री
===========
इतकंच नाही, तर अभिनेत्री Deepika Padukone हिलादेखील रश्मिकाने मागे टाकत ५०० कोटी चित्रपटांचा तिचाही रेकॉर्ड मंदानाने मोडला आहे. लवकरच रश्मिका सलमान खान सोबत सिकंदर या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय, मॅडॉक फिल्म्सच्या ‘थामा’. (Thama) या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटात ती आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) सोबत झळकणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहेत. त्यामुळे ‘’छावा’ नंतर आणखी एका मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात रश्मिका दिसणार आहे. (Rashmika’s upcoming Movies)

रश्मिकाची गाडी खरं तर सध्या चांगलीच भरधाव वेगात आहे. एकामागून एक हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटात तीच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘सिकंदर’ आणि ‘थामा’ नंतर ‘Animal Park’ या हिंदी ‘Kubera’ या तमिळ, ‘द गर्लफ्रेंड’ आणि ‘पुष्पा ३ : द रेंम्पेज’ या तेलुगू चित्रपटात. ती दिसणार आहे. त्यामुळे पुढची २-३ वर्ष रश्मिका मंदाना तुफान गाजवणार असं दिसून येत आहे. (Bollywood upcoming super hit movies)