Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

geet gaata chal : गीत गाता चल ओ साथी गुनगुनात चला….
सत्तरच्या दशकात जेव्हा रूपेरी पडदा पूर्वाधात राजेश खन्नाच्या गुलाबी प्रणयाने बहरला होता आणि उत्तरार्धात अमिताभ रूपी वादळाच्या सुडाग्नीने रंगला होता त्याच वेळी राजश्री प्रॉडक्शनकडून कमी बजेटचे पण अप्रतिम कथानक, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय यांचा सुरेल मिलाफ असलेले चित्रपट देत होते. मागच्या शतकातील महान चित्रपट रमेश सिप्पी यांचा ‘शोले’ १५ ऑगस्ट १९७५ साली पडद्यावर झळकला त्यावर्षी ‘दिवार‘ , ’ज्युली’ या चित्रपटाचा अपवाद वगळता इतर कोणतेही मोठ्या संस्थेचे सिनेमे तिकिट बारीवर फारसा चमत्कार करू शकले नाहीत त्या वेळी तीन छोट्या बजेटच्या सिनेमांनी कमाल केली होती यातील एक सिनेमा तब्बल २३ वर्षानी पुन्हा नव्याने प्रदर्शित झाला होता. तो होता मा भगवान यांचा ‘अलबेला‘ ! दुसरा सिनेमा ज्याने अनपेक्षित रित्या दणकून यश मिळविले तो होता धार्मिक चित्रपट ‘जय संतोषी मां’ आणि तिसरा चित्रपट ज्याची आपण चर्चा करणार आहोत तो होता ‘गीत गाता चल’ ! (geet gaata chal)

‘गीत गाता चल’ (geet gaata chal) या सिनेमाने हळू हळू पण जबरदस्त बस्तान बसवले. अनेक शहरातून या सिनेमाने सुवर्ण महोत्सव साजरे केले. सचिन या गुणी नायकाचा हा नायक म्हणून पहिलाच यशस्वी सिनेमा. यातील त्याने रंगवलेला नायक श्याम हा स्वच्छंदी आहे. तो कोणत्याही पाशात स्वत:ला अडकवून घेवू इच्छित नाही. तो एक मुक्त पक्षी आहे. मनमुरादपणे निसर्गात बहरणारा. त्याला घर नाही. आप्त नाही. मित्र नाही. कसलेही बंधन नाही. त्याचा प्रामाणिकपणा, त्याची कला, त्याचं उत्साही व्यक्तिमत्व याच्यावर हरेक जण फिदा असतो हा मात्र कोणत्याही भावनिक बंधनात अडकत नसतो. बासरीची मंजुळ धून वाजवीत तो स्वच्छंद पणे भटकंती करत असतो. (Bollywood mix masala)
‘धरती मेरी माता पिता आसमान मुझको तो अपनासा लागे सारे जहां’ अशी त्याची विचारधारा असते. ‘गीत गाता चल ओ साथी गुनगुनाता चल’ असं गात तो प्रवास करीत असतो. आयुष्यात त्याला काही महत्वाकांक्षा नसते, विसावा नसतो की मुक्कामाचे ठिकाण नसते. अशा या मुक्त जीवन शैली जगणाऱ्या श्यामला कुणी बंधनात अडकवू शकत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला एका गावातल्या नौटंकीत तो पोहोचतो तिथल्या वातावरणातील तणाव कमी करतो.

नाटकाची नटी (पद्मा खन्ना) त्याच्याकडे आकृष्ट होते पण हा तिला दीदी म्हणून पुकारतो. पहिल्यांदाच कुठल्यातरी नात्याच्या बंधनात तो अडकू लागतो असं लक्षात आलं की तो लगेच तिथून बाहेर पडतो आता तो एका जत्रेत येतो तिथे एक बैल उधळतो आणि चेंगराचेंगरी होते तिथे तो एका जेष्ठ महिलेला (उर्मिला भट) वाचवतो. ती स्त्री त्याला आपल्या घरी घेवून जाते इथे त्याची गाठ पडते त्यांच्या षोडश वर्षीय कन्येसोबत राधासोबत. सुरूवातीला दोघात खूप भांडाभांडी होते. दोघांच्या अजाणत्या वयातील ती नोक झोक, ती भांडणे त्यांना नकळत जवळ आणतात. (untold stories)
पण त्याला ही एक कारण घडते. त्यांच्या शेजारच्या घरातील मीरा नावाची मुलगी श्यामच्या बासरीने मोहित झालेली असते. राधाला ते बघवत नाही. ती श्यामची बासरी तोडून टाकते. कळत नकळत पणे आपण श्यामच्या प्रेमात आहोत. प्रेमाचा अंकुर नुकताच फुलतोय हे तिच्या लक्षात येते. (मै वही दर्पण वही न जाने ये क्या हो गया की सबकुछ लागे नया नया) पण ही प्रेमाची आग एकाच बाजूला लागलेली असते का? श्यामच्या मनातील प्रेमाचा अंकुर त्याने स्वत:वर घातलेली बंधने उमलू देत नाही का? मनातील प्रेमाच्या हाकेला तो ओ देतो का? असे अनेक प्रश्न उत्तरार्धात तयार होतात. पण शेवट अर्थातच गोड होतो. (geet gaata chal)

या सिनेमातील रवींद्र जैन यांनी लिहिलेली आणि संगीत दिलेली गाणी अतिशय सुमधुर बनली होती. शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम, कर गया कान्हा मिलन का वादा, मंगल भवन अमंगल वाणी, श्याम अभिमानी या सोबतच वर उल्लेख केलेली मै वही दर्पण वही न जाने, गीत गाता चल आणि धरती मेरी माता ही जसपाल सिंग आणि आरती मुखर्जी, हेमलता यांनी गायलेली गाणी अफाट गाजली. यात किशोर कुमारच्या स्वरात एक गाणे होते ‘बचपन हर गम से अंजाना होता है’ हे गीत चक्क मदनपुरीवर चित्रित होतं.
अभिनयाच्या बाबतीत बोलायचे तर सचिन आणि सारिका या दोघांनी कोवळ्या वयातील प्रेम खूप छान पध्दतीने दाखवले आहे. लीला मिश्रा, मनहर देसाई, उर्मिला भट, ख्याती, धुमाळ,पद्मा खन्ना, मदनपुरी या सर्वानी चांगल्या अभिनयाने सर्वांना साथ दिली. हिरेन नाग यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या दिग्दर्शनातील हा पहिलाच हिट सिनेमा. त्यापुढे ते राजश्रीचे फेवरीट बनले. चित्रपटाची कथा आणि पटकथा अनुक्रमे मधुसूदन कालेलकर आणि शरद पिळगावकर यांची होती. चित्रपटातील निसर्ग डोळे भरून पहावा असा होता. छायांकन अनिल मित्रा यांचे होते. (geet gaata chal)
============
हे देखील वाचा : vinod khanna : आणि इम्रान खान यांच्या सिंथॉल साबणाच्या या जाहिराती आठवतात का?
============
चित्रपटात रूढार्थाने कुणी ही खलनायक नाही. कोणतीही व्यक्तीरेखा ग्रेड शेडमध्ये रंगवलेली नाही. राजश्रीच्या चित्रपटात दिसणारे आनंदी सदा सुखी वातावरण, इथला ग्रामीण भोळाभाबडा समाज, स्वच्छ नद्या, एकमेकासाठी त्याग करणारी माणसे सारं कस शांत मनाला ‘सुशेगात‘ करणारे! १ जुलै १९७५ ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा राजश्रीच्या परंपरेतील माईल स्टोन ठरला कारण इथून पुढची दहा वर्षे त्यांची चित्र निर्मिती तर वाढली आणि यशाचा हिट फार्मुला त्यांना कायम साथ देत राहिला.