Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Parineeti Chopra-Raghav Chadha यांनी शेअर केला मुलाचा पहिला फोटो; नाव

१३,३३३ वा प्रयोग, आपत्तीग्रस्तांना १३ लाख ३३३ रुपयांची मदत; Prashant

गोष्ट Asha Parekh ने शशी कपूरला मारलेल्या करकचून मिठीची!

चित्रपती V.Shantaram यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ratna Pathak : लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर रत्ना पाठक यांनी केले नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न

 Ratna Pathak :  लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर रत्ना पाठक यांनी केले नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न
Press Release

Ratna Pathak : लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर रत्ना पाठक यांनी केले नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न

by Jyotsna Kulkarni 18/03/2025

‘मोनिशा बेटा इट्स टू मिडिल क्लास’ हा संवाद ऐकला की लगेच डोळ्यासमोर येते ती हाय क्लास, रिच, सुफीस्टीकेटेड, इंग्लिश बोलणारी साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतील माया साराभाई. सतत आपल्या हाय क्लासचा, श्रीमंतीचा तोरा मिरवणारी माया साराभाई आजही सर्वच प्रेक्षकांना आठवत असेल. आठवत असेल काय …? आठवणारच कारण माया साराभाईला विसरणे कोणालाच शक्य नाही. आपल्या प्रभावी अभिनयाने ही भूमिका आणि हे पात्र अजरामर करणारी अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक शहा.(Ratna Pathak)

बॉलिवूड, रंगभूमी आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय प्रभावी आणि दिग्गज अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक शहा. रत्ना यांनी आपल्या जिवंत अभिनयाने सर्वच माध्यमांमध्ये स्वतःची मोठी छाप पडली. मोजक्या मात्र अतिशय उत्तम भूमिका करणाऱ्या रत्ना पाठक शाह या त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात. यासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील अनेकदा त्यांना लाइमलाइट मिळवून देते. (Ratna Pathak Birthday)

Ratna Pathak

रत्ना पाठक शाह यांनी दिग्गज अभिनेते नासिरुद्दीन शाह यांच्याशी लग्न केले. त्यांची प्रेमकहाणी आणि त्यांचे लग्न खूपच गाजले. अगदी चित्रपटातील कथेला साजेशी अशीच त्यांची प्रेमकहाणी होती. आज रत्ना पाठक शाह त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल.(Bollywood Entertainment News)

रत्ना आणि नसीरुद्दीन यांची पहिली भेट १९७५ मध्ये झाली होती. नसीरुद्दीन शाह पुण्यातील एफटीआयआय मध्ये शिकत होते. तेव्हा त्यांची भेट रत्ना पाठक यांच्याशी झाली. रत्ना या नसीरुद्दीन यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान होत्या. त्या देखील तिथे एक कॉलेजमध्ये शिकत होत्या. योगायोगाने हे दोघं सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से संन्यास तक’ या नाटकात एकत्र काम करत होते. या नाटकामुळे हळूहळू त्यांची चांगली मैत्री झाली.(ratna pathak and naseeruddin shah Lovestory)

त्यावेळी ​नसीरुद्दीन हे त्यांच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले होते. नसीर यांचं पहिलं लग्न त्यांच्यापेक्षा १६ वर्षांनी मोठ्या एका पाकिस्तानी महिलेशी झालं होतं. या दोघांचा प्रेम विवाह होता. मात्र त्यांचं लग्न जास्त दिवस टिकलं नाही आणि दोघं वेगळे झाले. मात्र त्यांनी अधिकृतपणं घटस्फोट घेतला नाही. या दोघांना हिबा शाह नावाची एक मुलगी आहे. जेव्हा नासिर हे त्यांच्या विभक्त होण्यामुळे दुखत होते, तेव्हाच त्यांच्या आयुष्यात रत्ना आल्या.(Bollywood Tadka)

Ratna Pathak

================================

हे देखील वाचा: Loot Kaand Trailer: काला हूं, लाल हूं… वक्‍त के साथ मालामाल हूं! ‘लुट कांड’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज…

================================

नसीर यांना त्यांच्या कठीण काळात रत्ना यांचा मोठा मिळाला. रत्ना यांच्यामध्ये असलेले सर्वच गुण नसीर यांना कमालीचे भावले. हळूहळू ते रत्ना यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्या भावना रत्ना यांच्यासमोर व्यक्त केल्या. मात्र पहिल्या बायकोपासून अधिकृत घटस्फोट न घेतल्याने नसीर आणि रत्ना हे काही दिवस लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. पुढे त्यांनी १ एप्रिल १९८२ रोजी लग्न केलं. मुख्य म्हणजे त्यांनी जे लग्न केले, ते खऱ्या अर्थी खूपच वेगळे आणि खास ठरले. कारण त्यांच्या लग्नात निकाह वाचण्यात आला नाही की, सप्तपदी चालण्यात आली नाही. या दोघांनी रत्ना यांच्या आई दिना पाठक यांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले. दरम्यान रत्ना आणि नसीर यांना इमाद शाह आणि विवान शाह ही दोन मुलं आहेत.(Bollywood Masala News)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News dina pathak Entertainment Featured gujrati hindi idhar udhar khoobsurat movie maya sarabhai mirch masala motley Naseeruddin Shah ratna pathak ratna pathak and naseeruddin shah ratna pathak and naseeruddin shah lovestory ratna pathak birthday ratna pathak shah sarabhai vs sarabhai sarabhai vs sarabhai take Theatre vivaan shah अभिनेते नसीरुद्दीन शाह नसीरुद्दीन शाह नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक रत्ना पाठक रत्ना पाठक वाढदिवस
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.