Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Prasad Oak: ‘सुशीला-सुजीत’मध्ये एक नाही ‘अनेक’ भूमिका साकारणार प्रसाद!
‘धर्मवीर’ या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) आता पुन्हा एकदा नवं अॅडव्हॅन्चर त्याच्या आगामी चित्रपटात करताना दिसणार आहे. ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटाचं तो दिग्दर्शन करणार असून याच चित्रपटात तो एक नाही तर अनेक भूमिका करताना दिसणार आहे. (Entertainment masala)

एखादा कलाकार एखाद्या चित्रपटात फार फार तर दुहेरी भूमिका साकारताना दिसतो पण आगामी ‘सुशीला- सुजीत’ (Susheela-Sujeet) या चित्रपटामध्ये प्रसाद ओक एक दोन नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारताना दिसणार आहे. आता चित्रपटात प्रसाद करत असलेल्या तब्बल पाच भूमिका नक्की कोणत्या ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.. तर प्रसाद या चित्रपटाचा कॅप्टन ऑफ द शीप म्हणजे दिग्दर्शक आहे. सोबतीला तो या चित्रपटात एक अतरंगी भूमिका साकारतोय ! चित्रपटाची कथा देखील प्रसादचीच आहे. या चित्रपटाचा प्रसाद निर्माता सुद्धा आहे आणि लास्ट बट नॉट लिस्ट या चित्रपटात प्रसादने एक सुंदर गाणं देखील गायलं आहे. तर अशा पाच भूमिका तो आपल्या खांद्यावर लिलया सांभाळताना दिसणार आहे. (Marathi upcoming movies)
========================
हे देखील वाचा : Prasad Oak : सहाय्यक दिग्दर्शकापासून सुरु झाला होता प्रसाद ओकचा अभिनय प्रवास
=======================
प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित-अभिनित-निर्मित ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर या चित्रपटाचा एक हटके प्रोमो देखील शेअर करण्यात आला होता. ज्यात घराच्या बाल्कनीत उभं राहून स्वप्नील आणि सोनाली लोकांची मदत मागत असतात. आता नेमकी ते कोणत्या अडचणीत सापडले आहेत? आणि वाचवा वाचवा असं का ओरडत आहेत याचं उत्तर प्रेक्षकांना १८ एप्रिल २०२५ ला मिळणार आहे. (Entertainment news)