Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Doordarshan : दुदर्शनवरील पहिली जाहिरात माहित आहे का?
मनोरंजनाच्या व्याख्या कळानुसार बदलत गेल्या. ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांचा काळ हळूहळू रंगीत होऊ लागला. पुढे टी.व्हीची जागा काही अंशी मोबाईल फोनने घेतली. त्यानंतर आल्या असंख्य ओटीटी वाहिन्या. आणि ओटीटीच्या जंजाळात कुटुंबासोबत एकत्र बसून टी.व्ही वर लागणारे जुने चित्रपट पाहण्याचा तो काळ आणि ती वेळही निघून गेली. (Doordarshan)
एक काळ असा होता जेव्हा प्रेक्षक टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असत. कार्यक्रमचं काय टी.व्हीवर लागणाऱ्या जाहिराती देखील तितक्याच आवडीने आपण पाहात होतो. आज आपण त्याच टीव्ही जाहिरातीबद्दल जाणून घेणार आहोत जी पहिल्यांदा टी.व्हीवर प्रदर्शित झाली होती. (Doordarshan advertisement)

तर, तो काळ होता दूरदर्शनचा (Doordarshan). रामायण, महाभारत, कृषी दर्शन असे कुटुंबासोबत बसून पाहणारे मनोरंजक कार्यक्रम प्रसारित होत होते. सारं जीवन अगदी निवांत सुरु होतं. तेव्हा टी.व्हीवर प्रसारित होणारे कार्यक्रम आणि जाहिराती माहितीपर, साध्या आणि मजेशीर होत्या. दुदर्शनवर भारतातील पहिली जाहिरात 1 जानेवारी 1976 रोजी प्रसारित झाली होती. ही जाहिरात ग्वाल्हेरमधील गोळीबाराची असल्याचे सांगितलं जातं. या जाहिरातीनंतर, भारतातील जाहिरातींचे संपूर्ण जग बदललं. इतकंच नाही तर 1982 मध्ये जेव्हा टीव्ही रंगीत झाला तेव्हा त्या वेळी पहिली रंगीत जाहिरात बॉम्बे डाईंगची प्रसारित करण्यात आली होती. (Nostalagia news)
याशिवाय,वॉशिंग्टन पावडर निरमा, पार्ले-जी, पान-पराग, उजाला, नेरोलॅक्स, ब्रिझ साबण, मार्गो साबण, सौंदर्य साबण निरमा, लाईफबॉय गोल्ड, धारा तेल, लिरिल साबण अशा अनेक जाहिराती अक्षरश: चित्रपटाप्रमाणे त्यांचं चित्रिकरण केलं जात होतं असंच भासायचं. कारण, प्रत्येक जाहिरात आपलीशी वाटायची, गाण्याचे जिंगल्स अगदी तोंडपाठ असायचे.
===========
हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….
===========
विशेष म्हणजे आत्ताच्या काळात स्किप किंवा म्यूट न करता त्या जाहिराती आवर्जून पाहिल्या जात होत्या. हल्ली अशा जाहिरातींची कमतरता ९०च्या दशकातील जनरेशनला नक्कीच जाणवत असेल यात शंका नाही. (Entertainment news)