Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Pushkar jog : “मराठी चित्रपट परदेशी शुट करणं कसं परवडतं?”, जोग म्हणतो…

 Pushkar jog : “मराठी चित्रपट परदेशी शुट करणं कसं परवडतं?”, जोग म्हणतो…
मिक्स मसाला

Pushkar jog : “मराठी चित्रपट परदेशी शुट करणं कसं परवडतं?”, जोग म्हणतो…

by रसिका शिंदे-पॉल 24/03/2025

मराठी चित्रपटसृष्टीत टेक्नोलॉजीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केला. अगदी परदेशात जाऊन त्यांच्या कला शिकून ‘झपाटलेला’ किंवा ‘थरथराट’ या चित्रपटांमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आणि प्रेक्षकांना ते आवडलेही. गेल्या काही काळात अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग देखील वेगवेगळे प्रयोग आपल्या मराठी चित्रपटांमध्ये करताना दिसत आहे. AI Technology वर भाष्य करणारा पहिला चित्रपट त्याने मराठीत आणला इतकंच नाही तर परदेशात आजपर्यंत हिंदी चित्रपटांचंही शुट झालं नसेल अशा लोकशन्सवर त्याने मराठी चित्रपटांचं शुट केलं आहे. पण आर्थिकदृष्ट्या त्याला हे कसं जमतं यावर पुष्करनेच उत्तर दिलं आहे. (Pushkar Jog)

आत्तापर्यंत पुष्करने ‘जबरदस्त’, ‘वेल डन बेबी’, ‘अदृश्य’, ‘इट्स टू मच’, ‘ऐसी भी क्या जल्दी है’, ‘डोन्ट वरी बी हॅपी’, ‘बापमाणूस’, ‘मुसाफिरा’, ‘सून लाडकी सासरची’, ‘द एआय धर्मा स्टोरी’ या चित्रपटांमध्ये कामं केली. लवकरच तो ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटात वेगळीच भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसताना त्याला परदेशांत चित्रपट शूट करणं कसं परवडतं, यावर महत्वपूर्ण विधान केलं आहे. (Entertainment news)

पुष्कर जोगने‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, “निर्माता म्हणून बाहेर जाऊन शूट करणं आव्हानात्मक आहे. अ‍ॅमस्टरडॅम, पॅरिससारख्या ठिकाणी शूट झालेली ही पहिली मराठी फिल्म आहे. आयफेल टॉवर पडद्यावर दिसणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. मला वाटतं की, निर्मात्यानं स्मार्ट प्रोड्युसर असणं गरजेचं आहे. नुसते पैसे लावले म्हणून तुम्ही निर्माते होत नाही. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेळेसाठी असलेले निर्माते खूप आहेत, ते पैसे लावतात आणि त्यांना मेकर्स फसवतात. मी कोणाचं नाव घेत नाही. पण, त्या-त्या बजेटमध्ये चित्रपट बनत नाहीत. पैशांचा नीट वापर केला जात नाही. समजा, तीन कोटींचा चित्रपट असेल, तर तो बनता-बनता प्रदर्शित होईपर्यंत पाच-साडेपाच कोटी खर्च होतात. त्यामुळे प्रोड्युसर खचतो आणि म्हणतो मला हे क्षेत्र नको. त्यात कलाकारांचे नखरे असतात. थिएटर्स मिळत नाहीत. या सगळ्याचा त्रास निर्मात्याला होतो.” (Marathi films)

===============================

हे देखील वाचा: Hardik Shubhechha Movie Trailer: लग्नानंतरची गोष्ट सांगणार ‘हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय?’ धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…

पुढे तो म्हणाला की, “मला कसं जमतं, तर मी खूपच प्रामाणिकपणे माझं काम करतो, माझ्या निर्मात्याचा एक रुपयाही वाचवला, तर मला खूप आनंद होतो. माझं बजेट परवडणारं असतं. जिथे मला माहीत आहे की, माझी सॅटेलाईट किंमत काय आहे, त्या बजेटमध्ये मी चित्रपट बनवतो.” (Marathi films budget)

दरम्यान, ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटात हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे व किशोरी अंबिये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकात आहेत. (Hardik shubheccha Marathi movie)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor director pushkar jog
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.