Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या जीवनातील खास किस्से!

 Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या जीवनातील खास किस्से!
कलाकृती विशेष

Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या जीवनातील खास किस्से!

by रसिका शिंदे-पॉल 04/04/2025

आपल्या भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे निळू फुले.... ‘सामना’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘पिंजरा’, वरात’ अशा अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामं केली.. कधी ‘सामना’मधील हिंदुराव पाटील बनून तर कधी ‘सिंहासन’मधील पत्रकारांची भूमिका साकारून कायमच त्यांनी प्रेक्षकांना अचंबित केलं.. जाणून घेऊयात निळू फुले यांच्याबद्दलचे काही खास किस्से…(Marathi films)

निळू फुले यांनी दुरदर्शनला एक मुलाखत दिली होती…त्यात त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले होते.. त्यातील एक किस्सा म्हणजे निळू फुले यांच्या अभिनयाची सुरुवात कुठून झाली होती याबद्दल त्यांनी सांगितलं होतं… निळू फुले म्हणाले होते की, “सेवादलाचा संसार चालवायचा होता.. त्यामुळे गणपती उत्सव, दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीमध्ये लोकनाट्य करायचं आणि त्यातून येणारा पैसा सेवादलासाठी द्यायचा..असं करात करता मी नट झालो… नकला चांगल्या करतो म्हणून मला लोकांनी नट केलं… १५ वर्षाचा असताना एक लोकनाट्य केलं आणि या क्षेत्राचा माझा प्रवास सुरु झाला.. नट व्हावं किंवा चित्रपटात जावं किंवा व्यावसायिक नाटकात यावं असं माझं कधी ठरलंच नव्हतं.. पण लोकनाट्यातून अभिनय सुरु झाला…”(Marathi celebrity untold story)

पुढे आपल्या ग्रामीण भाषेच्या बाजाबद्दल बोलताना ते म्हणाले होते की, “लोकनाट्यातून मी नाटकात काम करत होतो… खरं तर मला लोकांनी कसं स्वीकारलं याचं मला आश्चर्य वाटतं… कारण माझी भाषा ग्रामीण होती; पण तरीही अगदी घोटून मला कमलाकर सारंगने ब्राम्हणी भाषा शिकवली… कारण, मी पश्चिम महाराष्ट्रात वाढलो.. त्यामुळे तिथली ग्रामीण भाषा लहानपणापासूनच ऐकली होती आणि तिथल्या पुढाऱ्यांकडूनही तिच भाषा सतत ऐकल्यामुळे ग्रामीण भाषाच मी कायम बोलत होतो.. शिवाय त्यांना पाहून त्यांच्या नकला करणं, ते कसे राहतात, काय घालतात हे पाहूनच चित्रपटातील माझी पात्र उभी राहिली…” (classic untold films stories)

निळू फुले यांना घरातूनच सत्यशोधकी वारसा मिळाला होता… महात्मा फुले यांच्यासोबत निळू फुले यांचं खास नातं होतं.. महात्मा फुले यांचे निळू फुले खापरपंतु…ज्यावेळी महात्मा फुले गंजपेठेत राहायला आले त्यावेळेपासून पुण्यात फुले मंडळी म्हणजे निळू फुलेंचे आजोबा किंवा त्यांचं इतर फुले कुटुंबीय पुण्यात स्थायिक झाले….(Entertainment news)

अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांध्ये कामं केलेल्या निळू फुले यांना हॉलिवूड चित्रपट पाहण्याचा छंद होता…पुण्यामध्ये फारपुर्वी ३-४ थिएटर्समध्ये इंग्रजी चित्रपट दाखवले जात होते.. सुदैवाने निळू फुले यांच्या मित्राचे वडिल तिथे मॅनेजर होते… ते निळू फुले आणि त्यांच्या मित्राला पास देत होते..मुळात इंग्रजी भाषेशी काहीही संबंध नसल्यामुळे त्यांची भाषा कधीच निळूभाऊंना समजली नाही… नंतर तो चित्रपट कुठल्या कादंबरीवरुन किंवा पुस्तकावर आधारित असेल तर ते पुस्तक किंवा कथा वाचून पुन्हा तो हॉलिवूड चित्रपट निळू भाऊ पाहायला जात होते.. अशा पद्धतीने हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी निळू फुले अभिनयातील रुची वाढवण्यास नकळत मदत केली होतीच…(Nilu Phule)

============

हे देखील वाचा: Ashok Saraf : “आजही लक्ष्यावर केलेला ‘तो’ चित्रपट मी नाकारल्या खंत…”

============

इतकंच नाही तर अभिनेते राम नगरकर यांनी आपल्या ‘रामनगरी’ या आत्मचरित्रात निळू फुले यांच्याविषयीचा एक किस्सा लिहिला आहे. त्यांनी निळू फुले आणि त्यांच्या आईसोबत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. त्याकाळी राम नगरकर आपल्या नव्या दुकानाच्या उदघाटनासाठी पुण्यात गेले होते. पुण्यात ते निळू फुले यांच्या वस्तीमध्ये देखील गेले होते. त्या काळात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ आला होता. सेवादलाने पुण्यातून धान्य गोळा करून ते दुष्काळग्रस्त भागात वाटण्याचा उपक्रम हाती घेतला होता. निळू भाऊंनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या पुण्याच्या घरी या धान्यांची जवळ जवळ ५ पोती जमा झाली होती. त्या काळात राम नगरकर निळू यांच्या घरी राहायला आणि जेवायला जात आणि ते राम यांच्याकडून कधीच पैसे घेत नव्हते.(Entertainment news update)

============

हे देखील वाचा :Laxmikant Berde : “बारामतीचे आहात म्हणून खुर्चीचा मोह”, बेर्डेंचं ‘ते’ अॅडिशन

============

एक दिवस निळू फुलेंच्या आईसमोर समस्या उभी राहिली. घरात १२ -१३ लोकांचे कुटुंब आणि घरात अन्नाचा दाणा शिल्लक नव्हता. जवळचे पैसेदेखील संपले होते. निळू आणि नगरकर कुठेतरी बाहेर जायला निघाले होते, तेव्हा आईने पैसे मागितले. त्यावर निळू म्हणाले होते की, ”सगळा पगार तुलाच देतो, आता पैसे कुठून आणणार? शेजाऱ्यांकडे मागून बघा.” त्यावर आईने, “आधीच शेजाऱ्याकडून घेतलेलं परत दिलं नाही आहे, आता पुन्हा मागितलं तर कोण देणार..” राम हे सर्व दाराबाहेर उभे राहून ऐकत होते. (Marathi films nostalgia)

निळू यांना पुन्हा आईने आवाज दिला आणि घरात असलेले धान्य वापरण्याची परवानगी मागितली. तसेच पैसे आल्यावर त्यात पुन्हा धान्य ठेवू असे देखील सांगितलं. पण निळू यांना ते ऐकून राग आला. हा प्रकार ऐकून राम नगरकरांना पश्चाताप झाला, एकतर या घरात पैशाची… अन्नाची तंगी आहे आणि त्यात खिशात हजार रुपये असताना देखील मी इतके दिवस फुकटच बसून खात होतो. निळू फुले आणि त्यांच्या आईमधील सगळा संवाद ऐकल्यावर राम समोर आले त्यांनी खिश्यातील सर्व पैसे निळू फुलेंच्या हातावर टेकवले. निळूंनी ते घेण्यास नकार दिला. त्यावर नगरकर भडकले आणि म्हणाले जर तू पैसे घेतले नाहीस तर मी घर सोडून निघून जाईन. शेवटी खूप हट्ट केल्यांनतर अखेर निळू फुलेंनी हे पैसे घेतले आणि त्यांच्या घरात धान्य आलं.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood bollywood masala Entertainment entertainment tadaka Marathi Actor marathi films histroty marathi villian nilu phule
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.