
Sikandar : सलमानच्या ‘सिकंदर’ची सात दिवसांत तुटपुंजी कमाई!
ईदच्या निमित्ताने सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्च २०२५ ला रिलीज झाला… दरवर्षाप्रमाणे ईदच भेट सिकंदरच्या स्वरुपात चाहत्यांना सलमानने जरी दिली असली तरी चित्रपटाने अपेक्षेनुसार बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही आहे. सलमान खानच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली असून नुकतीच चित्रपटाची आकडेवारी समोर आली आहे. खरं तर चित्रपटात ५०० कोटींच्या ब्लॉक बस्टर चित्रपटांचा रेकॉर्ड करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) असल्यामुळे ‘सिकंदर’ छावा’ (Chhaava) चित्रपटालाही मागे टाकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण तो सपशेल फेल ठरला आहे…(Sikandar movie)

सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘सिकंदर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटी, दुसऱ्या दिवशी २९ कोटी, तिसऱ्या दिवशी १९.५ कोटी, चौथ्या दिवशी ९.७५ कोटी, पाचव्या दिवशी ६ कोटी कमवत पहिल्या आठवड्याच्या शेवटी ९०.२५ कोटी कमावले आहेत. तर, सहाव्या दिवशी ३.५० कोटी, सातव्या दिवशी ०.५७ कोटी कमवत आत्तापर्यंत केवळ ९३.३२ कोटी कमावले आहेत… सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस घट होताना दिसत असल्यामुळे आता किती आठवडे चित्रपट थिएटरमध्ये राहतो हे पाहावे लागणार आहे…(Sikandar movie box office collection)
===========================
हे देखील वाचा:Aabhalmaya : शिवाजी पार्कमुळे ‘सुधाच्या आयुष्यात तो ट्विस्टट आला नाही!
===========================
‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटात सलमान खान (Salman khan) सोबत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) प्रमुख भूमिकेत दिसली आहे.. तर काजल अग्रवाल, शर्मन जोशी, सत्यराज, प्रतीक स्मिता पाटील (Pratik Smita Patil) असे कलाकार झळकले आहेत… २०० कोटींचं बजेट असणाऱ्या सिकंदर चित्रपटाने आत्तापर्यंत अर्धी किंमतही कमावली नसल्यामुळे निराशाजनक वातावरण सध्या पसरलं आहे… (Sikandar movie)