
PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटासाठी रितेश देशमुखने अंकुशला दिल्या शुभेच्छा!
Marathi इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अंकुश चौधरी (Ankhush Chaudhari) पुन्हा एकदा चर्चेत आला असून नुकतेच ‘पी.एस.आय अर्जुन’ (PSI Arjun) या त्याच्या आगामी चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. दोन वर्षांनंतर पडद्यावर झळकताना अंकुश एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या या रुबाबदार लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. स्टाईल आयकॉन अंकुशच्या या जबरदस्त लूकमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली असून ‘पी.एस.आय. अर्जुन’चे पोस्टर पाहूनच त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.(PSI Arjun Marathi Movie)

विशेष म्हणजे, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही (Ritesh Deshmukh) अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुशच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत रितेश देशमुखने त्याच्या नव्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुखचा या खास पाठींब्याने सर्वांचे लक्ष वेधले असून आता त्याच्या या नव्या प्रवासाला चाहते आणि इंडस्ट्रीमधील मित्रमंडळींनी दिलेला भरभरून प्रतिसाद बघता, ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटावर आधीच हिट होण्याची मोहोर उमटली आहे.

काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे मोशन पोस्टर मध्ये अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतला पी एस आय चा लूक पाहायला मिळत आहे, जो चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करणारा आहे. चाहत्यांना पहिल्यांदाच अंकुश चौधरी एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.(PSI Arjun Marathi Movie)
===============================
================================
व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा चित्रपट येत्या ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.