Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

स्टार प्रवाहच्या ‘तुझ्या सोबतीने’ मालिकेला सुरु होण्याआधीच ब्रेक; १२ ऐवजी

Bigg Boss Marathi 6 मध्ये होणार  राजकीय नेत्याची एन्ट्री? रितेश भाऊने दिली

सत्तरच्या दशकात Dev Anand यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली

Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?

४००० कोटींच्या Ramayanaची धुरा ‘या’ मराठी माणसावर!

गौरव अमुलची काळजी कशी घेणार?; लवकरच Single Papa 2 प्रेक्षकांच्या

Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?

अखेर Shashank Ketkar ने स्क्रिन शॉट्ससह शेअर केलं 5 लाख

Border 2: ‘घर कब आओगे…’ तब्बल 28 वर्षांनंतर प्रसिद्ध गाणं

जेव्हा अभिनेत्री Helan हिला अंडरवर्ल्ड डॉनने मदत केली होती!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Madhura Velankar : लग्नातल्या पाहूण्यांना ‘जा’ म्हणायची वेळ का आली? 

 Madhura Velankar : लग्नातल्या पाहूण्यांना ‘जा’ म्हणायची वेळ का आली? 
मिक्स मसाला

Madhura Velankar : लग्नातल्या पाहूण्यांना ‘जा’ म्हणायची वेळ का आली? 

by रसिका शिंदे-पॉल 07/04/2025

मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून आपलं अभिनय करिअर घडवणारी आणि आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर मराठीतील नेपॉकिड अभिनेत्री मधुरा वेलणकर (Madhura Velankar). ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर (Pradeep Velnkar) यांची मुलगी मधुरा वेलणकर हिने आजवर विविध विषयांवर आधारित कलाकृतींमध्ये आपली कला सादर केली. बरं तिचं लग्नही झालं ते अभिनय क्षेत्रातील घरातच. ज्येष्ठअभिनेते शिवाजी साटम (Shivaji satam) यांचा मोठा मुलगा अभिजित साटम याची मधुरा बायको.. त्यांच्या लग्नाबद्दल एका मुलाखतीमध्ये तिने किस्सा सांगितला होता. काय होता तो मजेशीर किस्सा वाचाच..(Madhura velnkar family)

तर, झालं असं की मधुरा आणि अभिजित साटम (Abhijeet Satam) यांना अत्यंत साध्यापद्धतीने अगदी जवळच्या माणसांच्या उपस्थितीत लग्न करायचं होतं.. मात्र, दोघांच्याही कुटुंबांना त्यांचं लग्न अगदी जोरदार व्हावं अशी इच्छा होती.. आणि शेवटी आई-वडिलांच्या िइच्छेपुढे करणार तरी काय? म्हणून जिथे मंदिरात ५० माणसांच्या उपस्थितीत छोटेखानी लग्न करण्याची इच्छा असलेल्या मधुरा आणि अभिजित यांच्या लग्नाला तब्बल ६०० माणसं आली होती..(Madhura velnkar marriage)

================================

हे देखील वाचा: CID : २७ वर्ष अनकट मनोरंजन ते ए.सी.पी प्रद्युम्न यांची एक्झिट आणि बरंच काही!

================================

मधुरा म्हणाली की, आमच्या आई-वडिलांच्या इच्छे खातर आम्ही ठरवलं की त्यांना ज्यांना बोलवायचं आहे त्यांना बोलावू दे. माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात तर १७०० माणसं होती त्यामुळे ६०० म्हणजे त्यासमोर अगदीच कमी लोकं आहेत माझ्या बहिणीच्या लग्नात तर माणसांना बसायलाही जागा नव्हती. इतकी गर्दी की आम्हाला काही लोकांना रिक्वेस्ट करावी लागलेली की तुमचं झालं असेल तर निघा…”.(Marathi celebrity stories)

सध्या मधुरा वेलणकर जगभरात मराठी भाषेचा इतिहास पोहोचावा यासाठी मधुरव : बोरु ते ब्लॉग हा नाट्याविष्कार सादर करत आहे. आत्तापपर्यंत मधुराने ‘बटरफ्लाय’, ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’, ‘हापूस’, ‘खबरदार’, ‘गोजिरी’, ‘एक निर्णय स्वतःसाठी’, ‘उलाढाल’, ‘सरीवर सरी’, ‘आई नंबर १’ असे अनेक चित्रपट केले आहेत.(Madhura Velankar Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Celebrity News Madhura Velankar marathi actress Marathi films Marathi Movie marathi upcoming films pradeep velankar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.