
Devika Rani : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका!
मनोरंजनसृष्टीत सध्याच्या काळात अभिनेत्री म्हणून आपली कारकिर्द घडवणे तसे कठीण राहिलेले नाही. परंतु स्वातंत्र्यपुर्व काळात जिथे स्त्रीया चुल आणि मुल या पारंपारिक रुढी परंपरांमध्ये अडकलेल्या होत्या त्या काळात अभिनेत्री देविका राणी (Devika Rani) यांनी खऱ्या अर्थाने एक बोल्ड पाऊल उचलले. १९०८ साली जन्मलेल्या देविका राणी यांनी पुरुषांच्या सोबतीने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकल दीर्घ चुंबन दृश्य चित्रित करणाऱ्या अभिनेत्री देविका राणी या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या आधुनिक नायिका ठरल्या. जाणून घेऊयात देविका राणींबद्दल… (Devika Rani)

देविका राणी मोठ्या पडद्यावर झळकल्या त्या काळात प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रिया अथवा मुलींनी चित्रपटात अभिनय करणे म्हणजे अप्रतिष्ठित मानले जात होतं. मात्र, या बुरसटलेल्या विचार आणि चालीरितींना झुगारून देविका राणी यांनी अभिनय क्षेत्रात यशस्वीरित्या प्रवेश केला. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका अशी ओळख निर्माण करणाऱ्या देविका राणी मुळच्या वालटेअर (विशाखापट्टणम) इथल्या होत्या. रवींद्रनाथ टागोरांशी त्यांचे कौटुंबिक संबंध देखील होते. देविका राणी वयाच्या नवव्या वर्षी शिक्षणासाठी लंडनला गेल्या. तेथे स्थापत्यशास्त्राचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता.

ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळात चुंबन दृश्य किंवा बोल्ड सीन्स पाहायला मिळत नव्हते. परंतु या काळात देविका राणी यांनी अभिनेता, निर्माता हिमांशु रॉय यांच्यासोबत चुंबन दृश्याचे चित्रिकरण करुन चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टीकोन बदलण्यास भाग पाडलं होतं. १९३३ साली प्रदर्शित झालेला ‘कर्मा’ हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी या अशा दोन भाषेत प्रदर्शित झाला होता; तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा पहिला इंग्रजी चित्रपट ठरला होता.(untold stories of Indian cinema)

देविका राणी या केवळ एक उत्तम अभिनेत्री नव्हत्या तर त्यांना वेशभूषा, दिग्दर्शन व चित्रपटांसदर्भातील अनेक तांत्रिक गोष्टींचेही ज्ञान होते. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी विदेशी दिग्दर्शक, निर्माते यांच्यासोबतीने चित्रपटांसाठी पडद्यामागे काम केले होते. एकीकडे त्यांचा हा प्रवास सुरु असताना १९२८ साली त्यांची ओळख निर्माते, दिग्दर्शक हिमांशु रॉय यांच्याशी झाली. काही काळानंतर हिमांशु रॉय यांनी कर्मा हा भारतीय चित्रपटसृष्टीतील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दिग्दर्शित केला. यानंतर देविका राणी (Devika Rani) यांनी मागे वळून पाहिले नाहीच. (Entertainment news)

देविका राणी आणि हिमांशू राय यांनी १९३४ मध्ये बॉम्बे टॉकिज या भारतातील पहिल्या व्यावसायिक चित्रपट संस्थेची स्थापना केली. या संस्थेने आणि देविका राणी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला मधुबाला, अशोक कुमार, सुरैया, दिलीप कुमार, राज कपूर, पन्हालाल घोष, किशोर साहू, जयराज अशा अनेक कलाकारांना चित्रपटसृष्टीत आणलं केले. याशिवाय लेखक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, कॅमेरा मॅन अशा अनेक मान्यवरांनाही ओळख मिळवून देण्याचं काम देविका राणी यांनी केलं. (Bollywood gossips)
===============================
हे देखील वाचा: Madhura Velankar : लग्नातल्या पाहूण्यांना ‘जा’ म्हणायची वेळ का आली?
===============================
देविका राणी यांनी चित्रपटसृष्टीतील १० वर्षांच्या काळात ‘कर्मा’, ‘जवानी की हवा’, ‘अच्छुत कन्या’, ‘जन्मभूमी’, ‘जीवन नैया’, ‘इज्जत’, ‘जीवन प्रभात’, ‘निर्मला’, ‘वचन’, ‘दुर्गा’, ‘अनजान’, ‘हमारी बात’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. याव्यतिरिक्त त्यांनी ‘बसंत’, ‘ज्वार भाटा’ आणि ‘प्रतिमा’ या चित्रपटांची निर्मिती देखील केली. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार (Ashok Kumar) यांच्यासोबत देविका राणींची जोडी प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरली होती.(Devika Rani movies)

२१व्या शतकात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या सोबतीने आपली यशस्वी कारकिर्द घडवताना दिसतात. परंतु स्वातंत्र्यपुर्व काळात चालीरितींना झुगारुन अभिनय क्षेत्रात येत इतर अनेक स्त्रियांना हे क्षेत्र मोकळे करुन देण्याचे काम खऱ्या अर्थाने देविका राणी यांनी केले. चित्रपटसृष्टीतील त्यांची कारकिर्द जरी यशस्वी दिसत असली तरी कौटुंबिक आणि मनोरंजनसृष्टीत त्यांना अनेक यश-अपयशांचा सामना करावा लागला होता. ज्या कलाकारांना देविका राणी यांनी नावलौकिक मिळवून दिला होता त्याच कलाकारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे सांगितले गेले. मात्र, असे असुनही अभिनय क्षेत्रातील अभूतपुर्व कामगिरीसाठी कालांतराने देविका राणी (Devika Rani) यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. १९६९ साली दादासाहेब फाळके पुरस्काराच्या देविका राणी पहिल्या मानकरी ठरल्या होत्या. (Entertainment masala)
===============================
हे देखील वाचा: Amruta Khanwilkar : योगा मॅटवर सूचलं नव्या घराचं नाव; काय आहे किस्सा?
===============================
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या आणि या चित्रपटसृष्टीला जगभरात ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या देविका राणी (Devika Rani) यांचे विस्मरण कुठेतरी या चित्रपटसृष्टीला झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. (Indian cinema history)
रसिका शिंदे-पॉल