
Chhabi : ‘छबी’; गुढ चित्रपटातून उलगडणार फोटोचं रहस्य
मराठी चित्रपटांमध्ये विविधांगी प्रयोग सातत्याने सुरु आहेत. शिवाय प्रेक्षकांना कोणत्याङी भाषेतील भयपट किंवा थरारपट पाहायला फार आवडतात आणि हिच प्रेक्षकांची आवड जपत ‘छबी’ (Chhabi) हा गुढ आणि रहस्यमय चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. कोकणात फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला आलेल्या गूढरम्य अनुभवाची थरारक गोष्ट ‘छबी’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा रंजक टीझर लाँच करण्यात आला असून, ‘छबी’ हा चित्रपट ९ मे पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. (Marathi suspense thriller movies)

फोटोग्राफी स्पर्धेसाठी एक तरूण फोटोग्राफर कोकणातल्या गावात फोटो काढतो. मात्र त्या फोटोमध्ये कुणीच नसतं. हे असं का झालं याचा नाट्यमय शोध ‘छबी”” या चित्रपटात आहे. गूढरम्य आणि नावीन्यपूर्ण कथानक, परिणाकारक पार्श्वसंगीत या मुळे हा टीझर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, तसंच चित्रपटाविषयी उत्सुकताही वाढवतो. आजवर चित्रपटांमधून फोटोग्राफरची, एखाद्या फोटोची गोष्ट फारशी मांडली गेलेली नाही. अशा कथानकाला गूढरम्यतेची पार्श्वभूमी असल्यानं ‘छबी’ हा सध्याच्या चित्रपटांमध्ये नक्कीच वेगळा प्रयत्न ठरणार आहे. या गूढरम्यतेचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी आता ९ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.(Chhabi marathi movie)
=====================================
हे देखील वाचा: Devika Rani : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका!
=====================================
छबी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांचं असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सृष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश दाभणे , अपूर्वा कवडे या नव्या दमाच्या कलाकारांसह समीर धर्माधिकारी (Sameer Dharmadhikari), मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले (Shubhangi Gokhale), राजन भिसे, जयवंत वाडकर (Jaywant Wadkar),संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत. (Upcoming marathi films)