Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.

 Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.
बात पुरानी बडी सुहानी

Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.

by धनंजय कुलकर्णी 10/04/2025

एखाद्या हिरोईनचे नाव वाचकांना विचारून ठरवले जाऊ शकते का? हो नक्कीच. असा प्रकार एकदा झाला होता. एका नवोदित नायिकेचं काय फिल्मी नाव असावे यावर विचार मंथन चालू होते. निर्मात्याने सरळ भारतातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये एक जाहिरात दिली आणि त्यात असे लिहिले की ‘आमच्या नवीन चित्रपटात एक नवी मुलगी नायिकेची भूमिका करत आहे या मुलीला एक फिल्मी नाव हवे आहे. तुम्ही ते नाव सुचवा. तुम्ही सुचवलेलं नाव जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला पारितोषिक देऊ.’ अशा पद्धतीने संपूर्ण देशातून वाचकांचा कौल मागवण्यात आला व त्यातून एक नाव फायनल करण्यात आले आणि याच नावाने त्या हिरोईनीने आपली संपूर्ण कारकीर्द गाजवली. कोण होती ती हिरोईन आणि काय होते त्या हिरोईनचे नाव? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. (Ameeta)

शम्मी कपूर (Shammi Kapoor) ला ज्या चित्रपटाने खऱ्या अर्थाने स्टार बनवले तो चित्रपट होता ‘तुमसा नही देखा’. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची नायिका होती अमिता(Ameeta). याच हिरोईन बाबतचा हा किस्सा आहे तिचे खरे नाव होते कमर सुलताना (Qamar sultana). लहानपणापासून नाटकात काम करायची तिला आवड. १९५१ साली मधुबाला (Madhubala) आणि प्रेमनाथ (Premnath) यांचा एक चित्रपट आला होता ‘बादल’. या चित्रपटात मधुबालाने तलवारबाजी करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यावेळी कमर सुलताना अवघ्या  बारा वर्षाची होती. (जन्म ११ एप्रिल १९४०) 

तिला मधुबालाची (Madhubala) भूमिका इतकी आवडली आणि तिने लाकडी तलवार आणून घेतली व दिवसभर ती घेवून तलवारबाजी करत असे. या तलवारबाजीने तिला वेडच लावले होते. या तिच्या तलवारबाजीने तिने शाळेतल्या शिक्षकांचे बोलणे देखील खाल्ले होते. तेव्हापासून तिने शाळेत लाकडी तलवार नेणे बंद केले. परंतु घरी आल्यानंतर पुन्हा तलवारबाजी करून ती संपूर्ण कॉलनीमध्ये एकच हंगामा करत असे. (Untold Stories)

एकदा निर्माते तिच्या घरासमोरून चालले होते. त्यावेळी त्यांना एक तलवारबाजी करणारी मुलगी दिसली. त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी गाडी थांबवली आणि तिच्या घरी ते गेले. तिच्या पालकांशी बोलले आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. लेखराज यांनी सांगितले की “तुमच्या मुलीने खरं तर चित्रपटात काम करायला पाहिजे. तिच्यात ते सर्व गुण आहेत जे एका अभिनेत्रीकडे असणे गरजेचे आहे!” पालकांनीही हो नाही करत उत्तर दिले आणि ‘ठोकर’ या चित्रपटात तिला भूमिका मिळाली. या चित्रपटात तिचे फिल्मी नाव होते जय जयवंती. यानंतर तिला पुढचा चित्रपट मिळाला ‘चैतन्य महाप्रभू’ (Chaitanya Mahaprabhu). हा चित्रपट बैजू बावरा फेम विजय भट (Vijay Bhat) यांनी दिग्दर्शित केला होता.  

यावेळी मात्र त्यांना हिचे नाव बदलणे गरजेचे आहे असे वाटले. तिचे नाव काय असावे याच्यावर भरपूर विचार मंथन झाले. मित्रांशी चर्चा झाल्या. कुटुंबीयांशी बोलणं झालं. अनेक कलावंतांशी बोलणं झालं. पण नाव काही फायनल होत नव्हतं. शेवटी त्यांनी संपूर्ण देशातील प्रमुख वृत्तपत्र आणि मासिकातनं एक जाहिरात दिली आणि ‘आमच्या नव्या चित्रपटातील हिरोईनचे नाव सुचवा तुमचे नाव जर आमच्याकडून फायनल झाले तर तुम्हाला पारितोषिक मिळेल’ अशा पद्धतीने जाहिरात दिली. (Bollywood Tadka)

संपूर्ण देशातून तिच्या नावाबाबतचा कौल घेण्यात आला. त्या काळात वाचकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आणि वाचकांकडून आलेल्या नावातून एक नाव फायनल केले गेले हे नाव होते ‘अमिता’ (Ameeta). अशा पद्धतीने तिचे फिल्मी बारसे दुसऱ्यांदा झाले आधी जय जयवंती आणि नंतर अमिता. सुरुवातीला तिचे करिअर थोडे लडखडतच सुरुवात झाली पण लवकरच तिने स्वतःला सिद्ध केले. तुमसा नही देखा, गूंज उठी शहनाई, देख कबीरा रोया, हम सब चोर है, राखी, मेरे मेहबूब, हसीना मान जायेगी…. हे तिचे चित्रपट आज देखील आठवले जातात.

========================

हे देखील वाचा: Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?

========================

अमिता (Ameeta) या अभिनेत्रीची कारकीर्द तशी छोटीशीच. फार उल्लेखनीय अजिबात नाही. पण तिच्या फिल्मी नावाचा हा किस्सा मात्र इंटरेस्टिंग आहे. अमिताने नंतर अभिनेता कामरान यांच्यासोबत लग्न केले. (हा कामरान म्हणजे अभिनेता साजिद खानचा बाप. आई मात्र अमिता नाही!) साधारणतः साठच्या दशकाच्या अखेरी स तिने चित्रपट संन्यास घेतला. आज १० एप्रिल अभिनेत्री अमिता वयाची ८५ पूर्ण करत आहे.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Ameeta badal Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Chaitanya Mahaprabhu Entertainment Thokar Tumsa nahi dekha
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.