
Jaat : सनी देओलचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी यशस्वी झाला?
‘गदर २’ चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता सनी देओल (Sunny Deol) ‘जाट’ या नव्या चित्रपटातून भेटीला आले आहेत. पुन्हा एकदा सनी देओल अॅक्शन करताना दिसणार आहेत. सिकंदर पाठोपाठ हा चित्रपट रिलीज झाला असून जाणून घेऊयास सनी देओल सलमान खानच्या चित्रपटाला टक्कर देऊ शकला आहे की नाही.(Bollywood movies)
१० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुट्टीच्या दिवशी भरघोस कमाई करेल अशी अपेक्षा होती. ‘गदर २’ इतकी नाही पण किमान सिकंदरला मागे टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला होता. मात्र, जाट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी केली आहे. (Gadar 2)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘जाट’ चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त ९.५७ कोटींची कमाई केली आहे. ‘जाट’बरोबर दाक्षिणात्य अभिनेते अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’ रिलीज झाला. या सिनेमाने सनीच्या ‘जाट’पेक्षा जास्त कमाई केली आहे. (Jaat movie box office collection)
===============================
हे देखील वाचा: Kajol : सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट खरंच नाकारला होता का?
===============================
गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित ‘जाट’ (Jaat) चित्रपटात सनी देओल सह रणदीप हुड्डा (Randeep Hooda), सयामी खेर, उर्वशी रौतेला,राम्या क्रिशनन, उपेंद्र लिमये (Upendra Limaye) असे अनेक कलाकार आहेत. दरम्यान, सनी देओलच्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना कायमच तुफान अॅक्शन आणि दमदार कथानक अशी अपेक्षा असते पण सध्या तरी बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार सनी देओलचा जाट चित्रपट प्रेक्षकांना खुश करण्यात अयशस्वी झाला आहे.( Jaat Movie)