
Javed Akhtar : अभिनेता धर्मेंद्रने जावेद अख्तरची का माफी मागितली होती ?
माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी त्याची खरी ओळख होते त्याच्या सोबतच्या किंवा हाताखालच्या लोकांसोबत कसा वागतो त्यावर! यशाची ,गुणवत्तेची एक नशा असते ती माणसाची नीतीमत्ता बिघडवून टाकते. हा नियम सर्वच क्षेत्रात लागू असतो. मायानगरी तर हिरोला झिरो आणि हिरोला झिरो करण्यामध्ये करण्यामध्ये माहीर आहे. तिथे बघता बघता होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. तरीही वृथा अहंकार बाळगणारे अनेक जण इथे असतात. पण त्याचवेळेला काही अतिशय दिलदार मनाचे लोक देखील इथे दिसतात. आज इतक्या वर्षानंतर या कलाकारांनी त्यांच्या सोबतच्या कलाकारांसोबत केलेला व्यवहारच लक्षात राहतो. (Javed Akhtar)

अभिनेता धर्मेंद्र आज नव्वदीच्या घरात आहेत त्यांच्या बाबतच्या अनेक घटना प्रसंग आज बॉलीवूडमध्ये सांगितल्या जातात. एक नेक दिल दिलदार व्यक्ती म्हणून धर्मेंद्र यांना सर्वजण ओळखतात. गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी नुकतंच टीव्हीवर दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्रजी सोबतचा एक किस्सा शेअर केला होता. यातून धर्मेंद्र यांच्या महानतेचे तर दर्शन घडतेच शिवाय आपल्या सहाय्यकाशी कसे वागावे याचा देखील आदर्श वस्तूपाठ या घटनेतून मिळतो. कोणता होता तो चित्रपट आणि कोणता होता तो किस्सा?
१९६९ साली धर्मेंद्र आणि शर्मिला टागोरचा (Sharmila Tagore) ‘यकीन’ (Yakeen) या नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र यांची दुहेरी भूमिका होती. या चित्रपटाची निर्मिती हास्य अभिनेता देवेन वर्मा यांनी केली होती. तर चित्रपटाचे दिग्दर्शन ब्रिज सदाना यांनी केले होते. या चित्रपटात धर्मेंद्र यांची दुहेरी भूमिका होती. एक चित्रपटाचा नायक गोपाल तर दुसरी भूमिका (गर्सन) खलनायकाची होती. नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका धर्मेंद्र साकारणार होते.(Javed Akhtar)

या दोन्ही भूमिकांमध्ये फरक फक्त एवढाच दाखवला होता की खलनायक साकारणाऱ्या धर्मेंद्र यांचे डोळे निळे दाखवले होते. यासाठी धर्मेंद्र यांना निळ्या रंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स वापरावे लागत होते. हे कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना धर्मेंद्र यांच्या डोळ्याची खूप आग होत होती. डोळ्यांना टोचत होते. डोळ्यातून सारखे पाणी येत असे. असे असतानाही धर्मेंद्र यांनी ही भूमिका अतिशय अप्रतिम रित्या साकारली होती. (Javed Akhtar)
या चित्रपटाचे शूट चालू असताना एकदा एका शॉटच्या वेळी धर्मेंद्र यांनी आपले पुढील डायलॉग मागितले. त्यावेळी दिग्दर्शक ब्रिज यांचे सहाय्यक होते जावेद अख्तर (Javed Akhtar). तेव्हा जावेद यांचा स्ट्रगलिंग पिरेड चालू होता. दिग्दर्शकाचे ते थर्ड असिस्टंट होते. जावेद अख्तर पटकन धर्मेंद्र यांना त्यांच्या संवादाचा कागद दिला. धर्मेंद्र (Dharmendra) यांनी तो वाचला पण त्यांच्या लक्षात आले की, हा वेगळाच पेपर जावेद अख्तर यांनी त्यांच्याकडे दिला आहे. त्यांनी जावेदला पुन्हा बोलावले आणि सांगितलं, ”अरे यार, जरा ठीकसे पेपर देते जाना. ये कौनसा गलत पेपर तुमने मेरे हाथ में थमा दिया? जरा देखके काम करते जाव.” जावेद अख्तर सॉरी म्हणाले आणि लगेच त्याने योग्य तो डायलॉगचा कागद धर्मेंद्रच्या हातात दिला. (Guest Interview)
त्या दिवशीचे शूटिंग संपले. धर्मेंद्र यांनी शूटिंग संपल्यानंतर पुन्हा एकदा जावेद अख्तरला आपल्या मेकअप रूम मध्ये बोलावलं. आता जावेद (Javed Akhtar) जाम घाबरले. त्यांना वाटलं मगाशी चूक झाली. आता धर्मेंद्रजी आपल्याला खूप झापणार. आता आणखी काय चूक झाली? या भीतीने घाबरत घाबरत धर्मेंद्रच्या मेकअप रूममध्ये जावेद दाखल झाले.

जावेदला पाहिल्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांना जवळ बोलावले आणि म्हटले, ”यार मुझे माफ करना. मैने आज आपसे बहुत गलत तरह से बात की. ऐसा मुझे नही करना चाहिये था. दरअसल ये कॉन्टॅक्ट लेन्स की वजह से मेरी आंखो मे बहुत जलन होती है. मै ठीक से पढ भी नही सकता और तुमने जो पेपर दिया था वो गलत था. मुझे दुबारा सही पेपर पढना पडेगा इसी गुस्से में आपको कुछ बुरा भला कहा. पर मेरे दोस्त मुझे माफ कर देना. गलती हो गई. आय ॲम सॉरी!” जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण ते दिग्दर्शकाचे तिसरे चौथे असिस्टंट होते आणि धर्मेंद्र त्यावेळी सुपरस्टार होते. (Untold stories)
======================
हे देखील वाचा: Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.
======================
एक सुपरस्टार स्वतः बोलून आपल्या झालेल्या छोट्या चुकीबद्दल खुल्या दिल्याने माफी मागतो ही गोष्ट जावेद अख्तर (Javed Akhtar) तर मागचे साठ वर्ष विसरले नाहीत. मोठ्या माणसांचे मोठेपण अशा कृतीतूनच अधोरेखित होत असतं. (Celebrity interviews)
काही दिवसापूर्वी एका टीव्हीवरील मुलाखतीत त्यांनी धर्मेंद्र बाबतचा किस्सा शेअर केला!